Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

CSK vs PBKS Live Score, IPL 2024 : पंजाब किंग्सकडून, चेन्नईचा धुव्वा, सीएसकेचा 7 विकेट्सने पराभव

CSK vs PBKS Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 49 व्या सामन्यात चेन्नईच्या होमग्राउंडवर चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. 

CSK vs PBKS Live Score, IPL 2024 : पंजाब किंग्सकडून, चेन्नईचा धुव्वा, सीएसकेचा 7 विकेट्सने पराभव
LIVE Blog

Chennai Super Kings vs Punjab Kings Match Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एकूण 9 सामन्यांपैकी सीएसकेने 5 सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये 10 गुणांसोबत चौथ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्सच्या संघासाठी आज करो किंवा मरोची स्थिती होणार आहे. जर पंजाब किंग्स आजचा सामना हरली तर त्यांचाही मुंबई आणि बंगळुरूसारखे हाल होणार आहे, म्हणून आजचा सामना पंजाब किंग्ससाठी खूप महत्वाचा असणा आहे.  

01 May 2024
01 May 2024 23:28 PM

पंजाब किंग्सने 7 विकेट्सने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध, सीएसकेच्या होमग्राउंडवर पराभूत केलं आहे. या विजयासोबतच पंजाबने गुजरात टायटन्सला मागे टाकत पॉइंट्स टेबवलमध्ये 2 महत्वाचे पॉइंट्स घेत टेबलमध्ये 7 व्या स्थानावर उडी घेतली आहे. या विजयामुळे अजूनही पंजाबच्या प्लेऑफच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत.

01 May 2024 23:01 PM

15 ओव्हरनंतर पंजाब किंग्सचा स्कोर 135-3 असा आहे. शशांक सिंग हा 13 धावांवर, तर सॅम करन हा 16 धावांवर खेळतोय. या स्थितीतून पंजाबला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे.

01 May 2024 22:44 PM

13 व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकुरने राईली रूसोला 43 धावांवर आउट केलं आहे. सेट दिसत असलेला रुसो हा दुर्देवाने फूल टॉस बॉलवर आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर सॅम करन हा फलंदाजीसाठी आलाय.

01 May 2024 22:29 PM

10 व्या ओव्हरमध्ये पंजाबचा जॉनी बेयरस्टो हा शिवम दुबेच्या गोलंदाजीवर 46 धावांवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर शशांक सिंग हा फलंदाजीसाठी आला आहे. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर पंजाबचा स्कोर 96-2 असा आहे.

01 May 2024 22:05 PM

5 ओव्हरनंतर चेन्नईसुपर किंग्सचा स्कोर 39-1 असा आहे. जॉनी बेयरस्टो हा 8 धावांवर, तर राईली रुसो हा धावांवर 13 फलंदाजी करतोय. चेन्नईला सामन्यात परत येण्यासाठी आता विकेट्सची गरज आहे.

01 May 2024 21:59 PM

चौथ्या ओव्हरमध्ये रिचर्ड ग्लिसन याने पंजाबच्या प्रभसिमरन सिंगला 13 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर राईली रूसो हा फलंदाजीसाठी आला आहे.

01 May 2024 21:26 PM

20 ओव्हरच्या सनाप्तीनंतर चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्ससमोर 163 धावांचे आव्हान दिलं आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने 62 धावांची उत्कृष्ट खेळी खेळलीये, तर रहाणेने त्याचे साथ देत 29 धावांची खेळी खेळली आहे. पंजाबकडून गोलंदाजीत राहूल चहर आणि हरप्रीत ब्रार या दोघं स्पिनर्सने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत. तर अर्शदीप सिंग आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत. 

तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, चेन्नईच्या किल्यामध्ये पंजाब किंग्सचे फलंदाज धावांना चेज करू शकतात की चेन्नईचे गोलंदाज पंजाबची गाडी 167 धावांच्या आधी थांबवणार.

01 May 2024 21:09 PM

18 व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाड 62 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून आउट झाला आहे. पाचव्या विकेटनंतर एम एस धोनी हा फलंदाजीसाठी आला आहे.

01 May 2024 20:57 PM

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 44 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. या इनिंगमध्ये गायकवाडने एकूण 5 चौकार आणि 1 षटकार मारले आहेत.

01 May 2024 20:48 PM

16 व्या ओव्हरमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चौथा धक्का लागला आहे. समीर रिझवी हा 21 धावांवर आउट झालाय, तर मोईन अली हा फलंदाजीसाठी आला आहे.

01 May 2024 20:44 PM

15 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सचा स्कोर 102-3 असा आहे. ऋतुराज गायकवाड हा कप्तानी खेळी खेळत असून तो 43 धावांवर खेळतोय, तर समीर रिझवी हा 17 धावांवर खेळत आहे.

01 May 2024 20:22 PM

10 व्या ओव्हरमध्ये चेन्नईला परत एक झटका लागला आहे. राहूल चहरच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजा हा 2 धावांवर आउट झाला आहे, तर आता इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समीर रिझवी फलंदाजीसाठी आलाय, 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नईचा स्कोर 71-3 असा आहे.

01 May 2024 20:13 PM

हरप्रीत ब्रारच्या 9 व्या ओव्हरमध्ये पहिल्या विकेटनंतर लगेचच नंतरच्या बॉलवर शिवम दुबे हा आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर रविंद्र जडेजा हा फलंदाजीसाठी आला आहे.

01 May 2024 20:09 PM

9 व्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणे हा 29 धावांची एक चांगली खेळी खेळून हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. पहिल्या विकेटनंतर शिवम दुबे हा फलंदाजीसाठी आलाय. 

01 May 2024 19:53 PM

5 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सचा स्कोर 37-0 असा आहे. अजिंक्य रहाणे हा 12 धावावर खेळत असून, ऋतुराज गायकवाड हा 24 धावांवर खेळतोय.

01 May 2024 19:04 PM

PBKS vs CSK : पंजाब किंग्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

PBKS प्लेइंग 11 -

जॉनी बेअरस्टो, सॅम करन (C), रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (W), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

CSK प्लेइंग 11 -

अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड(C), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी(W), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान

01 May 2024 17:14 PM

CSK vs PBKS संभाव्य प्लेइंग 11 -

CSK प्लेइंग 11 - 

अंजिक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (C), डॅरिल मिशेल, मोइन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (W), दिपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजूर रहमान, मथिशा पथिराना

PBKS प्लेइंग 11 -

प्रभसिमरन सिंग,जॉनी बेअरस्टो, राइली रुसो , जितेश शर्मा (W), सॅम करन (C), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड, हर्षल पटेल,कगिसो रबाडा, हरप्रीत सिंग

 

 

 

 

 

01 May 2024 17:13 PM

CSK vs PBKS head to head -

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि पंजाब हे दोघं संघ एकूण 28 वेळेस आमनेसामने आले आहेत, यातून चेन्नईने 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाबने सीएसकेला चांगले आव्हान देत 13 सामने जिंकलेले आहेत. तर आज कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं आवश्यक होणार आहे. 

Read More