ICC Ranking : इंग्लंड दौऱ्यावर शेवटच्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला (Team India) रोमांचक विजय मिळवून देणाऱ्या भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक सर्वत्र होत आहे. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) या 5 सामन्यांच्या टेस्टमध्ये एकूण 23 विकेट घेतली तर यातील 9 विकेट त्याने शेवटच्या सामन्यात घेऊन भारताकडे विजय खेचून आणला. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळाला. पण आता आयसीसीची ताजी रँकिंग (ICC Ranking) समोर आली असून यात मोहम्मद सिराज हा आतापर्यंतच्या त्याच्या टेस्ट करिअरमधील सर्वात बेस्ट रँकिंगपर्यंत पोहोचला आहे. त्याने तब्बल 12 खेळाडूंना मागे सोडून हे स्थान मिळवलं आहे.
इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या अचूक गोलंदाजीच्या माऱ्याने बाद करणाऱ्या मोहम्मद सिराजला आयसीसीने एक मोठं गिफ्ट दिलंय. मोहम्मद सिराज टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये 15 व्या स्थानावर पोहोचला असून ही त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वात बेस्ट रँकिंग आहे. त्याच्याकडे 674 रेटिंग पॉईंट असून भारत - इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरी करून त्याने हे स्थान पटकावलं आहे. सिराजने टेस्ट रँकिंगमध्ये एवढी मोठी उडी घेतली की त्याने थेट 12 गोलंदाजांना मागे सोडलं आहे. यापूर्वी 2024 मध्ये सिराजने टेस्ट रँकिंगमध्ये 16 वं स्थान मिळवलं होतं.
जसप्रीत बुमराह टस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये नंबर 1 वर कायम आहे. त्याच्याकडे 889 रेटिंग पॉईंट्स आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर साऊथ आफ्रिकेचा कगिसो रबाडा असून त्याच्याकडे 851 रेटिंग पॉईंट्स आहेत. सिराज बुमराहनंतर आयसीसी रँकींगमध्ये भारताचा दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. तर भारतीय गोलंदाजांच्या टेस्ट रँकिंगमध्ये रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानी तर आयसीसी रँकिंगमध्ये 17 व्या स्थानी आहे.
हेही वाचा : आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? महत्वाची माहिती समोर, 'या' खेळाडूंचा असणार समावेश
जसप्रीत बुमराह (889 रेटिंग)
मोहम्मद सिराज (674 रेटिंग)
रवींद्र जडेजा (659 रेटिंग)
कुलदीप यादव (592 रेटिंग)
वॉशिंग्टन सुंदर (395 रेटिंग)
1. मोहम्मद सिराजची ICC टेस्ट रँकिंगमध्ये सध्याची स्थिती काय आहे?
मोहम्मद सिराज ICC टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये 15 व्या स्थानावर आहे, जे त्याच्या टेस्ट कारकीर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. त्याच्याकडे 674 रेटिंग पॉइंट्स आहेत.
2. सिराजने ICC टेस्ट रँकिंगमध्ये किती खेळाडूंना मागे टाकले?
सिराजने 12 गोलंदाजांना मागे टाकून ICC टेस्ट रँकिंगमध्ये 15 वे स्थान मिळवले आहे.
3. यापूर्वी मोहम्मद सिराजची सर्वोत्तम ICC टेस्ट रँकिंग काय होती?
2024 मध्ये सिराजने ICC टेस्ट रँकिंगमध्ये 16 वे स्थान मिळवले होते.
4. ICC टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कोण आहे?
जसप्रीत बुमराह 889 रेटिंग पॉइंट्ससह ICC टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.