नवी दिल्ली : आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indian) विजेतेपद जिंकून इतिहास रचला. पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा मुंबई इंडीयन्सने केला. आयपीएल संपल्यानंतर सर्वच खेळाडू आपापल्या घरी गेले. मुंबई इंडीयन्सचा कृणाल पांड्यादेखील यूएईतून भारतात परतला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकला.
#KrunalPandya to custom officers at airport pic.twitter.com/4gPPx1tN8t
— Ujjawal Sharma (@SharmaJi720) November 13, 2020
१२ नोव्हेंबरला युएईहून मुंबईला परतणाऱ्या कृणाल पांड्यांला विमानतळावर अडवण्यात आले. अवैधरीत्या भारतात सोने आणल्याबद्दल डीआरआयने कृणालला थांबवले. डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंसने पांड्याची सखोल चौकशी केली.
#KrunalPandya when they asked where's the gold pic.twitter.com/bhYB1LmKyO
— Ssrfan (@Ssrfan478780364) November 13, 2020
या वृत्तानंतर ट्वीटरवर कृणाल पांड्याची सोशल मीडियात खिल्ली उडवण्यात आली. Krunal Pandya हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करु लागला. यूजर्स मेमर बनवून त्याची खिल्ली उडवू लागले आहेत. इतर लोकंही जोक्स खूप शेअर करुन कृणालची मज्जा घेतायत.
#KrunalPandya
(@PHYSICS13719184) November 13, 2020
i think i have downloaded wrong picture pic.twitter.com/cHq3c9GrKm
मर्यादीत क्षमतेपेक्षा जास्त सोनं बाळगल्याची आपली चूक पांड्याने मान्य केली. आपल्याला नियमांबद्दल माहिती नव्हती असे सांगत त्याने माफी मागत दंड भरला. कृणाल पांड्याकडे मिळालेल्या सामानात सोन्याच्या दोन बांगड्या आणि महागडी घड्याळ होती.
#KrunalPandya Caught with 4 expensive watches worth.75 lac at dubai airport...
Pulkit (@sarcasticyadav_) November 13, 2020
*Krunal pandya be like-: pic.twitter.com/3qkgCFELY9
आयपीएल २०२० संपली असून सर्व खेळाडू दुबईतून मायदेशी परतू लागले आहेत. मुंबई इंडीयन्सचे (Mumbai Indians)चे स्टार क्रिकेटर कृणाल पांड्या देखील मुंबईत परतत होता. पण त्याला मुंबई एअरपोर्टवर थांबवल गेलं. डिपार्टमेंट ऑफ रेवेन्यू इंटेलीजेंस (डीआरआय) ने त्याच्यावर कथित पद्धतीने जास्त सोने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्याचा आरोप लावत दंड लावला आहे. क्रिकेटर्सना संध्याकाळी ५ वाजता विमानतळावर थांबवले गेल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली.
#KrunalPandya was carrying expensive watchs and other items without permission from Dubai to Mumbai.
— MuSalman(@mohdsalman064) November 13, 2020
He was like: pic.twitter.com/u5falAEK3j
जर तुम्ही विदेशातून सोनं खरेदी करत असाल तर पावती तुमच्या जवळ ठेवा. ती पावती तुम्हा कस्टम आणि एजन्सींकडून झालेल्या चौकशीवेळी मदत करेल. यामुळे सोन्याची किंमत देखील सहज लक्षात येईल.