Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कुलदीप यादवने इंस्टाग्रामवरून होणाऱ्या पत्नीचे फोटो केले डिलीट, 12 दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडा

Kuldeep Yadav :  कुलदीप यादवने वंशिका सोबत साखरपुडा झाल्यावर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचे काही फोटो शेअर केले होते. मात्र हे फोटो त्यानं आता आपल्या डिलीट केले आहेत. 

कुलदीप यादवने इंस्टाग्रामवरून होणाऱ्या पत्नीचे फोटो केले डिलीट, 12 दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडा

Kuldeep Yadav : भारताचा स्टार गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) काहीच दिवसांपूर्वी त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका सोबत विवाह केला. लखनऊमध्ये झालेल्या या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. साखरपुड्यानंतर कुलदीप यादव हा इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया सोबत गेला, जिथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार आहे. कुलदीप यादवने वंशिका सोबत साखरपुडा झाल्यावर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचे काही फोटो शेअर केले होते. मात्र हे फोटो त्यानं आता आपल्या डिलीट केले आहेत. 

4 जून रोजी कुलदीप यादव आणि वंशिका यांचा साखरपुडा लखनऊ येथे झाला होता. यात क्रिकेट विश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. डिलीट केलेल्या फोटोंमध्ये कुलदीप यादव ब्लॅक कोटमध्ये आणि त्याची होणारी पत्नी वंशिका व्हाईट वेस्टर्न गाऊनमध्ये दिसत होती. परंतू हे फोटो कुलदीपने त्याच्या इंस्टाग्रामवरून का डिलीट केले हे समोर आलेलं नाही. मात्र यावर त्याचे फॅन्स आणि नेटकरी विविध प्रश्न विचारत आहेत. सध्या कुलदीप यादव हा टीम इंडिया सोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. 20 जून पासून सुरु होणाऱ्या 5 टेस्ट सामन्यांसाठी तो संघासोबत सराव करतोय. आगामी इंग्लंड सीरिजमध्ये कुलदीप यादवची भूमिका अत्यंत महत्वाची असणार असून कारण तो सध्या संघातील अनुभवी गोलंदाज आहे. 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. 

कोण आहे कुलदीप यादवची होणारी पत्नी?

कुलदीप यादवची होणारी पत्नी वंशिका ही त्याची बालपणीची मैत्रीण आहे. दोघे कानपुरमध्ये लहानाचे मोठे झाले. वंशिका हिने ऑस्ट्रेलियामध्ये तिचं पदवीउत्तर शिक्षण घेतलं असून ती सध्या नोकरी करते. 

हेही वाचा : पुन्हा मौका मौका, 'या' दिवशी भिडणार भारत - पाकिस्तान, वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरीज  : 

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना - 20 ते 24 जून 
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना - 2 ते 6 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना - 10 ते 14 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना - 23 ते 27 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना - 31 जुलै ते 4 ऑगस्ट 

Read More