Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Score in Marathi: ऋषभ पंतच्या दिल्लीसमोर, पॅट कमिन्सच्या हैदराबादचे आव्हान असणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल 2024 मध्ये अगदी वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. या सिजनमध्ये हैदराबादने तगड्या चेन्नईला, मुंबईला आणि बंगळुरूला पराभूत केले आहे, तर पॉइंट्स टेबलमध्ये पण सनरायजर्सचा संघ 8 पॉइंट्ससोबत चौथ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 6 पॉइंट्सोबत सहाव्या क्रमांकावर आहे. आज अरूण जेटली स्टेडियमवर साऱ्या दर्शकांचे लक्ष हैदराबादच्या फलंदाजीवर असणार तर दिल्लीचे लक्ष सनरायझर्सच्या फलंदाजाना रोखण्यावर, तर अशात बघण्यायोग्या गोष्ट असणार की आजच्या या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार?