IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Delhi Capitals VS Gujrat Titans) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्लीवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. दिल्लीच्या गोलंदाजांला गुजरातच्या एकही फलंदाजांची विकेट घेतला आली नाही. त्यामुळे दिल्लीने विजयासाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान गुजरातने एक ओव्हर राखून 205 धावा करत पूर्ण केलं. दिल्लीला गुजरातची एकही विकेट काढण्यात यश येत नव्हतं अशातच दिल्लीचा गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) अंपायरच्या एका निर्णयावर भडकला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीची 8 वी ओव्हर सुरु असताना कुलदीप यादव गोलंदाजीसाठी आला. तेव्हा त्याने एक गुगली टाकली ज्याला साई सुदर्शन खेळू शकला नाही. कुलदीप आणि इतर खेळाडूंनी आऊटसाठी जोरदार अपील केली, परंतु अंपायर केयूर केलकरने ही अपील मान्य केली नाही. त्यानंतर लगेचच कुलदीपने कर्णधार अक्षर पटेलला डीआरएस घेण्यास सांगितले. तेव्हा कुलदीप यादव अंपायर जवळ येत म्हणाला की, 'जर अंपायर कॉल असेल तर पेल दूंगा, कारण असं होत नाही यार हे बरोबर नाही'. कुलदीप अंपायर सोबत वाद घालत असताना कर्णधार अक्षर पटेलने त्याला रोखलं आणि बाजूला घेतलं.
चंद पैसे क्या आ जाये ये सब अपनी औकात दिखा देते है मै इस वीडियो मै जो ये महानुभाव KuldeepYadav दिख रहे है
महेश सिंह जाट (TheRoyal_Jaat) May 19, 2025
देखो और सुनो गौर से वो क्या कह रहे है...
Field मै बदतमीज़ी आजकल आम बात हो गयी है DCvsGT Suriya46 BCCI pic.twitter.com/0oL81g4EAz
हेही वाचा : भारतीय संघाची Asia Cup 2025 मधून माघार? पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे मोठा निर्णय! अहवालात मोठा दावा
लागोपाठ 3 विजयांमुळे गुजरात टायटन्सचे 12 सामन्यांमध्ये 18 पॉईंट्स झाले होते. टीम पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन्ही 17-17 पॉईंट्सने प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 12 सामन्यात 13 पॉईंट्सने पाचव्या स्थानावर आहे, त्यामुळे प्लेऑफमध्ये जागा बनवणं त्यांच्यासाठी अवघड होत चाललंय.