Football : भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फुटबॉलमधील जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू लियोनल मेसी हा त्याच्या अर्जेंटिना या संघासोबत भारतात येणार आहे. 2025 मध्येच अर्जेंटिना संघाचा भारत दौरा असणार असून तब्बल 14 वर्षांनी मेस्सी भारतात येणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये लियोनल मेसी भारतात आला होता.
भारतात फ़ुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी एचएसबीसी इंडियाने अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशन सोबत करार केला आहे, या करारा अंतर्गत अर्जेंटीनाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ भारतात एक फ्रेंडली फुटबॉल मॅच खेळेल. एचएसबीसी इंडियाने सांगितले की, "अर्जेंटिनाची राष्ट्रीय फुटबॉल टीम ऑक्टोबर 2025 मध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी सामन्यात भारताचा दौरा करेल. या संघात स्टार खेळाडू लियोनल मेसी सुद्धा सामील आहे.
हेही वाचा : IPL 2025 मध्ये सर्व संघांनी खेळले एक-एक सामने, Points Table मध्ये कोण कितव्या स्थानी?
MESSI IS COMING TO INDIA
— Johns. (CricCrazyJohns) March 26, 2025
- Lionel Messi's Argentina will play an exhibition match in Kerala in October 2025. [Sportstar] pic.twitter.com/rByJFTcFak
लियोनल मेसी 2011 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. सप्टेंबर 2011 मध्ये अर्जेंटीना फुटबॉल संघाने कोलकाताच्या साल्ट लेक स्टेडियवर वेनेजुएला संघाविरुद्ध सामना खेळला होता. प्रेक्षकांनी गच्च स्टेडियमवर अर्जेंटीनाने 1-0 ने विजय मिळवला होता.
एचएसबीसी इंडियाने अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशन सोबत करार केल्यानुसार ऑक्टोबर 2025 मध्ये अर्जेंटिना संघ केरळ राज्यात एक सामना खेळेल. हा सामना केरळच्या कोच्ची येथे खेळला जाईल. एएफएचा के अध्यक्ष क्लाउडियो फॅबियन तापियाने या कराराला आंतरराष्ट्रीय विस्तारातील एक 'मैलाचा दगड' म्हटले आहे.
लियोनल मेसी याने त्याच्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीत क्लब आणि देशासाठी एकूण 854 गोल केले आहेत. तसेच मेसी हा पाच आणि सहा युरोपियन गोल्डन शूज जिंकणारा इतिहासातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत त्याने विक्रमी 45 सामूहिक ट्रॉफी जिंकल्या आहेत.