IPL 2023 KKR vs GT : कोलकाताने दिलेल्या 180 धावांचं आव्हान पार करताना गुजरात टायटन्सने दणक्यात विजय नोंदवला आहे. रहमानउल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर कोलकाताने 179 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना शुभम गिल (Shubman Gill), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), विजय शंकर (Vijay Shankar) आणि डेव्हिड मिलरच्या जोरावर गुजरातने अवघड असा विजय पार केला. गुजरातच्या वतीने मोहम्मद शमीने तीन विकेट घेतल्या.