Champion Trophy 2025, India vs Bangladesh LIVE Scorecard and Updates: भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात करेल. या सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
भारताने 144 धावांवर चार विकेट्स गमावल्या आहेत. यापूर्वी बांगलादेशच्या गोलंदाजांना रोहित, विराट आणि श्रेयस अय्यरची विकेट घेण्यात यश आले होते. आता 31 व्या ओव्हरला अक्षर पटेलची सुद्धा विकेट गेली आहे. अक्षर पटेलने 12 बॉलमध्ये 8 धावा केल्या आहेत.
भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याने मैदानात टिकून फलंदाजी करून अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 69 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं असून या दरम्यान 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.
भारताचा फलंदाज विराट कोहलीच्या रूपाने टीम इंडियाला दुसरा धक्का बसला असून बांगलादेशला दोन विकेट घेण्यात यश आले आहे. विराट कोहली 38 बॉलवर २२ धावा करून बाद झाला. यावेळी त्याने 1 चौकार लगावला. आता टीम इंडियाची धावसंख्या 112 वर 2 बाद अशी झाली आहे. बांगलादेशचा गोलंदाज रिशाद हुसेन याने विराटची विकेट घेतली.
भारताचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा याची बांगलादेश विरुद्ध फलंदाजी करताना विकेट पडली. रोहित शर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला असून रोहितने 36 बॉलमध्ये 41 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने 7 चौकार लगावले.
भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा याच्या वनडेत 11 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. बांगलादेश विरुद्ध खेळी करताना 14 धावा करताच वनडेत रोहितने 11 हजार धावांचा टप्पा गाठला.
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला 228 धावांवर ऑल आउट केलं असून टीम इंडियाला विजयासाठी आता 229 धावांचं टार्गेट मिळालं आहे.
भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी याने बांगलादेश विरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ४९ व्या ओव्हरला तस्किन अहमदला बाद केले असून यासह सामन्यातील ५ विकेट्स पूर्ण केल्या. यासह मोहम्मद शमी हा लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
बांगलादेशचा फलंदाज तौहीद हृदोयने भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात दणदणीत शतक ठोकलं आहे. त्याने 114 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं असून भारताविरुद्ध मोठी कामगिरी केली आहे.
भारताचा गोलंदाज हर्षित राणा याला बांगलादेश विरुद्ध दुसरी विकेट मिळाली आहे. राणाने बांगलादेशच्या रिशाद हुसेनची विकेट घेतली असून ४६ व्या ओव्हरला त्याला बाद केले. यावेळी बांगलादेशचा स्कोअर 7 बाद 214 इतका होता.
भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याला बांगलादेशची सहावी विकेट घेण्यात यश आले आहे. शमीने जाकर अलीची विकेट घेतली असून ४३ व्या ओव्हरला बाद केले. यावेळी बांगलादेशचा स्कोअर ६ बाद 189 इतका होता.
तोहिद हृदयॉयने मारला दुसरा षटकार! त्याने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जोरदार फटका मारला. किती तेजस्वी स्ट्रोक. बांगलादेशी संघाला आता धावगती वाढवण्याची गरज आहे. यावेळी त्यांना आणखी धावांची गरज आहे. जडेजाच्या षटकातून 11 धावा आल्या.
तौहीद हृदय आणि झाकेर अली यांनी गडबडलेल्या खेळी सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. दोन्ही फलंदाज क्रीझमध्ये स्थिरावले असून भारतीय गोलंदाजांचा ते चांगल्या प्रकारे सामना करत आहेत. दरम्यान, बांगलादेशनेही आपल्या 100 धावा पूर्ण केल्या आहेत. 29 ओव्हरनंतर स्कोअर 103/5 आहे. तौहीद हृदय (34) आणि झाकेर अली (34) क्रीझवर आहेत. भारत सहाव्या विकेटच्या शोधात आहे.
तोहिद हृदोय आणि झाकेर अली बांगलादेशला पुढे घेऊन जात आहेत. या दोन फलंदाजांमध्ये ५० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. बांगलादेशला या दोन सेटच्या फलंदाजांकडून आणखी धावा हव्या आहेत. बांगलादेशने अर्ध्या सामन्यात 92/5 धावा केल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्माच्या चुकीमुळे अक्षर पटेल हॅटट्रिक घेण्यास मुकला. अक्षरने नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तनजीद हसनला बाद केले. त्याने तिसऱ्या चेंडूवर मुशफिकर रहीमला बाद केले.चौथ्या चेंडूवर झाकेर अली त्याच्यासमोर होता. अक्षरचा चेंडू झाकरच्या बॅटला लागला आणि स्लिपमध्ये रोहित शर्माकडे गेला. रोहितने डावीकडे वाकून झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हातातून गेला. अक्षरचे हॅट्ट्रिक घेण्याचे स्वप्न भंगले. रोहितने लगेच हात जोडून त्याची माफी मागितली. बांगलादेशने 12 षटकात 5 विकेट गमावत 49 धावा केल्या आहेत. झाकेर अली 6 धावांवर तर तौहीद 10 धावांवर नाबाद आहे.
बांगलादेशच्या डावात 15 षटके पूर्ण झाली आहेत. त्याने 5 विकेट्सवर 62 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने बांगलादेशी फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिलेले नाही. झाकेर अली 15 तर तौहीद 14 धावांवर नाबाद आहे. या दोघांवर संघाच्या खात्यात जास्तीत जास्त धावा जमा करण्याचे दडपण आहे.
रोहित शर्माने पुन्हा एकदा गोलंदाजीत बदल केला आहे. आता चेंडू रवींद्र जडेजाच्या हातात आहे. बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. जडेजा बांगलादेशसाठी आणखी अडचणी निर्माण करणार का?
विकेट! अक्षर पटेलने पुन्हा दाखवला दमदार खेळ! मुशफिकर रहीम खाते न उघडताच बाद झाला. बांगलादेशने 8.3 षटकात भारताविरुद्ध 35/5 धावा केल्या.
मोहम्मद शमीने टीम इंडियाला तिसरे यश मिळवून दिले आहे. त्याने सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मेहदी हसन मिराजला बाद केले. मेहदीला 10 चेंडूत केवळ 5 धावा करता आल्या. शुभमन गिलने अप्रतिम झेल घेतला. बांगलादेशने 7 षटकांत 3 गडी गमावून 27 धावा केल्या आहेत. तनजीद 20 धावांवर नाबाद असून तौहीदने 1 धाव काढली आहे. शमीने आतापर्यंत 4 षटकात 20 धावा देऊन 2 बळी घेतले आहेत.
" मी प्रथम गोलंदाजी करेन. आम्ही काही वर्षांपूर्वीही येथे खेळलो होतो, त्यामुळे आम्हाला वाटले की चेंडू लाइट्समध्ये चांगला येतो. सर्व काही चांगले दिसत आहे. प्रत्येकजण तंदुरुस्त आणि खेळण्यासाठी तयार आहे. आशा आहे की आम्ही चांगली सुरुवात करू."
दुबईत बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाची गोलंदाजी सुरू झाली आहे. मोहम्मद शमी पहिले षटक टाकायला आला. त्याचवेळी बांगलादेशकडून तनजीद आणि सौम्या सरकार यांनी फलंदाजीला सुरुवात केली. टीम इंडियाची नजर जिंकण्याकडे आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. त्यानंतर मैदानात गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशच्या दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या ओव्हरला सौम्या सरकारला बाद करण्यात मोहम्मद शमीला यश आले. तर दुसऱ्या ओव्हरला बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतो याची हर्षित राणाने विकेट घेतली.
तन्झीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
बांगलादेशने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता यात सुधारणा झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या ताज्या फोटोमध्ये दिसून येत आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सहभागी होणाऱ्या इतर देशांसोबत भारताचा ध्वजही लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज दिसत नव्हता तेव्हा मोठा वाद झाला होत.
इथे वाचा सविस्तर: Champions Trophy 2025: अखेरीस तिरंग्याच्या वादावर पाकिस्तानने गुडघे टेकले, कराचीमध्ये झळकला भारताचा ध्वज
भारतीय संघ आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करत आहे. दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर त्याचा सामना बांगलादेशशी होणार आहे. अ गटातील हा दुसरा सामना आहे. 2 वाजता या सामन्याचा टॉस होणार आहे.
बांगलादेश देखील तणावातून जात आहे आणि शाकिब अल हसनसारख्या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे तो कमकुवत झाला आहे या वस्तुस्थितीपासून भारताला दिलासा मिळू शकतो.
भारत तीन फिरकीपटू खेळवण्याची शक्यता आहे, तर हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असेल. पण इथे रवींद्र जडेजा आणि अक्षर यांच्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसरा फिरकीपटू कोण असेल याचाही विचार भारताला करावा लागेल.
काही दिवसांपूर्वी कर्णधार रोहितने शानदार शतक आणि कोहलीने इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, तर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत अनुक्रमे 4-1 आणि 3-0 असा नेत्रदीपक विजय नोंदवला होता. गिलने चमकदार कामगिरी केली आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावून मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतापुढील आव्हान हे घरच्या मालिकेपेक्षा खूपच वेगळे आहे.
भारत आणि बांगलादेशची संभाव्य Playing XI कशी असेल याबाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात
सविस्तर वाचा: IND Playing XI vs BAN: दुबईत 3 फिरकीपटू खेळणार टीम इंडिया? 'ही' आहे भारत-बांगलादेशची संभाव्य प्लेइंग 11
भारतीय संघाला आपले सर्व सामने दुबईत खेळायचे आहेत. अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये तीन फिरकीपटू ठेवायचे की तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांचा समावेश करायचा, हा विचार करण्याचा विषय ठरेल.
खेळलेले सामने: 41
भारत विजय: 32
बांगलादेश विजयः 8
कोणतेही परिणाम नाहीत: 1
अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला अखेरीस १९ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली असून आपल्या टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रंगणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश असा हा सामना रंगणार आहे. भारताने या सामन्यासाठी नेटमध्ये खूप घाम गाळला आहे, मात्र या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. अंदाज खरा ठरल्यास भारताला आपले प्लॅन्स बदलावे लागतील.
सविस्तर रिपोर्ट इथे वाचा: IND vs BAN Pitch Report: भारत-बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या हवामानाचा अंदाज आणि पीच रिपोर्ट
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध बांगलादेश सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण करेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याची थेट वेळ किती आहे? चॅम्पियन्स ट्रॉफी मधील दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश ( IND Vs BAN) सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. यामध्ये बीसीसीआयने सुरक्षेचे कारण सांगितले आहे. या कारणामुळे यंदा ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार असून भारताचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळवले जातील.
यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळवत आहे. यंदा पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे. यासाठी पाकिस्तानने जय्यत तयारी केली आहे.
Champion Trophy 2025, India vs Bangladesh LIVE Scorecard and Updates: 19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) सुरु झाली आहे. यंदा ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळवले जातील.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.