T20 World Cup 2024 IND vs IRE Match Live Score : सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 च्या आठव्या सामन्यात आज भारताचा सामना अ गटात आयर्लंडविरुद्ध होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. अशातच आज टीम इंडिया विजयाचा श्रीगणेशा करणार का? असा सवाल विचारला जातोय. आयर्लंड लिंबू टिंबू संघ ओळखला जात असला तरी त्यांनी कमी लेखून जमणार नाही. आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.