Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Score in Marathi : चेन्नईच्या चिंदमबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने असणार आहेत. कोलकाता संघ आतापर्यंतच्या आयपीएल 2024 सामन्यात अजेय आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या 17 व्या हंगामात आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले असून या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईला गेल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करेल.
न्नई सुपर किंग्सने केकेआरविरूद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने 67 धावांची कप्तानी खेळी खेळून सीएसकेला सोपा विजय मिळवुन दिला आहे. फलंदाजीत चेन्नईकडून मिचेलने 25, दुबेने 28 धावा करत केकेआरला एकतर्फी पराभूत केलं आहे. गोलंदाजीत केकेआरकडून निराशाजनक प्रदर्शन झाले, वैभव अरोरा याने 2 तर, सुनील नरेनने 1 विकेट घेतली आहे.
या विजयामुळे चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये मजबूत स्थितीत आली आहे, तर केकेआरला या सीझनमध्ये पहिला पराभव मिळाला आहे.
15 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्स चा स्कोर 115-2 असा आहे. ऋतुराजने एक बाजू सांभाळून ठेवल्याने चेन्नई आता भक्कम स्थितीत आहे. शिवम दुबेसुद्धा चांगली फटकेबाजी करत आहे.
सुनील नारायणच्या 13 व्या ओव्हरमध्ये सेट दिसत असणाऱ्या डॅरेल मिचेलला 25 धावांवर बाद केलं आहे. मिचेलच्या विकेटनंतर इन फॉर्म शिवम दुबे हा फलंदाजीसाठी आला आहे.
12 व्या ओव्हरमध्ये सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं 45 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गायकवाडच्या या अर्धशतकात सात चौके सामील आहे.
10 ओव्हरनंतर चेन्नईने या सामन्याचे पारडे आपल्या बाजूला केलं आहे. सीएसके 10 ओव्हरनंतर 81-1 अशा स्थितीत आहे. मिचेल आणि गायकवाड यांच्यात 54 धावांची भागीदारी झाली आहे.
५ व्या ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 41-1 असा आहे. ऋतुराज गायकवाड हा 23 वर खेळत असून, डॅरेल मिचेल हा 1 वर खेळत आहे. या दोघं फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी होत असून, केकेआरला मॅचमध्ये परत येण्यासाठी विकेटची गरज आहे
वैभव अरोराच्या चौथ्या ओव्हरमध्ये चेन्नईचा ओपनर रचिन रविंद्र 15 धावा बनवुन बाद झाला आहे. पहिल्या विकेटनंतर डॅरेल मिचेल हा फलंदाजीसाठी आला आहे.
20 ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नईसमोर जिंकण्यासाठी 138 धावांचे आव्हान आहे. केकेआरकडून आज साधारण फलंदाजीचे प्रदर्शन बघायला मिळाले, नरेनने 27, रघुवंशीने 24, तर श्रेयस अय्यरच्या 34 धावांच्या मदतीने कोलकाता 137 धावांपर्यंत पोहोचली आहे. चेन्नईच्या गोलंदाजांनी आज उत्तम प्रदर्शन करत केकेआरच्या घातक फलंदाजीला चूप ठेवले. जडेजा, तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 3, तर मुस्ताफिजूर आणि तीक्षणाने क्रमशः 2 आणि 1 विकेट घेतल्या आहेत.
तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, चेन्नईच्या या बॉलिंग पिचवर केकेआरच्या स्पिनरांची बॉलिंग चालणार, की चेन्नईचे फलंदाज या मॅचला आपल्या बाजूला खेचणार?
19 व्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेने घातक दिसत असणाऱ्या आंद्रे रसलला 10 च्या स्कोरवर तंबूत परत पाठवलं आहे, याआधी मुस्ताफिजूरच्या गोलंदाजीवर धोनीने रसलचा सोपा कॅच सोडला होता.
तुषार देशपांडेच्या 17 व्या ओव्हरमध्ये केकेआरला मोठा धक्का बसला आहे. रिंकू सिंग हा केवळ 9 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. आंद्रे रसल हा रिंकूच्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आला आहे.
15 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकेआर 99-5 च्या स्थितीत आहे. श्रेयस आणि रिंकू हे दोघं सांभाळून कोलकाताच्या इनिंगला पूढे नेत आहेत. रिंकू 4 वर, तर श्रेयस 20 धावांवर वर खेळत आहे.
महेश तिक्षणाच्या 12 व्या ओव्हरमध्ये रमनदीप सिंग हा 13 धावा बनवुन क्लिन बोल्ड झाला आहे, कोलकाताची परिस्थिती अजून विकट होत आहे, पाचव्या विकेटनंतर रिंकू सिंग हा मैदानात फलंदाजीसाठी आला आहे.
11 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 77-4 असा आहे. रमनदीप 6 धावांवर तर श्रेयस अय्यर 10 धावांवर खेळत आहे. केकेआरला येथून एक चांगल्या भागीदारीची गरज आहे.
रविंद्र जडेजाने केकेारच्या वेंकटेश अय्यरला बाद करत 9 व्या ओव्हरमध्ये कोलकाताची चौथी विकेट घेत केकेआरची कंबर मोडली आहे. चौथ्या विकेटनंर रमनदीप सिंग हा फलंदाजी साठी आला आहे, या आधी जडेजाने सुनील नरेनला 27 धावांवर कॅच आऊट केलं होतं.
पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर केकेआरकडून रघुवंशी-नारायण या दोघांनी इनिंगला सांभाळलं आहे. 5 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोर 50-1 असा आहे
तुषार देशपांडेच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉललाच फिल सॉल्ट कॅच आऊट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर अगक्रिश रघुवंशी फलंदाजीसाठी आला आहे.
सीएसकेचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
सीएसके प्लेइंग 11 -
फिलिप सॉल्ट (W), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
केकेआर प्लेइंग 11 -
ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना
चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने झाले आहेत. त्यापैकी 18 सामने चेन्नईने जिंकले आहेत. कोलकाताने 10 सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीपासून चेन्नईने कोलकाताच्याविरुद्धातील दोन्ही लीग सामने कधीही गमावले नाहीत. आयपीएल 2012 मध्ये, दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने होते. तर KKR ने 5 गडी राखून विजय नोंदवला आणि त्यांची पहिली IPL ट्रॉफी जिंकली.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.