Lionel Messi In Wankhede : अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (lionel messi) हा जर हातात बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसला तर तुम्हाला कसं वाटेल? ही गोष्ट केवळ कल्पना नाही तर लवकरच सत्यात उतरणार आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला आता तुम्ही लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिग्गज क्रिकेटपटूंसोबत खेळताना पाहू शकणार आहात. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार लिओनेल मेस्सी डिसेंबर महिन्यात भारताचा दौरा करणार असून 13 ते 15 डिसेंबर दरम्यान तो मुंबई, कोलकाता आणि दिल्ली या भारतातील प्रमुख शहरांचा दौरा करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार 14 डिसेंबर रोजी मुंबईच्या ऐतिहासिक स्टेडियम वानखेडेवर सेवन अ साइड एक क्रिकेट सामना खेळेल. मेस्सी सोबत मैदानात दिग्गज क्रिकेटर्स सचिन तेंदुलकर, विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे सुद्धा खेळताना दिसू शकतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील एका सूत्राने दिलेली आहे.
एमसीएच्या सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देत सांगितलं, 'हो मेस्सी 14 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर एका इव्हेंटसाठी यायला तयार आहे. इव्हेंटच्या आयोजकांनी यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांना परवानगी सुद्धा मिळालीये. काही दिग्गज क्रिकेटर्स सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील.
हेही वाचा : खांद्यावर हात अन्.... आकशदीपने बेन डकेटला दिला असा सेंडऑफ, ICC करणार कारवाई?
38 वर्षांचा लिओनेल मेस्सी हा यापूर्वी फक्त एकदाच भारतात आलेला आहे. 2011 वेनेजुएलाच्या विरुद्ध फ्रेंडली सामना खेळण्यासाठी तो भारतात आला होता. कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर हा सामना झाला होता. लिओनेल मेस्सी हा 6 वेळा यूरोपियन गोल्डन शूज आणि 8 वेळा फीफा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. 2026 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सुद्धा तो भाग घेऊ शकतो.