Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IND vs PAK LIVE Score: विराट कोहलीच्या सेंच्युरीसह भारताची पाकिस्तानवर मात

IND vs PAK Live Score Updates in Marathi: चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 6 गडी राखून भारताने पाकिस्ताचा पराभव केलाय.   

IND vs PAK LIVE Score: विराट कोहलीच्या सेंच्युरीसह भारताची पाकिस्तानवर मात
LIVE Blog

Champion Trophy 2025, India vs Pakistan LIVE Score and Updates: चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 6 गडी राखून भारताने पाकिस्ताचा पराभव केलाय. 

 

23 February 2025
23 February 2025 21:54 PM

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने चौकार मारत, 51 वी सेंच्युरी करत पाकिस्तानचा पराभव केलाय. विराटने दमदार फलंदाजी करून शतक पूर्ण केलं आहे.  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून त्यांच्यावर मात करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलंय. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतावरील टेन्शन नसणार आहे.

23 February 2025 20:12 PM

विराट कोहलीचं पाकिस्तान विरुद्ध दमदार अर्धशतक

भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करून अर्धशतक पूर्ण केलं आहे. 62 बॉलमध्ये त्याने 51 धावा केल्या असून सध्या भारताला विजयासाठी 109 धावांची आवश्यकता आहे. 

23 February 2025 20:11 PM

भारताला दुसरा धक्का! अर्धशतकाच्या उंबरठ्यावर शुभमन गिल क्लीन बोल्ड 

भारत - पाक सामन्यात शुभमन गिलच्या विकेटच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला आहे.  अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या शुभमन गिल याला पाकिस्तानचा गोलंदाज अबरार अहमद याने क्लीन बोल्ड केले. शुभमन गिलने 52 बॉलमध्ये 46 धावा केल्या. 

23 February 2025 19:56 PM

वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीने पूर्ण केल्या 14,000 धावा 

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये 14,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 14,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट हा जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. 

23 February 2025 19:03 PM

शाहीन आफ्रिदीच्या बॉलिंगवर रोहित शर्मा क्लीन बोल्ड! 

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताची इनिंग सुरु असून विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळालं आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल हे सलामी फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. मात्र यावेळी पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्माची विकेट घेतली. 15 बॉलवर 20 धावा करून तो बाद झाला. 

23 February 2025 19:02 PM

भारताच्या इनिंगला सुरुवात, रोहित - शुभमनची जोडी मैदानात 

भारत - पाक सामन्यात भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळालं असताना कॅप्टन रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल हे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. 

23 February 2025 18:41 PM

 

IND vs PAK Live Score: हार्दिक पांड्याला मिळाले नवी 'लेडी लव्ह'?

बाबरच्या विकेटसह हार्दिक पांड्याने भारताचे विकेट्सचे खाते उघडले. पण चर्चेत अजून एक गोष्ट आली ती म्हणजे त्याच्या विकेट सोबत  टीव्ही स्क्रीनवर अचानक दिसलेला एक चेहरा. या व्यक्तीने केलेले सेलिब्रेशन. ती तरुणी हार्दिकची नवीन लेडी लव्ह आहे का? अशी चर्चा होत आहे. 

सविस्तर वाचा: IND vs PAK: हार्दिक पांड्याला मिळाले नवी 'लेडी लव्ह'? बाबर आझमच्या विकेटवर दिली 'ही' खास प्रतिक्रिया

 

23 February 2025 18:28 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तानचा अख्खा संघ तंबूत

पाकिस्तानचा अख्खा संघ तंबूत परतला असून भारतासमोर विजयासाठी २४२ चं आव्हान ठेवण्यात आलं आहे. 

 

 

 

23 February 2025 18:07 PM

IND vs PAK Live Score: भारत - पाक सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, रिझवान आणि हर्षित राणामध्ये मैदानात धक्काबुक्की, Video Viral

भारत - पाक सामना म्हटले की यात ऍक्शन आणि ड्रामाचा तडका लागतोच. या हायव्होल्टेज सामन्यात बऱ्याचदा खेळाडू एकमेकांशी भिडताना तुम्ही यापूर्वी देखील पाहिलं असेल. असाच राडा रविवारी झालेल्या भारत - पाक सामन्यात सुद्धा झाला. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि भारतीय गोलंदाज हर्षित राणा या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सविस्तर वाचा: भारत - पाक सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, रिझवान आणि हर्षित राणामध्ये मैदानात धक्काबुक्की, Video Viral

 

23 February 2025 18:02 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तानला दुहेरी धक्का

43व्या षटकात कुलदीप यादवने पाकिस्तानला दुहेरी झटका दिला. त्याने चौथ्या चेंडूवर सलमान अली आगाला बाद केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सलमान बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याचा झेल घेतला.सलमानला 24 चेंडूत केवळ 19 धावा करता आल्या. त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेल्या शाहीन आफ्रिदीला पुढच्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू घोषित करण्यात आले. त्याला खातेही उघडता आले नाही. कुलदीपला हॅट्ट्रिक करता आली नाही. नसीम शाहने त्याचा चेंडू आरामात ऑफ साइडने खेळला. पाकिस्तानने 43 षटकात 7 विकेट गमावत 200 धावा केल्या आहेत. 21 चेंडूत 20 धावा केल्यानंतर खुशदिल शाह नाबाद आहे. नसीम शाह त्यांच्यासोबत आले आहेत.

 

 

23 February 2025 17:53 PM

ND vs PAK Live Score: पाकिस्तानची अवस्था बिकट झाली असून, ​​कुलदीप यादवने दुहेरी हल्ला केला आहे. या हल्ल्यात  सलमान आणि शाहीन आफ्रिदी बाद झाले आहे. 

 

23 February 2025 17:36 PM

IND vs PAK Live Score: अक्षर पटेलच्या डायरेक्ट थ्रोने उडवले इमामचे स्टंप्स, निष्काळजीपणा अंगाशी आला

 क्रिकेटमधील महत्वाच्या सामन्यात निष्काळजीपणाचा शिक्षा किती मोठी असू शकते हे भारत - पाकिस्तान सामन्यात पाहायला मिळाले. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी भारत - पाक सामना खेळवला गेला. या सामन्यात अक्षर पटेलची खतरनाक फिल्डिंग पाहून सर्वच थक्क झाले. 

सविस्तर वाचा: अक्षर पटेलच्या डायरेक्ट थ्रोने उडवले इमामचे स्टंप्स, निष्काळजीपणा अंगाशी आला Champions Trophy 2025 

23 February 2025 17:30 PM

IND vs PAK Live Score: हार्दिकला मिळाले मोठे यश.. 

हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. त्याने बाबर आझमला बाद करत त्याची पहिली विकेट घेतली. आता त्याने सौद शकीलची विकेट घेतली. षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात शकीलने अक्षर पटेलला झेलबाद केले. शकीलने 76 चेंडूत 62 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 विकेट घेतल्या. पाकिस्तानने 36 षटकात 4 विकेट गमावत 165 धावा केल्या आहेत. सलमान अली आगा ४० चेंडूत नाबाद ४० धावा आणि तय्यब ताहिर ५ चेंडूत नाबाद ४० धावा करत आहेत.

 

 

23 February 2025 17:21 PM

IND vs PAK Live Score: रिझवानची विकेट 

मोहम्मद रिझवानची विकेट पडली. त्याने शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याचा चेंडू झेलला गेला पण पुढच्याच षटकात अक्षर पटेलने त्याला बोल्ड केले. रिजवान 44 धावा करून बाद झाला.

23 February 2025 16:58 PM

IND vs PAK Live Score: 'ही' फॅन गर्ल टी-शर्टच्या खाली पॅन्ट घालायलाच विसरली

Champion Trophy 2025 India Vs Pakistan, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममधून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रितिकसोबत असलेल्या एका फॅन गर्लने भारतीय जर्सी परिधान केली आहे पण खालची पॅन्ट घालायला विसरली असे वाटतं आहे.   

सविस्तर वाचा: IND vs PAK: रोहितच्या बायकोसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? टी-शर्टच्या खाली पॅन्ट घालायलाच विसरली, सोशल मीडियावर चर्चा

23 February 2025 16:38 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तानने केल्या 100 धावा पूर्ण 

पाकिस्तानचे फलंदाज मोहम्मद रिझवान आणि सौद शकील संथ फलंदाजी करत आहेत. असे दिसते की दोघेही कसोटी सामना खेळत आहेत. पाकिस्तान संघाने 25.3 षटकात 100 धावा पूर्ण केल्या. त्याने 26 षटकात 2 गडी बाद 107 धावा केल्या आहेत. शकीलने 51 चेंडूत 37 धावा केल्यानंतर नाबाद आहे. त्याचबरोबर कर्णधार मोहम्मद रिझवानने 53 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या आहेत.

23 February 2025 16:16 PM

IND vs PAK Live Score: चौकाराचा दुष्काळ संपला

16 व्या षटकात अक्षर पटेलच्या पहिल्या चेंडूवर सौद शकीलने चौकार मारला. त्याने यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चौकार मारला. षटकात एकूण 7 धावा आल्या. 32 चेंडूंत चौकार मारला.

23 February 2025 16:03 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तानची संथ फलंदाजी

15 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या केवळ 53 धावा आहे. रिजवान आणि सौद शकील क्रीजवर आहेत. खेळपट्टी थोडी संथ असल्यामुळे वेगवान फलंदाजी करण्यात अडचणी येत आहेत.

23 February 2025 15:54 PM

IND vs PAK Live Score: शमी-पांड्याने पाकिस्तानला  रोखले

14 षटकांनंतर पाकिस्तानच्या 61 धावा आहेत, त्यांच्या 2 विकेट पडल्या आहेत. शमी आणि पांड्याने पाकिस्तानला बांधून ठेवले आहे. पांड्याने 4 षटकात केवळ 14 धावा दिल्या आहेत. तर शमीने 18 धावा केल्या आहेत.

23 February 2025 15:33 PM

IND vs PAK Live Score: शमीचा वनडेत नकोसा विक्रम

एकदिवसीय सामन्यात एका षटकात ५ वाईड बॉल टाकणारा मोहम्मद शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

23 February 2025 15:27 PM

IND vs PAK Live Score: इमाम उल हक झाला धावबाद 

या सामन्यातून पाकिस्तान संघात परतलेला इमाम उल हक धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने कुलदीप यादवच्या चेंडूवर मिडऑनच्या दिशेने एक शॉट खेळला आणि एकेरी धाव घेतली.  समोर उभ्या असलेल्या अक्षर पटेलने पटकन चेंडू पकडला आणि तो थेट स्टंपवर फेकला. इमाम क्रीजच्या मागे राहिला आणि पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. इमामने 26 चेंडूत 10 धावा केल्या. पाकिस्तानने 10 षटकात 2 गडी बाद 52 धावा केल्या आहेत. कर्णधार मोहम्मद रिझवान नाबाद 40 धावांवर आणि सौद शकील नाबाद 40 धावांवर खेळत आहेत.

 

23 February 2025 15:14 PM

पाकिस्तानला पहिला धक्का, बाबर आझम तंबूत 

भारत - पाक सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा सलामी फलंदाज बाबर आझम याची विकेट घेण्यात भारतीय गोलंदाज हार्दिक पंड्याला यश आले . यात बाबर आझमने 26 बॉलमध्ये 23 धावा केल्या आहेत. 

23 February 2025 14:42 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तानची फलंदाजी सुरू 

भारताविरुद्ध पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाली आहे. बाबर आझम आणि इमाम उल हक हे अनुभवी फलंदाज क्रीझवर आले आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने पहिल्याच षटकात पाच वाईड टाकले. एका षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद 6 धावा. इमाम उल हक एक धाव घेत नाबाद आहे. बाबर आझमने अद्याप खाते उघडलेले नाही.

23 February 2025 14:39 PM

IND vs PAK Live Score:  विराट कोहलीचा अप्रतिम विक्रम

Virat Kohli: विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो 2009, 2013, 2017 आणि 2025 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांचा भाग होता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा भाग होते.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडून सगळ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या सामन्यात विराट कोहली मोठी कामगिरी करू शकतो आणि क्रिकेटच्या देवाचा मोडू शकतो.   

सविस्तर वाचा: IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट मोडणार क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड? हव्यात फक्त 15 धावा

 

23 February 2025 14:31 PM

IND vs PAK Playing XI: दोन्ही संघांचे प्लेइंग-11

IND vs PAK Live Score: पाकिस्तान

इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.

 

IND vs PAK Live Score: भारत

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

 

23 February 2025 14:28 PM

IND vs PAK Live Score: टीम इंडियाचा अनोखा विश्वविक्रम

टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक गमावून विश्वविक्रम केला आहे. सलग 12 नाणेफेक गमावणारा भारत हा पहिला एकदिवसीय संघ आहे.

 

23 February 2025 14:11 PM

IND vs PAK Live Score:  2 वाजता झाली नाणेफेक

दुबईत नाणेफेक करून पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. पण महत्त्वाची माहिती म्हणजे भारताने वनडेमध्ये सलग 11 नाणेफेक गमावली आहे. 

 

 

23 February 2025 14:06 PM

IND vs PAK Live Score:  पाकिस्ताने जिंकला टॉस जिंकला असून ते आधी फलंदाजी करणार आहेत. 

 

 

23 February 2025 13:43 PM

IND vs PAK Live Score: काय म्हणाले मोहम्मद शमीचे बालपणीचे प्रशिक्षक?

मोहम्मद शमीचे बालपणीचे प्रशिक्षक बद्रुद्दीन यांनी म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान सामना हा प्रेशरने भरलेला असतो. पण भारतीय संघ मजबूत आहे आणि खेळाडू फॉर्मात आहेत. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकेल.

 

23 February 2025 13:32 PM

IND vs PAK Live Score:  दोन खेळाडू नाहीत फिट 

India vs Pakistan, Champion Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीला अवघे काही तास उरले आहेत. याआधीच टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती की, एका स्टार खेळाडूची तब्येत अचानक बिघडली, तर दुसऱ्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे. 

सविस्तर वाचा: भारत विरुद्ध पाकिस्तान: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारी

23 February 2025 13:23 PM

ND vs PAK Live Score: गेल्या 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानचा रिकॉर्ड

1. भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला (14 ऑक्टोबर 2023, अहमदाबाद)

2. भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला (10-11 सप्टेंबर 2023, कोलंबो)

३. पावसामुळे सामना अनिर्णित (2 सप्टेंबर 2023, कोलंबो)

4. भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला (16 जून 2019, मँचेस्टर)

5. भारताने पाकिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला (23 सप्टेंबर 2018, दुबई)

6. भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला (19 सप्टेंबर 2018, दुबई)

7. पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी पराभव केला (18 जून 2017, लंडन)

8. भारताने पाकिस्तानचा 124 धावांनी पराभव केला (4 जून 2017, बर्मिंगहॅम)

9. भारताने पाकिस्तानचा 76 धावांनी पराभव केला (15 फेब्रुवारी 2015, ॲडलेड)

10. पाकिस्तानने भारताचा 1 विकेटने पराभव केला (2 मार्च 2014, मीरपूर)

23 February 2025 13:09 PM

IND vs PAK Live Score: भारताच्या विजयासाठी हवन

पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयासाठी चाहत्यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे हवन केले.

 

23 February 2025 12:49 PM

IND vs PAK Live Score:  भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना किती वाजता होणार सुरु? 

मोबाईल यूजर्सना JioHotstar च्या अँपवर भारत पाकिस्तान हा सामना फ्रीमध्ये पाहता येईल. रविवारी दुपारी 2: 30 वाजता हा सामना पार पडणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल. 

सविस्तर वाचा: ब्लॉकबस्टर संडे... भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना किती वाजता होणार सुरु? कुठे Free पाहता येणार?

 

 

23 February 2025 12:48 PM

IND vs PAK Live Score: कुठे Free पाहता येणार?
 

IND vs PAK Live Score:  19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्याने क्रिकेट रसिकांचा उत्साह वाढत असून स्पर्धेतील पाचवा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तेव्हा हा सामना प्रेक्षक फ्रीमध्ये कुठे पाहू शकतात याविषयी जाणून घेऊयात. तर  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हे सामानाने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवले जातील. तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पारपडेल.

 

23 February 2025 12:40 PM

IND vs PAK Live Score: खेळपट्टी कशी असेल, टॉस किती महत्त्वाचा?

दुबईत खेळपट्टी संथ असणे अपेक्षित आहे. सुरुवातीला खेळपट्टी फलंदाजीसाठी थोडी सोपी असेल. त्याचबरोबर सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांचीही मदत मिळेल. जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी मधल्या षटकांमध्ये टर्न येऊ लागतील आणि फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची होईल. तर संध्याकाळी, मागील सामन्याप्रमाणे, थोडे दव असेल आणि दिव्याखाली फलंदाजी करणे कठीण होऊ शकते. याचा स्पष्ट अर्थ भारत-पाकिस्तान सामन्यात नाणेफेक खूप महत्त्वाची असणार आहे. इथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे हा चांगला निर्णय असू शकतो.

23 February 2025 12:21 PM

IND vs PAK Live Score: दुबईमध्ये हवामान कसे असेल?

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हवामान खूप गरम राहण्याची शक्यता आहे. मात्र, सायंकाळनंतर तापमानात घट होईल. थोडे ढगाळ वातावरण असू शकते.

सविस्तर जाणून घ्या: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट? कशी आहे खेळपट्टी, हवामान? जाणून घ्या!

23 February 2025 12:16 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तानी क्रिकेटरची पत्नी आहे 'या' भारतीय खेळाडूची फॅन

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूची मोठी फॅन पाकिस्तानी क्रिकेटरची पत्नी आहे. कोण आहे हा खेळाडू जाणून घेऊयात. 

वाचा सविस्तर:  India vs Pakistan: पाकिस्तानी क्रिकेटपटूची पत्नी आहे 'या' भारतीय खेळाडूची मोठी चाहती

23 February 2025 11:56 AM

IND vs PAK Live Score: दुबईत टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड

भारतीय संघ दुबईच्या मैदानावर 7 एकदिवसीय सामने खेळला आहे, त्यापैकी 6 जिंकले आहेत. एकच सामना बरोबरीत आहे. म्हणजेच भारतीय संघ येथे दमदार कामगिरी करतो.

 

23 February 2025 11:55 AM

IND vs PAK Live Score: दुबईत पाकिस्तानचा एकदिवसीय विक्रम

पाकिस्तानने दुबईमध्ये 22 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 8 जिंकले आहेत. 13 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर एका सामन्यात निकाल लागला नाही. म्हणजे या मैदानावर पाकिस्तान संघाची कामगिरी तितकीशी चांगली नाही.

23 February 2025 11:45 AM

IND vs PAK Live Score: आयसीसी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा विक्रम

आयसीसी इव्हेंटमध्ये, एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दोन्ही संघांमध्ये 21 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने 16 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने केवळ 4 सामने जिंकले आहेत. याचा अर्थ आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचा वरचष्मा आहे.

23 February 2025 11:28 AM

IND vs PAK Live Score: एकूण वनडे रेकॉर्ड कसा आहे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडेमध्ये आतापर्यंत १३५ सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारतीय संघाने 57 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तान संघाने 73 सामने जिंकले आहेत. म्हणजेच एकूण वनडे रेकॉर्डमध्ये पाकिस्तानचा वरचष्मा आहे.

23 February 2025 11:04 AM

IND vs PAK Live Score: भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्यात शेवटचे कधी झाले होते?

14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत सर्वबाद 191 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या, तर मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी केली. याशिवाय इमाम उल हकने 36 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 30.3 षटकांत 3 गडी गमावून 192 धावा करत सामना जिंकला.
 

23 February 2025 10:42 AM

IND vs PAK LIVE Score: 14 महिन्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ महिन्यांनंतर वनडे सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी 2023 च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान वनडे फॉरमॅटमध्ये आमनेसामने आले होते. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती.

23 February 2025 10:36 AM

IND vs PAK LIVE Score: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महायुद्ध

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महायुद्ध होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून दोन्ही देशांमधील हा महान सामना रंगणार आहे.

23 February 2025 10:26 AM

IND vs PAK LIVE Score: पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? 

IIT Baba Prediction on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीनुसार भारत हा सामना जिंकणार नाही.  

सविस्तर वाचा:  पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप

23 February 2025 10:18 AM

पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी

IND vs PAK LIVE Score: 2017मध्ये जेव्हा इंग्लंड आणि वेल्समधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत पाकिस्ताननं टीम इंडियाला पराभूत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती, त्याच पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी रोहित शर्माच्या टीम इंडियाकडे आहे. 

 

23 February 2025 09:46 AM

अन्यथा स्पर्धेतून बाहेर पडेल पाकिस्तान 

IND vs PAK LIVE Score: रविवारची मॅच जिंकून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार यात शंकाच नाही. मात्र पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर टीम इंडियाचं कडवं आव्हान त्यांना रोखावं लागेल अन्यथा स्पर्धेतून ते बाहेर पडतील. 

23 February 2025 09:11 AM

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान किती वेळा आमनेसामने आलेत? 

IND vs PAK LIVE Score: चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 5 वेळा आमनेसामने आलेत त्यात 2 वेळा भारतानं विजय मिळवला आणि 3 वेळा पाकिस्तानं विजय मिळवला आहे.

23 February 2025 09:09 AM

पाकिस्तानची तयारी किती? 

IND vs PAK LIVE Score: दुसरीकडे पाकिस्तानकडून सलामीच्या मॅचमध्ये बाबर आझम, सलमान अघा आणि खुशदील शाह न्यूझीलंडच्या बॉलर्सचा सामना करण्यात थोडेफार यशस्वी ठरले. बाकी त्यांची संपूर्ण टीम सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे भारताविरूद्धच्या मॅचसाठी कॅप्टन मोहम्मद रिझवानला नव्यानं रणनीती आखवी लागणार आहे दमानं टीमची आखणी करावी लागेल. 

23 February 2025 09:07 AM

आज विराटची बॅट जोरदार चालणार? 

IND vs PAK LIVE Score: टीम इंडियाच्या बॅटिंगची कमान संपूर्ण पणे टॉप ऑर्डरवर असणार आहे. पण विराट कोहलीचा हरवलेला फॉर्म टीम इंडियासाठी कळीचा मुद्दा ठरु शकतो. त्यामुळे पाकिस्तानच्या मॅचमध्ये विराटची बॅट तळपेल अशी फॅन्सना आशा आहे. बॉलिंगमध्ये मोहम्मद शमीनं दणक्यात पुनरागमन करत बांगलादेशविरुद्धच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता त्याला हार्षित राणा आणि अक्सर पटेलनं मोलाची साथ दिली होती. 

23 February 2025 09:01 AM

भारत आणि पाकिस्तान दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ

IND vs PAK LIVE Score: भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ए ग्रुपमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानला नमवलं होतं तर भारतानं बांगलादेशला पराभूत करत विजयी सलामी दिली होती. आतापर्यंत या दोन्ही टीम जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा प्रत्येक मॅचही रंगतदारच होते आणि आयसीसीची स्पर्धा असली की चाहते भारत आणि पाकिस्तान मॅचची आतुरतेनं वाट पाहत असतात.

23 February 2025 08:59 AM

दुबईत हायव्होल्टेज मॅच रंगणार

IND vs PAK LIVE Score: भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी दुबईत हायव्होल्टेज मॅच रंगणार आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेणार का की पाकिस्तान पुन्हा टीम इंडियाला पराभवाचा धक्का देणार हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. 

 

Read More