Champion Trophy 2025, India vs New Zealand Final LIVE Scorecard and Updates: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. IND विरुद्ध NZ सामना रविवार, 9 मार्च रोजी UAE मधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने 2000 साली भारताचा अंतिम फेरीत पराभव करून पहिली आणि एकमेव ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताला त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
भारताचा स्टार फलंदाज अक्षर पटेलच्या रूपाने भारताची पाचवी विकेट पडली आहे. 42 व्या ओव्हरला अक्षरची विकेट गेली असून मायकेल ब्रेसवेलच्या नावावर अक्षर पटेल कॅच आउट झाला.
भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात टीम इंडियाला श्रेयस अय्यरच्या विकेट रूपाने चौथा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज रचिन रवींद्र याने श्रेयस अय्यरला बाद केले. श्रेयसने ६२ बॉलमध्ये 48 धावा केल्या होत्या.
भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात न्यूझीलंडने भारताची तिसरी विकेट घेतली आहे. रोहित शर्माच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला असून रचिन रवींद्रच्या बॉलिंगवर टॉम लॅथमने अचूक स्टॅम्पिंग केल्याने रोहित बाद झाला. रोहितने 83 बॉलमध्ये 76 धावा केल्या होत्या.
भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात टीम इंडियाला शुभमन गिल बाद झाल्यानंतर लगेचच दुसरा धक्का बसला आहे. मायकेल ब्रेसवेलच्या बॉलिंगवर विराट कोहली lbw आउट झाला. त्याने २ बॉलमध्ये १ धाव केली होती.
भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात टीम इंडियाला शुभमन गिलच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स याने शुभमनचा कॅच पकडला. गिलने 50 बॉलवर 31 धावा केल्या.
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने न्यूझीलंड विरुद्ध फलंदाजीसाठी उतरल्यावर भारताला दमदार सुरुवात करून दिली. रोहित शर्माने अर्धशतक ठोकले. भारताने एकही विकेट न गमावता १०० धावा पूर्ण केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही.
भारत - न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना पार पडत आहे. या सामन्यात भारताला विजयासाठी न्यूझीलंडने 252 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी शुभमन गिल आणि रोहित शर्मा हा सलामी फलंदाज भारताकडून मैदानात उतरले.
भारत - न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. यामुळे भारताला फायनल सामन्यातील विजयासाठी 252 धावांचं आव्हान मिळालं आहे.
भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याने न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल याची विकेट घेतली आहे. न्यूझीलंडने 46 व्या ओव्हरवर त्यांची सहावी विकेट गमावली असून न्यूझीलंडची धावसंख्या सध्या 6 बाद 211 धावा आहे.
भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या निम्म्या संघाला माघारी पाठवण्यात भारताला यश आले आहे. ग्लेन फिलिप्स याला भारताचा स्टार गोलंदाज वरूण चक्रवर्तीने बाद केलं. फिलिप्सने 52 बॉलमध्ये 34 धावा केल्या होत्या. वरूण चक्रवर्तीची ही या सामन्यातील दुसरी विकेट होती.
भारत - न्यूझीलंड सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरणाऱ्या न्यूझीलंडची चौथी विकेट घेण्यात भारताला यश आले आहे. न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथम याला रवींद्र जडेजाने 24 व्या ओव्हरला बाद केले. टॉमने 30 बॉलमध्ये 14 धावा केल्या होत्या.
भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात भारताला न्यूझीलंडच्या तीन विकेट घेण्यात यश आले आहे. यासह 20 वी ओव्हर पूर्ण होताना न्यूझीलंडने धावांची शंभरी पार केली. भारताकडून कुलदीप यादवने न्यूझीलंडच्या २ फलंदाजांना बाद केले. यात केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रला बाद केले. तर वरुण चक्रवर्तीला विल याँगची विकेट घेण्यात यश आले.
भारताचा गोलंदाज कुलदीप यादव याने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन याला बाद केलं आहे. कुलदीप यादवला न्यूझीलंडची दुसरी विकेट घेण्यात यश आले असून 12.2 ओव्हरला त्याने केनला बाद केले. त्याने 14 बॉलमध्ये 11 धावा केल्या होत्या.
भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या दोन्ही सलामी फलंदाजाची विकेट घेण्यात भारताला यश आले आहे. आधी विल यंग आणि आता रचिन रवींद्र याला बाद करण्यात भारताला यश आले. कुलदीप यादव याने रचिनची विकेट घेतली असून त्याने 29 बॉलमध्ये 37 धावा केल्या होत्या.
भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामी फलंदाजाची विकेट घेण्यात भारताचा गोलंदाज वरुण चक्रवर्तीला यश आलं आहे. वरुण चक्रवर्तीने विल यंगला lbw बाद केलं. विल यंगने 23 बॉलमध्ये 15 धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताची गोलंदाजी सुरू झाली आहे. मोहम्मद शमीने संघाचे पहिले षटक टाकले. न्यूझीलंडने एका षटकात कोणतेही नुकसान न करता 4 धावा केल्या आहेत. विल यंग 4 धावा करून नाबाद आहे. रचिन रवींद्रने अद्याप खाते उघडलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचा टॉस झाला असून यात पुन्हा एकदा रोहित शर्मा हारला आहे तर न्यूझीलंडने टॉस जिंकून फलंदाजी निवडली आहे.
We’re moments away from the final showdown at the #ChampionsTrophy
Here’s how you can watch in your territory https://t.co/0mCzdMwGPV
— ICC (@ICC) March 9, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लवकरच होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता नाणेफेक होईल.
Inching closer to the #Final
Dubai International Cricket Stadium
2:30 PM IST
https://t.co/Z3MPyeL1t7
Official BCCI App#TeamIndia | #INDvNZ | #ChampionsTrophy pic.twitter.com/vWCuoIbQmJ— BCCI (@BCCI) March 9, 2025
VIDEO | India vs New Zealand, Champions Trophy Final: Indian cricket team arrives at Dubai International Cricket Stadium. #INDvsNZ #CTFinal2025
(Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRAShcC) pic.twitter.com/Hf6Eeinhxd
— Press Trust of India (@PTI_News) March 9, 2025
जर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा हा अंतिम सामना जिंकला तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद तीनदा जिंकणारा तो जगातील पहिला देश ठरेल. सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारताने संयुक्तपणे प्रत्येकी दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2002 मध्ये भारत श्रीलंकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता होता. यानंतर टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 साली दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता 2025 मध्ये टीम इंडियाला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.
टीम इंडिया चॅम्पियन बनल्यास त्याला 2.24 मिलियन डॉलर (सुमारे 19.49 कोटी रुपये) मिळतील. त्याच वेळी, अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला 1.12 दशलक्ष डॉलर (9.74 कोटी रुपये) मिळतील. याचा अर्थ, भारताने जिंकल्यास गट टप्प्यातील सामन्यांच्या रकमेसह 21.4 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, जर भारत हरला तर त्याला सुमारे 1.34 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 11.6 कोटी रुपये) मिळतील. साहजिकच बक्षिसाची रक्कम एवढी मोठी असताना स्पर्धा खूपच चुरशीची होणार आहे. बघूया कोणाला सुमारे 20 कोटी रुपये मिळतात आणि निम्मी रक्कम कोणाला मिळते.
फायनलमधील टॉसच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर नाणेफेक हरलेल्या संघाने 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी आर अश्विन म्हणाला की कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकली नाही तर ते अधिक चांगले होईल. अश्विनने असे सांगितले कारण जेव्हा रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळला तेव्हा सलग 11वी वेळ त्याने नाणेफेक गमावली होती. अशा परिस्थितीत नाणेफेक हरल्यानंतरही रोहित सामना जिंकत आहे, जे त्याच्यासाठी भाग्यवान ठरत आहे.
IND vs NZ Final LIVE Score: काय म्हणाले विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक?
#WATCH | #ICCChampionsTrophy | Delhi | Ahead of the final clash between India and New Zealand in Dubai today, Indian cricketer Virat Kohli's former coach, Raj Kumar Sharma says, " Two very good teams have reached finals, I feel that it will be tough competition. Both teams are… pic.twitter.com/53n58RNYia
— ANI (@ANI) March 9, 2025
मुरादाबाद, उत्तर प्रदेश | क्रिकेटपटू मोहम्मद शमीचे नातेवाईक IND vs NZ फायनलपूर्वी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. अपराजित भारत आज दुबईमध्ये न्यूझीलंडशी सामना खेळणार आहे. उपांत्य फेरीत, भारताने ऑस्ट्रेलियावर चार विकेटने विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
#WATCH | #ICCChampionsTrophy | Moradabad, UP | Relatives of cricketer Mohammad Shami, offer prayers for the victory of team India ahead of the #INDvsNZ finals.
Unbeaten India is set to take on New Zealand in Dubai today. In the semifinals, India secured their place in the final… pic.twitter.com/QZmA1Pj5aL
— ANI (@ANI) March 9, 2025
Gearing for the #Final #TeamIndia | #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/gFovpyLGoy
— BCCI (@BCCI) March 8, 2025
जोधपूर, राजस्थान | भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील #ICCChampionsTrophy2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी, कारागीर जितेंद्र चौहान रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंच्या छायाचित्रांसह ड्रम विकत आहेत.
#WATCH | Jodhpur, Rajasthan | Artisan Jitendra Chauhan sells drums with pictures of Indian cricketers, including Rohit Sharma, Jaspreet Bumrah, Hardik Pandya, and Rishabh Pant, ahead of #ICCChampionsTrophy2025 final today between India and New Zealand. pic.twitter.com/on6IZSE8RN
— ANI (@ANI) March 9, 2025
भारताच्या विजयासाठी भारतातील अनेक ठिकाणी हवन-पूजा केली जात आहे.
#WATCH | #ICCChampionsTrophy | Prayagraj, UP | Transgender community performs 'havan' for team India's victory, ahead of the #INDvsNZ final clash pic.twitter.com/a5ysA8R0xZ
— ANI (@ANI) March 9, 2025
आयसीसी स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत २१ सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने ७ जिंकले आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उभय संघांमध्ये 11 सामने झाले आहेत, ज्यात भारताने 5 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत, एक सामना निकालाशिवाय राहिला आहे.
आयसीसी ( ICC) स्पर्धांच्या बाद फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 4 सामने झाले आहेत, ज्यामध्ये किवी संघाने तीन जिंकले आहेत, तर भारतीय संघ एक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 61 सामने जिंकले आहेत तर आणि न्यूझीलंड संघाने 50 सामने जिंकले आहेत. सात सामने निकालाशिवाय राहिले आहेत आणि एक मॅट टाय झाली आहे.
IND vs NZ Champions Trophy Final Live Streaming FREE: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना आज,रविवारी दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मोफत कुठे पाहता येईल हे जाणून घेऊयात.
सविस्तर वाचा: Live Streaming FREE: भारत-न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मोफत कुठे पाहू शकता? जाणून घ्या डिटेल्स
IND vs NZ Final Pitch Report Dubai Weather Forecast: 12 वर्षांनंतर भारताला पुन्हा एकदा आयसीसीचे हे मोठे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. भारताने शेवटचे 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात पावसामुळे व्यत्यय येणार की नाही, याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. चला जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज..
सविस्तर वाचा: IND vs NZ, Pitch Report: भारत आणि न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात पाऊस अडथळा ठरणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. IND विरुद्ध NZ सामना रविवार, 9 मार्च रोजी UAE मधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने 2000 साली भारताचा अंतिम फेरीत पराभव करून पहिली आणि एकमेव ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताला त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.