Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2024 DC vs CSK highlights : चेला पडला गुरूवर भारी, दिल्लीने चेन्नईला दिली 20 धावांनी मात

IPL 2024 : आयपीएल 2024 चा 13 वी मॅच ही चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईचे होमग्राउंड असलेल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर नसून, विशाखापट्टनमच्या वाय एस राजशेखर रेड्डी एसीए विडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.   

 IPL 2024 DC vs CSK highlights :  चेला पडला गुरूवर भारी, दिल्लीने चेन्नईला दिली 20 धावांनी मात
LIVE Blog

IPL 2024 : आयपीएल 2024 चा 13 वी मॅच ही चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईचे होमग्राउंड असलेल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर नसून, विशाखापट्टनमच्या वाय एस राजशेखर रेड्डी एसीए विडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. 

चेन्नई ही आपली मागील दोघं मॅच जिंकत चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर दिल्ली कॅपिटल्स आपले मागील दोघं सामने हारले आहेत. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आजच्या गुरू-शिष्याच्या सामन्यात कोण बाजी मारणार धोनी की पंत?

31 March 2024
31 March 2024 23:25 PM

दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला 20 धावांनी मात दिली,  पण शेवटच्या दोन ओव्हरीमध्ये एम एस धोनीने मैदानावर येऊन आपल्या फलंदाजीने साऱ्या फॅन्सचे मन जिंकले आहेत.

31 March 2024 23:03 PM

16 व्या ओव्हरमध्ये शिवम दूबेच्या स्वरूपात चेन्नईने सहावी विकेट गमावली आहे. मूकेश कुमारच्या बॉलिंगवर शिवम दुबे हा 18 धावा करून आऊट झाला.

31 March 2024 22:50 PM

15 व्या ओव्हरनंतर दिल्लीने मॅचमध्ये पकड बनवलेली आहे. चेन्नईकडून जडेजा आणि दुबे मैदानावर खेळत आहेत आणि सीएसकेचा स्कोर 113-5 असा आहे.

31 March 2024 22:42 PM

मूकेश कुमारच्या 14 व्या ओव्हरमध्ये चेन्नईने सेट दिसत असणाऱ्या अजिंक्य रहाणेची विकेट गमावलेली आहे, आणि यासोबतच लगेचच नंतरच्या बॉलवर समीर रिजवीला पण तबूत चालत केलं आहे. 

31 March 2024 22:25 PM

अक्षर पटेलने 11 व्या ओव्हरमध्ये दिल्लीसाठी डोकेदुखी ठरत असणाऱ्या डॅरेल मिचेलला 34 वर स्वतःच कॅच आऊट केलं आहे.

31 March 2024 22:14 PM

10 ओव्हरनंतर चेन्नईने रहाणे आणि मिचेलच्या भागीदारीमूळे 75-2 पर्यंत मजल मारलेली आहे. रहाणे हा 33 तर मिचेलपण 33 वर नाबाद असून दिल्लीसाठी डोकेदुखी बनत आहे.

31 March 2024 21:52 PM

पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नईला फार स्लो स्टार्ट मिळाला आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांसमोर फार कसून बॉलिंग केली आहे आणि सीएसकेचा स्कोर 23-2 थांबवून ठेवला आहे

31 March 2024 21:46 PM

खलील अहमदने परत एकदा सीएसकेला दुसरा धक्का दिला आहे. रचिन रविंद्र जो फार हळू खेळत होता, खलीलच्या गोलंदाजीवर तो 12 बॉलमध्ये केवळ 2 धावा बनवून आऊट झाला आहे.

31 March 2024 21:36 PM

चेन्नईने पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन ऋतुराजजी विकेट गमावली आहे. खलील अहमदच्या गोलंदाजीवर पंतने कॅच घेत गायकवाडला मात्र 1 च्या स्कोरवर बाद केलं.

31 March 2024 21:18 PM

20 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेला 192 धावांचे लक्ष दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून ऋषभ पंतने आपल्या गुरूसमोर एक धमाकेदार खेळी करत डिसीला एका चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचवले आहे. दिल्लीकडून पृथ्वीने 43, वार्नरने 52, तर ऋषभ पंतने 4 चौके आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावांची ताबडतोब इनिंग खेळली आहे. चेन्नईकडून पथिरानाने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 विकेट झटकल्या आहेत, तर जडेजा आणि मुस्ताफिजूरला एक-एक विकेट मिळाली आहे. 

चेन्नईची संपूर्ण फलंदाजी चांगल्या फॉर्ममध्ये असून, दिल्लीच्या गोलंदाजीसाठी आज मोठं आव्हान असणार आहे, तर बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आज गुरू शिष्यावर भारी पडतो की, शिष्य गुरूवर?   

31 March 2024 20:47 PM

चेन्नईचा फास्ट बॉलर मथिशा पथिराना याने 15 व्या ओव्हरमध्ये दिल्लीची कंबर मोडत मार्श आणि स्टब्सला तंबूत परत पाठवलं आहे. 15 व्या ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोर 134-4 असा होता.

31 March 2024 20:28 PM

पहिल्या विकेटनंतर लगेचच रविंद्र जडेजाच्या 11 व्या ओव्हरमध्ये शॉ ला 43 धावांवर बाद केलं आहे. पृथ्वी शॉच्या विकेटनंतर मिचेल मार्श हा फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

31 March 2024 20:23 PM

10 व्या ओव्हरमध्ये मुस्ताफिजूरच्या गोलंदाजीवर मथिशा पथिराणाने वॉर्नरनचा एका हातात भन्नाट कॅच पकडून 52 धावांवर तंबूत पाठवलं आहे.

31 March 2024 20:17 PM

दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज ओपनर डेविड वॉर्नरने फक्त 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं आहे.

31 March 2024 19:54 PM

दिल्लीचे ओपनर्स वॉर्नर-शॉ यांनी संघाला ताबडतोब सुरूवात दिलेली आहे. पाच ओव्हरनंतर दिल्ली 42-0 आहे, त्यात वॉर्नर 30 तर पृथ्वी शॉ  12 वर नाबाद आहे

31 March 2024 19:33 PM

CSK vs DC toss update : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.

Delhi Capitals XI - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद. 

Chennai Super Kings XI -  ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिझूर रहमान. 

Read More