Delhi Capitals vs Gujarat Titans Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा हाल थोडा बेहाल झालेला आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळलेले आहेत आणि त्यातून फक्त 3 सामने डिसी जिंकू शकलेली आहे. तर गुजरात टायटन्सचे हाल पण दिल्लीसारखेच आहेत, गुजरातच्या संघाचे प्रदर्शनसुद्धा एवढे खास राहिलेले नाही. गुजरात टायटन्सने आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात फक्त 4 सामने जिंकलेले आहेत. तर आज दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये कोणता संघ वरचढ ठरेल हे बघण्यायोग्य असणार आहे.
डेविड मिलरच्या विकेटमुळे गुजरातच्या जिंकण्याच्या आशा आता पूर्णपणे संपल्या आहेत, कारण 18 व्या ओव्हरमध्ये मिलर हा 55 धावांवर आउट झाला आहे.
गुजरातच्या डेविड मिलरने अजूनही जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. 17 व्या ओव्हरमध्ये मिलरने 21 बॉलमध्ये 5 चौके आणि 3 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
कुलदीप यादवच्या 16 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा धाकड फलंदाज राहूल तेवतिया हा फक्त 4 धावा करून आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर गुजरातच्या जिंकण्याच्या आशा थोड्या कमी झाल्या आहेत, तरी मिलर हा अजूनही नाबाद आहे.
15 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 147-5 असा आहे. डेविड मिलर आणि राहूल तेवतिया हे दोघं फलंदाज मैदानावर फलंदाजी करतायेत, गुजरातला या स्थितीतून 30 बॉलमध्ये 78 रन जिंकण्यासाठी लागत आहे.
रसिख सलामने 15 व्या ओव्हरमध्ये शाहरूख खानला 8 धावांवर आउट केलं आहे. पाचव्या विकेटनंतर राहूल तेवतिया हा फलंदाजीसाठी आला आहे.
13 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा भरवश्याचा फलंदाज साई सुदर्शन हा 65 धावांवर बाद झाला आहे. गुजरातला आता 42 बॉलमध्ये 98 धावांची गरज आहे, तर चौथ्या विकेटनंतर शाहरूख खान हा फलंदाजीसाठी आला आहे.
10 व्या ओव्हरमध्ये गुदरातला मोठा धक्का बसला आहे, सेट फलंदाज वृद्धिमान साहा हा 39 धावांवर कुलदिप यादवच्या बॉलिंगवर आउट झाला आहे. तर 10 व्या ओव्हरमध्येच साई सुदर्शनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे आणि 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरातचा स्कोर 98-2 असा आहे.
5 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 60-1 असा आहे. वृद्धिमान साहा हा 31 धावांवर खेळतोय, तर साई सुदर्शन हा 22 धावांवर नाबाद आहे, या स्थितीतून गुजरातला 90 बॉलमध्ये 165 धावांची गरज आहे.
दुसऱ्या ओव्हरमध्ये, नॉर्खियाने गुजरातचा कॅप्टन शुभमन गिल याला 6 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर साई सुदर्शन हा फलंदाजीसाठी आला आहे.
20 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सने, गुजरात टायटन्ससमोर 225 धावांचे आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून अक्षर पटेल याने 66 धावांची दमदार इनिंग खेळलीये, तर डिसीचा कॅप्टन ऋषभ पंत यानेसुद्धा 88 धावांची नाबाद खेळी खेळली आहे. तर शेवटी ट्रिस्टन स्टब्स याने फटकेबाजी करून 27 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले आहे. गुजरातकडून संदिप वॉरिअरने सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्याये, तर नूर अहमदने एक विकेट घेतलेली आहे.
तर आता गुजरात टायटन्स चे फलंदाज ह्या 224 धावांचा डोंगराला कसे पार करतात हे बघण्यायोग्य ठरणार आहे.
17 व्या ओव्हरमध्ये नूर अहमदच्या गोलंदाजीवर अक्षर पटेल हा 66 धावांवर आउट झाला आहे. अक्षरच्या विकेटनंतर ट्रिस्टन स्टब्स हा फलंदाजीसाठी आला आहे. ऋषभ पंत याने 34 बॉलमध्ये आपलं अर्धशतकसुद्धा पूर्ण केलं आहे.
15 ओव्हरमध्ये दिल्लीचा ऑलराउंडर अक्षर पटेल यानं 37 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. अक्षरने आपल्या या इनिंगमध्ये एकूण 5 चौकार आणि 2 षटकार लावले आहेत, तर 15 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोर 127-2 असा आहे.
10 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर 80-3 असा आहे. ऋषभ पंत हा 12 तर अक्षर पटेल हा 26 धावांवर खेळत आहे. अक्षर आणि ऋषभच्या भागीदारीने दिल्लीच्या फलंदाजीला सांभाळलेलं आहे.
6 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर 44-3 असा आहे. शे होप हा 5 धावांवर वॉरिअरच्याच गोलंदाजीवर आउट झाला आहे. तर तिसऱ्या विकेटनंतर दिल्लीचा कॅप्टन अक्षर पंत हा फलंदाजीसाठी आला आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिल्लीचा स्कोर 44-3 असा आहे.
संदीप वॉरिअरने फ्रेजरनंतर लगेचच चौथ्या ओव्हरमध्येच पृथ्वी शॉला नूर अहमदच्या कमालीच्या कॅचमुळे 11 धावांवर आउट केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर शे होप हा फलंदाजीसाठी आला आहे.
चौथ्या ओव्हरमध्ये संदीप वॉरिअरच्या गोलंदाजीवर दिल्लीचा धाकड फलंदाज फ्रेजर मॅक्गर्क हा 23 धावांवर बाद झाला आहे. पहिल्या विकेटनंतर अक्षर पटेल हा फलंदाजीसाठी आला आहे.
गुजरात टायटन्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
GT प्लेइंग 11 -
ऋद्धिमान साहा(W), शुभमन गिल(C), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर
DC प्लेइंग 11 -
पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (W/C), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार
DC vs GT head to head -
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हो दोघं संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 4 वेळेस आमनेसामने भिडले आहेत, त्यातून दिल्लीने 2, तर गुजरातच्या संघाने पण 2 सामने जिंकत एकमेकांना कडी टक्कर दिलीये, तर आजच्या सामन्यात कोण बाजी मारून पूढे जाणार हे बघण्यायोग्य ठरणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.