Asia CUP 2023 IND vs NEP Live: एशिया कप 2023 स्पर्धेत आज पाचवा सामना खेळवला जात असून भारत आणि नेपाळ संघ आमने सामने आहे. हा सामना श्रीलंकेतल्या कँडी इथल्या पल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून नेपाळला पहिली फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे.
IND vs NEP Live :
पहिली फलंदाजी करणारा नेपाळचा संघ 230 धावांल ऑलाऊट झाला. भारतासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. भारतातर्फे मोहम्द सिराज आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली. लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळने भारतीय बॉलर्सचा चांगलाच घाम काढला. अनुभवी आणि दिग्गज गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाला नवख्या नेपाळने तब्बल 48 षटकापर्यंत झुंजायला भाग पाडलं. कुशाल भुर्तेल आणि आसिफ शेख या सलामीच्या जोडीने नेपाळला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 65 धावांची पार्टनरशिप केली. अखेर भारताच्या शार्दुल ठाकूरने पहिला धक्का दिला. दहाव्या षटकात शार्दुलने कुशाल भुर्तेलला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. कुशालने 38 धावा केल्या.
त्यानंतर नेपाळची मधली फळी झटपट बाद झाली. कर्णधार रोहित पौडेलसह भीम शार्की, कुशल मल्ला हे फलंदाजी लवकर बाद झाले. नेपाळचा संघ दोनशे धावांच्या आतच ऑलआऊट होणार असं वाटत असातनाच तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. गुलशन झा, दिपेंद्र सिगं, सोमपाल कामी या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत नेपाळ संघाला दोनशे धावांच्या पार नेऊन ठेवलं.
IND vs NEP Live :
पहिली फलंदाजी करणारा नेपाळचा संघ 230 धावांल ऑलाऊट झाला. भारतासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. भारतातर्फे मोहम्द सिराज आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
IND vs NEP Live :
नेपाळ संघाने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर एकामागोमाग एक विकेट गमवल्या. मोहम्मद सिराजने नेपाळला सहावा धक्का दिला. गुलशन झा 23 धावा करुन बाद झाला. सिराजची ही दुसरी विकेट ठरली
IND vs NEP Live :
नेपाळ संघाला चौथा धक्का बसला आहे. कुशाल मल्ला अवघ्या 2 धावांवर बाद झाला, रविंद्र जडजाने तिसरी विकेट घेतली. जडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने कुशल मल्लाची विकेट घेतली. 101 धावांवर चौथा धक्का बसला आहे.
IND vs NEP Live :
भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने नेपाळ संघाला तिसरा धक्का दिला आहे. नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल अवघ्या पाच धावा करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने रोहितचा पडौलचा झेल टिपला. नेपाळ संघाने 93 धावांवर 3 विकेट गमावल्या आहेत.
IND vs NEP Live :
नेपाळ संघाला दुसऱा धक्का बसला आहे. भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाना नेपाळ संघाला दुसरा धक्का दिला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या भीम शार्कीला जडेजाने क्लीन बोल्ड केलं. भीम शार्कीने 7 धावा केल्या. नेपाळ संघाने 77 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत.
IND vs NEP Live :
पहिली फलंदाजी करणाऱ्या नेपाळ संघाला पहिला धक्का बसला आहे. कुशाल भुर्तेल आणि आसिफ शेख या सलामीच्या जोडीने नेपाळला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 65 धावांची पार्टनरशिप केली. अखेर भारताच्या शार्दुल ठाकूरने पहिला धक्का दिला. दहाव्या षटकात शार्दुलने कुशाल भुर्तेलला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. कुशालने 38 धावा केल्या.
IND vs NEP Live :
पहिली फलंदाजी करणाऱ्या नेपाळ संघाने सावध फलंदाजी करत चांगली सुरुवात केली आहे. कुशाल भुर्तेल आणि आसिफ शेख या सलामीच्या जोडीने पहिल्या सहा षटकातच पन्नास धावांचा टप्पा पार केला. भारताचं क्षेत्ररक्षण अतिशय ढिसाळ झालं. सुरुवातीच्या दोन षटकातच दोन झेल सोडले. सुरुवातीच्याच षटकात विराट कोहलीने हातातला सोपा झेल सोडला. तर मोहम्मद सिराजच्या षटकात स्लिपमध्ये एक झेल सोडला
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी
India vs Nepal Live Streaming Ball by Ball Updates: एशिया कप 2023 स्पर्धेत आज पावचा सामना भारत आणि नेपाळदरम्यान खेळवला जात आहे. ग्रुप ए मधला हा शेवटचा सामना आहे. सुपर-4 मध्ये जागा पटकावण्यासाठी दोन्ही संघाना हा सामना जिंकणं आवश्यक आहे. श्रीलंकेच्या पल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमध्ये हा सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानविरुद्ध नेपाळला पहिल्या सामन्यात दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. तर त्यामुळे नेपाळच्या संघाचे शुन्य गुण आहेत. तर भारत आणि पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारताच्या खात्यात एक गुण जमा झाला आहे. भारताने हा सामना जिंकल्यास थेट सुपर फोरमध्ये एन्ट्री होणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.