India vs Sri Lanka Final Live Score: एशिया कपचा फायनल सामना आज रंगणार आहे. भारत विरूद्ध श्रीलंका आर प्रेमदासा स्टेडियममध्ये एकमेकांविरूद्ध भिडणार आहेत.
श्रीलंकेने दिलेल्या 51 धावांचं आव्हान पार करताना टीम इंडियाची चांगली सुरूवात झाली. रोहित शर्मा सलामीला आला नाही. शुभमन गिल आणि इशान किशनची जोडी मैदानात उतरली. पहिल्या 5 ओव्हरमध्ये भारताने 46 धावा केल्या.
IND vs SL Final : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या आशिया कपच्या फायनल (Asia Cup Final) सामन्यात मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध कहर केल्याचं पहायला मिळालं. प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडियाने फक्त 50 धावांमध्ये संपूर्ण श्रीलंकेचा संघ तंबुत पाठवला आहे. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने विजय सोप्पा केला आहे. सिराजने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. 7 ओव्हरमध्ये त्याने 21 रन्स खर्च केले. तर दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्याने 3 रन्स खर्च करून 3 गडी बाद केले.
मोहम्मद सिराज पाठोपाठ आता हार्दिक पांड्याने देखील घातक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. पांड्याने श्रीलंकेची आठवी विकेट काढली. दुनिथ वेल्लालागे 8 धावा करत बाद झाला.
मोहम्मद सिराज आज घातक गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. एकट्या सिराजने श्रीलंकेचा अर्धा संघ बाद केलाय. पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि दसुन शानाका यांना बाद केलंय.
SL 13/6 (6)
मोहम्मद सिराजने श्रीलंकेवर थेट सर्जीकल स्टाईक केली आहे. सिराजने सलग तीन बॉलवर दोन गडी माघारी धाडले. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला सदिरा समरविक्रमा एकही धाव न घेता तंबुत परतला. त्यानंतर श्रीलंकेचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू चारिथ असलंका हा देखील सिराजने योग्य टप्प्यात टीपला आहे.
बुमराहनंतर आता सिराजने घातक मारा सुरू केला आहे. सिराजची पहिला ओव्हर मेडन गेल्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर निसांका तंबुत परतलाय.
जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिली आहे. सामन्याच्या तिसऱ्याच बॉलवर श्रीलंकेची पहिली विकेट गेली. कुसल परेरा गोल्डन डक...
Inching closer to LIVE Action #TeamIndia are all set for the #AsiaCup2023 Final #INDvSL pic.twitter.com/EvsfJUiX4k
— BCCI (@BCCI) September 17, 2023
Toss & Team News from Colombo
Sri Lanka have elected to bat against #TeamIndia in the #AsiaCup2023 Final.
Here's our Playing XI #INDvSL
Follow the match https://t.co/xrKl5d85dN pic.twitter.com/tzLDct6Ppb
— BCCI (@BCCI) September 17, 2023
श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. जखमी महेश तिक्ष्णाच्या जागी हेमंता खेळत आहे.
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्स, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये पाच बदल केले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचं कमबॅक झालं आहे. त्याचबरोबर जखमी अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. सुंदर ऑफ स्पिनर आहे.
श्रीलंकेच्या कर्णधाराने टॉस जिंकला आहे. त्यानुसार टीम इंडिया फायनल सामन्यात प्रथम गोलंदाजी करणार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार आज त्याच्या कारकिर्दीतील 250 वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
सध्या कोलंबोमधून मिळालेल्या अपडेटनुसार, त्या ठिकाणी हवामान स्वच्छ आहे आणि पाऊस पडत नाहीये. त्यामुळे टॉस ठरलेल्या वेळेत म्हणजेच दुपारी २.३० वाजता होऊ शकते.
भारत आणि श्रीलंकेची टीम प्रेमदासा स्टेडियमवर पोहोचलीये. श्रीलंकेचा मुख्य फिरकीपटू महिश तिक्षाना याच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे बाहेर आहे.
भारताने एशिया कप आतापर्यंत सहा वेळा वनडे आणि एकदा टी20 मध्ये जिंकलाय. तर श्रीलंकेने वनडे सामन्यांमध्ये पाच वेळा आणि टी-20मध्ये एकदा विजय मिळवला आहे.
वनडे एशिया कप स्पर्धेत भारत आणि श्रीलंका 20 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी १० सामने भारताने तर १० सामने श्रीलंकेने जिंकले आहेत.
भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे एशिया कपचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वेळी भारताने 2018 मध्ये एशिया कप जिंकला होता. आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा हे विजेतेपद पटकावण्याकडे टीमचं लक्ष असेल.
भारत विरुद्ध श्रीलंका आशिया कप अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी अडीच वाजता टॉस होईल.
IND vs SL Final: फायनल सामन्यापूर्वी काही तास अगोदर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. यावेळी फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठा बदल केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी एका स्टार खेळाडूला टीममध्ये एन्ट्री दिलीये.
फायनल सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
क्लिक करा- IND vs SL Final: पाऊस पडल्यास Reserve Day ला किती ओव्हर्सचा होणार सामना? पाहा नियम काय सांगतो?
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
भारत आणि श्रीलंका टीम वनडे सामन्यांमध्ये आतापर्यंत 166 वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात भारत वरचढ राहिला आहे. टीम इंडियाने 97 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. 11 सामन्यांचा निकाल जाहीर झालेला नाही.
सुपर-4 सामन्यात पराभूत झालेल्या टीममध्ये भारताला अनेक बदल करायचे आहेत. श्रीलंकेविरुद्ध अनुभवी खेळाडूंचे कमबॅक होणं निश्चित आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.