Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IND vs AUS LIVE Score : ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन टीम इंडिया चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

IND vs AUS Semi-Final Live Score Updates in Marathi: मंगळवारी पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी झाला. यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

IND vs AUS LIVE Score : ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन टीम इंडिया चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
LIVE Blog

Champion Trophy 2025, India vs Australia LIVE Scorecard and Updates: मंगळवारी पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी झाला. यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

04 March 2025
04 March 2025 21:42 PM

 ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन टीम इंडिया चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

मंगळवारी पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी रंगला. यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्ड कपचा वचपा काढला. या लढतीसह टीम इंडिया चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. फायनल सामना हा 9 मार्चला रंगणार आहे. 

 

04 March 2025 21:11 PM

भारताला पाचवा धक्का! 42 व्या ओव्हरला विराट कोहलीची विकेट

टीम इंडियाला मोठा झटका लागला असून किंग कोहली म्हणजे विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने 98 बॉलमध्ये 84 रन्स केले. 

 

04 March 2025 20:09 PM

भारताला चौथा धक्का! 35 व्या ओव्हरला अक्षर पटेलची विकेट 

भारत - ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्यात भारताच्या फलंदाजीची 35 वी ओव्हर सुरु असताना भारताचा स्टार फलंदाज अक्षर पटेलची विकेट पडली आहे. अक्षर पटेलच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला असून यापूर्वी रोहित, गिल आणि श्रेयस अय्यर यांना बाद करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. अक्षर पटेलने 30 बॉलमध्ये 27 धावा केल्या. 

04 March 2025 20:07 PM

भारताने तिसरी विकेट गमावली, श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतला 

भारत - ऑस्ट्रेलिया सेमी फायनल भारताला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिल आहे. भारताने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या रूपाने दोन विकेट्स गमावल्या होत्या. मात्र आता श्रेयस अय्यर सुद्धा बाद झाला असून भारताला तिसरा धक्का पोहोचला आहे. श्रेयस अय्यरने 62 बॉलमध्ये 45 धावा केल्या. तिसरी विकेट पडली तेव्हा भारताची धावसंख्या 134 होती. 

04 March 2025 18:52 PM

भारताला पहिला धक्का, शुभमन गिल स्वस्तात बाद... 

04 March 2025 17:59 PM

ऑस्ट्रेलिया ऑल आउट! भारतासमोर फायनल गाठण्यासाठी 265 धावांचं लक्ष

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत - ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामना दुबईत खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 264 धावा करून भारताला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताने हे टार्गेट पूर्ण केल्यास ते ऑस्ट्रेलियाला हरवून सेमी फायनलमध्ये पोहोचतील. 

04 March 2025 17:50 PM

श्रेयस अय्यरचा जबरदस्त थ्रो! ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट

भारत - ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट घेण्यात भारताला यश आलं आहे. श्रेयस अय्यरने ॲलेक्स कॅरी आणि ॲडम झाम्पाहे दोन धावा घेण्यासाठी धाव घेत असताना श्रेयस अय्यरने स्टंपवर अचूक मारा करून ॲलेक्स कॅरीला रन आउट केलं आहे. 

04 March 2025 17:38 PM

ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का! वरुणने ऑस्ट्रेलियाच्या बेन द्वारशुइसला केलं बाद 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सेमी फायनल सामना दुबईत खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने ऑस्ट्रेलियाच्या बेन द्वारशुइसची विकेट घेतली आणि सातव्या फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये धाडले. बेन द्वारशुइसने 29 बॉलमध्ये 19 धावा केल्या होत्या. 

04 March 2025 17:05 PM

बापूचा अचूक मारा, ग्लेन मॅक्सवेलच्या दांड्या गुल, ऑस्ट्रेलियाची 6 वी विकेट 

भारत - ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्यात अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला बाद केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलने 5 बॉलवर 7 धावा केल्या होत्या मात्र 37.3 ओव्हरला अक्षरने अचूक मारा करून त्याचे स्टंप उडवले. यामुळे ऑस्ट्रेलियाची ६ वी विकेट घेण्यात भारताला यश आले. 

04 March 2025 17:04 PM

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, कर्णधार स्टीव्ह स्मिथ झाला बाद 

भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यात मोहम्मद शमीला दुसरं यश मिळालं असून त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला बाद केलं आहे. स्टीव्ह स्मिथ याने 96 बॉलमध्ये 73 धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथच्या रूपाने ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट घेण्यात भारताला यश मिळालं आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 37 ओव्हरवर 199 धावा आणि 5 विकेट्स असा आहे. 

04 March 2025 16:08 PM

सर जडेजाचा ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का! जोश इंग्लिस अवघ्या काही धावा करून माघारी 

भारत ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्यात रवींद्र जडेजाने 23 व्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट घेतली. तर २७ व्या ओव्हरला फलंदाज जोश इंग्लिसची ही विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. यावेळी ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जोश इंग्लिस बाद झाला. जोश इंग्लिसने 12 बॉलमध्ये 11 धावा केल्या होत्या. 

04 March 2025 16:08 PM

रवींद्र जडेजाने घेतली ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट, लाबुशेन पॅव्हेलियनमध्ये 

भारत ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्यात रवींद्र जडेजाने 23 व्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट घेतली. यावेळी ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन याला बाद केले. मार्नस लाबुशेनने 36 बॉलमध्ये 29 धावा केल्या होत्या. 

04 March 2025 15:48 PM

भारताच्या बॉलिंग अटॅक समोर, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 100 पार 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्यात भारताच्या बॉलिंग अटॅक समोर ऑस्ट्रेलियाने 21 व्या ओव्हर पर्यंत 100 हुन अधिक धावा केल्या. दरम्यान भारताला ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामी फलंदाजांना बाद करण्यात यश आले. 

04 March 2025 15:18 PM

भारताला मिळाले मोठं यश

भारताला मिळाले मोठं यश मिळालं आहे. ट्रेव्हिस हेडची विकेट वरून चक्रवर्तीने घेतली आहे.

04 March 2025 14:49 PM

टीम इंडियाला पहिले यश मिळाले आहे. शमीने कॉनोलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. 

 

04 March 2025 14:19 PM

IND VS AUS Live Updates : सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस पाहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

Champions Trophy 2025 : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस पार पडला असून हा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. 

सविस्तर वाचा -  ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, सेमीफायनल जिंकण्यासाठी रोहितने 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी

 

04 March 2025 12:38 PM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामना

1998: भारत ४४ धावांनी विजयी (ढाका)
2000: भारत 20 धावांनी विजयी (नैरोबी)
2006: ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सने जिंकला (मोहाली)
2009: कोणताही निकाल नाही (सेंच्युरियन)

04 March 2025 11:21 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: भारताने सलग 13 वेळा नाणेफेक गमावली

भारताने सलग 13 वेळा नाणेफेक गमावली आहे. गोष्ट रणनीतीवर परिणाम करू शकते. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी निवडू शकतो.

04 March 2025 11:16 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: कोहली, रोहित आणि जडेजा यांना शेवटचा चान्स?

T20 आंतरराष्ट्रीय मधून आधीच निवृत्त झालेल्या कोहली, रोहित आणि जडेजा या दिग्गजांसाठी ही शेवटची ODI ICC स्पर्धा असू शकते. त्यामुळे त्याच्या करियरमध्ये आणखी एक ट्रॉफी मिळवण्याकडे त्यांचे लक्ष असेल. 

04 March 2025 11:14 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: कोहलीसाठी हा सामना आहे खास  

नुकताच 300 वा एकदिवसीय सामना खेळलेला विराट कोहली आणखी एका आयसीसी विजेतेपदाच्या शोधात असेल. ही चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय सामन्यांतील त्याच्या शेवटच्या प्रमुख स्पर्धांपैकी एक असू शकते.

04 March 2025 11:13 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची समस्या

पहिल्या पसंतीच्या वेगवान गोलंदाजांच्या कमतरतेमुळे ऑस्ट्रेलिया अननुभवी आक्रम खेळाडूवर अवलंबून आहे. दुबईतील परिस्थिती बघाता भारताच्या फलंदाजीच्या शक्ती रोखण्यासाठी त्यांना जोर लावावा लागेल. 

04 March 2025 11:10 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: भारताचा संभाव्य खेळ प्लॅन 

दुबईच्या संथ खेळपट्टीमुळे दुसऱ्या डावात भारत चार फिरकीपटूंसह उतरू शकतो. वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट घेतल्याने त्याची जागा  बळकट झाली आहे.

04 March 2025 10:17 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: उपांत्य सामन्यापूर्वी आली वाईट बातमी

Spinner Bowler Dies: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य सामना मंगळवारी (4 मार्च) रोजी होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे.  

सविस्तर वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यापूर्वी आली वाईट बातमी, मुंबईच्या 'या' दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

 

04 March 2025 10:04 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: उपांत्य फेरीसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

04 March 2025 10:04 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, कूपर कोनोली, बेन द्वारशिस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, ॲडम झाम्पा.

04 March 2025 10:02 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: उपांत्य फेरी गाठण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रवास

दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये उपांत्य फेरी गाठण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रवास अनुकूल निकालांचा राहिला आहे. त्यांच्या मोहिमेच्या सुरुवातीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या शानदार विजयाने, त्यानंतर पावसाने प्रभावित झालेल्या दोन सामन्यांमुळे ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

04 March 2025 10:01 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: भारताचा आतापर्यंतचा प्रवास तुलनेने सोपा 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताचा आतापर्यंतचा प्रवास तुलनेने सोपा झाला आहे कारण त्यांनी बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी विजय नोंदवले आहेत.

04 March 2025 09:59 AM

IND vs AUS Semi-Final LIVE Score: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार सामना 

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या उपांत्य फेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा सामना स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरी हा 2023 विश्वचषक फायनल नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आहे.

Read More