Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IND vs PAK Live Score: देशात दिवाळी आधीच दिवाळी! विश्वचषचकात टीम इंडियाची आठव्यांदा पाकवर मात

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: आयसीसी विश्वचषक 2023 च्या 12 व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. 

IND vs PAK Live Score: देशात दिवाळी आधीच दिवाळी! विश्वचषचकात टीम इंडियाची आठव्यांदा पाकवर मात
LIVE Blog

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात आजपर्यंत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध एकही सामना हरलेला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरही हा विक्रम कायम ठेवायचा आहे.

14 October 2023
14 October 2023 18:58 PM

IND vs PAK Live Score: रोहितचं अर्ध शतक, तर भारतच शतक, विजयाच्या दिशेने वाटचाल

कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध तुफान फलंदाजी करत आहे. रोहितने चौकार आणि षटकार मारत अर्ध शतक पूर्ण केलं आहे. तर भारताने 100 रन्स पूर्ण केले असून  विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आता रोहितला साथ देण्यासाठी मैदानावर श्रेयस अय्यर आला आहे. 

14 October 2023 18:44 PM

IND vs PAK Live Score: भारतला दुसरा धक्का, किंग कोहली बाद

कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध तुफान फलंदाजी करत आहे. तर किंग कोहली 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा करून बाद झाला. आता रोहितला साथ देण्यासाठी मैदानावर श्रेयस अय्यर आला आहे. 

14 October 2023 17:24 PM

IND vs PAK Live Score: भारताला 192 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या बॉलिंगसमोर पाकची शरणागती

पाकिस्तान संघाला टीम इंडियाच्या खेळाडूने 200 धावा करण्यापासून रोखण्यात यश आलं. कुलदीप आणि बुमराच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली.  

14 October 2023 17:15 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तान संघाची घसरगुंडी

187 धावांवर प्रथम हार्दिक पंड्याने मोहम्मद नवाजला जसप्रीत बुमराहकडे झेलबाद केले आणि त्यानंतर हसन अलीही जडेजाच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. 

14 October 2023 16:53 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तान संघाची घसरगुंडी

बुमरा आणि कुलदीपच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे खेळाडू शरणागती पतकरली. पाकिस्तानची घसरगुंडी सुरु आहे. सध्या मैदानावर हसन आणि नवाज आहेत. 

14 October 2023 16:48 PM

IND vs PAK Live Score: पाकिस्तानची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये 

भारतीय गोलदांजानी कमाल खेळी केली आहे. पाकिस्तानची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. दोन सलग कुलदीपने विकेट घेतल्यानंतर सहावी विकेट बुमराने घेतली. 155 धावांवर दोन विकेट्सवर पाकिस्तानची धावसंख्या 168 धावांवर सहा विकेट्स अशी झाली आहे. रिझवान 69 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. बुमराने रिझवानचं अर्ध शकत होऊ दिलं नाही.  

14 October 2023 16:44 PM

IND vs PAK Live Score: कुलदीप यादवने इफ्तिखार अहमदला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

कुलदीप यादवने 33व्या षटकात आश्चर्यकारक कामगिरी केली. या षटकात कुलदीपने दोन बळी घेतले. कुलदीपने प्रथम सौद शकीलला बाद केले. त्यानंतर इफ्तिखार अहमदने येऊन चौकार मारला. त्यानंतर कुलदीपने त्याला बाद केले. 33 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 5 विकेटवर 166 धावा आहे. 

14 October 2023 16:38 PM

IND vs PAK Live Score: कुलदीप यादवने सौद शकीलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

पाकिस्तानने 33व्या षटकात 162 धावांवर चौथी विकेट गमावली आहे. कुलदीप यादवने सौद शकीलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला केवळ सहा धावा करता आल्या. 

14 October 2023 16:16 PM

भारताला तिसर यश! बाबर आझम अर्धशतक करुन तंबूत; मोहम्मद सिराजने केलं बोल्ड

बाबर आझम अर्धशतक करुन तंबूत परतला आहे. 58 चेंडूंमध्ये 50 धावा करुन बाबर बाद झाला.

14 October 2023 16:14 PM

पाकिस्तानच्या 150 धावा पूर्ण; बाबर आझमचं अर्धशतक

सामन्यातील 29 व्या षटकामध्ये पाकिस्तानने 150 धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार बाबर आझमने चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं.

14 October 2023 15:35 PM

पाकिस्तानच्या 100 धावा पूर्ण

18.3 ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या संघानं स्कोअरबोर्डवर झळकावलं शतक; खेळपट्टीवर बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानची जोडी जमली

14 October 2023 15:14 PM

मोहम्मद रिझवान थोडक्यात वाचला; रिव्ह्यूमुळे जीवनदान

पाकिस्तानचा मागील सामन्यातील शतकवीर मोहम्मद रिझवान थोडक्यात वाचला. मैदानावरील पंचांनी पायचित दिल्यानंतर पाकिस्तानने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यामध्ये अगदी काही इंचांनी चेंडू स्टम्प मीस करत असल्याचं दिसून आलं आणि रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पंचांनी बाद ठरवलेल्या रिझवानला जीवदान मिळालं.

14 October 2023 15:06 PM

73 धावांवर पाकिस्तानची दुसरी विकेट

इमाम-उल-हक 38 बॉलमध्ये 36 धावा करुन तंबूत परतला. इमाम-उल-हक ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या नादात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर विकेटकीपर के. एल. राहुलकरवी झेलबाद झाला.

14 October 2023 14:41 PM

भारताला पहिलं यश! अब्दुल्लाह शफीक बाद

पाकिस्तानचा संघ 41 धावांवर असताना सलामीवर अब्दुल्लाह शफीक पायचित झाला आहे. मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर अब्दुल्लाह शफीक बाद झाला. 24 बॉलमध्ये 20 धाव करुन अब्दुल्लाह शफीक तंबूत परतला. कर्णधार बाबर आझम फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

14 October 2023 14:27 PM

सहा ओव्हरनंतर पाकिस्तानने 28 धावांपर्यंत मारली मजल. इमाम-उल-हक 18 बॉलमध्ये 14 धावांवर आणि अब्दुल्लाह शफीक 18 बॉलमध्ये 13 धावांवर खेळत आहे.

14 October 2023 14:09 PM

IND vs PAK Live

भारताने टॉस जिंकला आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पाकिस्तानतर्फे इमाम-उल-हक आणि अब्दुल्लाह शफीक यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या दोन षटकात चार चौकार लगावले

14 October 2023 13:07 PM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: रोहित शर्माचा पाकिस्तानविरुद्धचा कसा आहे रेकॉर्ड?

आज पाकिस्तानविरुद्धच्या शानदार सामन्यात चाहत्यांना भारतीय कर्णधार रोहित शर्माकडून शतकाची अपेक्षा आहे. रोहित शर्माने वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळले आणि 77.50 च्या सरासरीने 155 रन्स केलेत. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावलं होतं.

14 October 2023 12:21 PM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: आज कोण ठरणार गेम चेंजर?

भारत-पाकिस्तान यांच्यातील आजच्या महान सामन्यात कोण गेम चेंजर ठरणार? जसप्रीत बुमराह गेम चेंजर ठरेल असा विश्वास इंग्लंडला 2019 चा वर्ल्डकप चॅम्पियन बनवणारा कर्णधार इऑन मॉर्गनचा आहे. बुमराह सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 2 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत.

14 October 2023 11:04 AM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी सचिन तेंडुलकर पोहोचला अहमदाबादला 

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही टीमला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबादला पोहोचला आहे. मला पूर्ण आशा आहे की, आपल्या सर्वांना हवा असलेला निकाल मिळेल, असं सचिनने म्हटलंय

14 October 2023 10:54 AM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: शुभमन गिलचं होणार कमबॅक?

टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल डेंग्यूच्या विळख्यातून बरा झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात शुभमन गिलच्या कमबॅकवर मात्र अजून सस्पेंस आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने गिल 99 टक्के तंदुरुस्त असल्याचं अपडेट दिले होते. शुभमन गिल प्लेइंग 11 मध्ये परतला तर कोणाला बाहेर बसावे लागेल हे पहावं लागणार आहे.

14 October 2023 09:54 AM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: अहमदाबादचं पीच कसं आहे?

अहमदाबादचं पीच फलंदाजांसाठी चांगलं मानली जाते. आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात फोर आणि सिक्सची संख्या जास्त असू शकते. खेळपट्टीवर चांगली उसळी दिसून येते आणि बॉल योग्य रितीनेबॅटवर येतो.

14 October 2023 08:54 AM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा विक्रम

भारताने अहमदाबादमध्ये आतापर्यंत एकूण 18 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी 10 टीमने जिंकले आहेत. त्याचबरोबर टीमला 8 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

14 October 2023 08:07 AM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: फॉर्ममध्ये आहेत टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज

पाकिस्तानविरूद्ध सामना रंगणार असून भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत संघातील अनुभवी फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर गोलंदाजांची कामगिरीही या स्पर्धेत आतापर्यंत दमदार राहिली आहे.

14 October 2023 07:11 AM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना 2019 साली झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 89 रन्सने पराभव केला होता.

 

14 October 2023 06:27 AM

India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: भारत आजपर्यंत पाकिस्तानकडून एकदाही हरलेला नाही

एकदिवसीय वर्ल्डकपमधये भारत आणि पाकिस्तानची टीम एकूण 7 वेळा आमनेसामने आली आहे. आणि सातही वेळा भारताने विजय मिळवला आहे.

Read More