IND vs NED LIVE Updates: वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स दोनदा भिडले आहेत. या दोन्ही वेळा भारताने विजय मिळवला आहे. 2003 मध्ये टीम इंडियाने नेदरलँडचा 68 धावांनी तर 2011 मध्ये 5 विकेटने पराभव केला होता.
नेदरलँडचा अर्धा संघ गारद, संघाची स्थिती 144 वर 5 विकेट्स; बुमरहाला मिळाली पहिले विकेट
विराटने काढली चौथी विकेट, एडवर्ड्स 17 धावांवर आऊट; नेदरलँड संघ 114 वर 4 बाद
नेदरलँडचा तिसरा गडी माघारी
रवींद्र जाडेजाने पहिल्याच ओव्हरमध्ये घेतली विकेट, भारतीय संघाचं सामन्यात पुनरागमन
डाव सावरल्यानंतर नेदरलँडला दुसरा झटका, एकरमन 35 धावांवर बाद; कुलदीप यादवला पहिलं यश
नेदरलँडला पहिला झटका, बरेसी फक्त 5 धावांवर माघारी; मोहम्मद सिराजने काढली विकेट
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय रोहित शर्माने घेतला होता. फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतक ठोकली.100 वर भारताची पहिली विकेट गेली. मात्र, किंग कोहली आपला जलवा दाखवला अन् फिफ्टी पूर्ण केली. मात्र, त्याला ऐतिहासिक कामगिरी करता आली नाही. त्याचं 50 वं शतक हुकलं. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी सुट्टी दिली नाही. दोन्ही खेळाडूंनी वादळी शतक ठोकलं. श्रेयसने 94 बॉलमध्ये 128 धावांची खेळी केली तर केएल राहुलने 64 बॉलमध्ये 102 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 410 धावा उभ्या केल्या.
केएल राहुलने वादळी शतक केलं. टीम इंडिया 400 पार करून केएल राहुल बाद झाला.
टीम इंडियाचा स्टार मिडल ऑर्डर फलंदाज श्रेयस अय्यर याने झंजावती शतक ठोकलंय. त्याने 84 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. त्यात त्याने 9 फोर आणि 2 गगनचुंबी षटकार खेचले आहेत.
टीम इंडियाचे मिडल ऑर्डर फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाला 300 पार केलंय. दोन्ही खेळाडूंनी शतकीय भागेदारी देखील केलीये.
इतिहास रचण्याच्या उंभरठ्यावर असेला विराट कोहली 51 धावा करून बाद झाला. त्याने 56 बॉलचा सामना केला. त्यामुळे आता विराटचं 50 वं शतक पाहण्यासाठी आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. रोहितने 54 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली. त्यात त्याने 8 फोर आणि 2 सिक्स खेचले.
लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाने दिवाळीच्या दिवशी एकूण दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. 1987 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 56 रन्सने तर 1992 मध्ये झिम्बाब्वेचा 30 रन्सने पराभव केला होता.
IND vs NED LIVE Updates: भारतीय कर्णधार रोहित शर्मा बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 534 धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला 97 धावांची गरज आहे.
IND vs NED LIVE Updates: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
IND vs NED LIVE Updates: विराट कोहली या सामन्यात विक्रमी 50 वे ODI शतक झळकावू शकतो. या काळात कोहली सचिन तेंडुलकरचा महान विक्रम मोडू शकतो.
IND vs NED LIVE Updates: भारत आणि नेदरलँडचे संघ आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये दोनदा भिडले आहेत. म्हणजेच आज ते तिसऱ्यांदा वनडेत आमनेसामने असतील. 2003 आणि 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना नेदरलँडशी झाला होता, दोन्हीमध्ये भारताचा विजय झाला होता.
IND vs NED LIVE Updates: एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना साथ देण्यासाठी उत्तम आहे. मैदान तुलनेने लहान आहे. त्यामुळे फलंदाजांना चांगली धावसंख्या उभारण्याची संधी मिळते.
IND vs NED LIVE Updates: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध नेदरलँड हा सामना खेळवला जाईल. बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता नाही. दिवाळीच्या दिवशी भारताला नेदरलँड्सचा पराभव करून नववा विजय नोंदवायचा आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.