Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

India vs Sri Lanka Live: भारताचा श्रीलंकेवर शानदार विजय, अंतिम फेरीचं तिकिट निश्चित

India vs Sri Lanka Live: आशिया चषक स्पर्धेमधील 'सुपर-4'च्या फेरीमध्ये भारताचा दुसरा सामना आज श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. भारताने कालच पाकिस्तानला 238 धावांनी पराभूत करत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

India vs Sri Lanka Live: भारताचा श्रीलंकेवर शानदार विजय, अंतिम फेरीचं तिकिट निश्चित
LIVE Blog

India vs Sri Lanka Live: आशिया चषक स्पर्धेमधील 'सुपर-4'च्या फेरीमध्ये भारताचा दुसरा सामना आज श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. भारताने कालच पाकिस्तानला 238 धावांनी पराभूत करत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये स्थानी निश्चित करण्याच्या हेतूनेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे यजमान श्रीलंकेलाही स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. या सामन्यातील क्षणोक्षणाच्या अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

12 September 2023
12 September 2023 21:16 PM

India vs Sri Lanka Live 
विजयासाटी 214 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या श्रीलंकेचा निम्मा संघ तंबुत परतला आहे.. सामन्याच्या विसाव्या षटकात चायनामन कुलदीप यादवने लंकेला पाचवा धक्का दिला.. 22 धावांवर खेळणाऱ्या असालंकाला कुलदीप यादवने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. कुलदीप यादवची ही दुसरी विकेट ठरली आहे. 

 

12 September 2023 21:08 PM

India vs Sri Lanka Live 
विजयासाटी 214 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या श्रीलंकेला चौथा धक्का बसला आहे. सामन्याच्या सतराव्या षटकात चायनामन कुलदीप यादवने सदीरा समरविक्रमाची विकेट घेतली. त्याने 17 धावा केल्या. श्रीलंकेने 69 धावात चार विकेट गमावल्या आहेत. 

12 September 2023 20:15 PM

India vs Sri Lanka Live 
विजयाचं माफक आव्हान घेऊन खेळणाऱ्या श्रीलंकेला तिसरा धक्का बसला आहे. सामन्याच्या आठव्या षटकात मोहम्मद सिराजने सलामीला आलेल्या करुणारत्नेला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. 25 धावांवर लंकेला तिसरा धक्का बसला. स्लीपमध्ये शुभमन गिलने करुणारत्नेचा शानदार झेल टिपला

 

12 September 2023 20:12 PM

India vs Sri Lanka Live 
विजयाचं माफक आव्हान घेऊन खेळणाऱ्या श्रीलंकेला दुसरा धक्का बसला आहे. सामन्याच्या सातव्या षटकात कुसाल मेंडीस बाद झाला. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहनेच दुसरी विकेट घेतली. बुमराहच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने मेंडीसचा झेल पकडला, लंकेने 2 विकेट गमावत 25 धावा केल्या आहेत. 

 

12 September 2023 19:49 PM

India vs Sri Lanka Live 
एशिया कप स्पर्धेच्या सुपर-4 सामन्यात भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 213 धावात ऑलाऊट झाला. विजयाचं माफक आव्हान ठेवून श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला आहे. निसांका आणि करुणारत्ने या सलामीच्या फलंदाजांनी डावाला सुरुवात केली. पण सामन्याच्या तिसऱ्याच षटकात बुमरहाने लंकेला पहिला धक्का दिला. निसांका अवघ्या 6 धावा करुन बाद झाला. 

12 September 2023 19:27 PM

श्रीलंकेसमोर विजयासाठी 214 धावांचं लक्ष्य! भारतीय फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष

भारताचा संपूर्ण संघ 49.1 षटकांमध्ये 213 धावांवर बाद झाला आहे. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत भारताच्या 9 गड्यांना आपल्या फिरकीत गुंडळल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

12 September 2023 19:17 PM

पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात...

पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघ उर्वरित 3 षटकं खेळून काढणार आहे.

12 September 2023 18:25 PM

पावसामुळे खेळ थांबवला

कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवण्यात आला आहे. भारतीय संघाने 47 ओव्हर खेळून काढल्या आहेत. 197 धावांवर भारताचे 9 गडी तंबूत परतले आहेत.

12 September 2023 18:03 PM

2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स धक्का!

जसप्रीत बुमराह 12 चेंडूंमध्ये 5 धावा करुन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला फिरकीपटू कुलदीप यादव पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. या दोघांनाही चरिथ असलांकाने बाद केलं.

12 September 2023 17:52 PM

जडेजाही तंबूत, 250 धावा गाठणही कठीण

रविंद्र जडेजा बाद! चरिथ असलांकाच्या गोलंदाजीवर जडेजा झेलबाद झाला. त्याने 19 चेंडूंमध्ये 4 धावा केल्या. सध्याची स्थिती पाहता भारताला 250 धावांपर्यंत पोहचण्यासाठीही कसरत करावी लागणार आहे.

 

12 September 2023 17:39 PM

सहावा गडीही तंबूत

डुनिथ वेललेजने आपल्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर हार्दीक पंड्याला बाद केलं. हार्दिक पंड्याने 18 चेंडूंमध्ये पाच धावा केल्या.

12 September 2023 17:33 PM

भारताचा अर्धा संघ तंबूत परतला

61 चेंडूंमध्ये 33 धावा करुन इशान किशन तंबूत परतला. भारताचा धावफलक 170 वर असताना भारताचा अर्धा संघ तंबूत परतला. 35 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चरिथ असलांकाच्या गोलंदाजीवर डुनिथ वेललेजने इशानचा भन्नाट झेल पकडला.

12 September 2023 17:13 PM

भारताला चौथा झटका! राहुल तंबूत परतला; एकाच गोलंदाजाने घेतल्या 4 विकेट्स

के. एल. राहुल आणि इशान किशनची चांगली पार्टनरशीप होत असतानाच डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजीवर राहुल झेलबाद झाला. चेंडू खेळून काढण्याच्या नादात राहुलने गोलंदाज डुनिथ वेललेजला झेल दिला. राहुल 44 चेंडूंमध्ये 39 धावा करुन बाद झाला.

12 September 2023 16:41 PM

राहुल आणि इशानची जोडी जमली

22 षटकांनंतर भारताचा धावफलक 116 वर. विराट, रोहित, शुभमन तंबूत परतले. 22 षटकांनंतर के. एल. राहुल 9 धावांवर तर इशान किशन 13 धावांवर खेळत आहे.

12 September 2023 16:08 PM

विराट कोलही बाद

भारताला दुसरा धक्का! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतकवीर विराट कोहली बाद! डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजीवर चेंडू खेळून काढण्याच्या नादात विराटने दासुन शनाकाकरवी झेलबाद केलं. विराट 12 चेंडूंमध्ये 3 धावा करुन तंबूत परतला.

12 September 2023 16:06 PM

रोहित शर्मा अर्थशतक झळकावून तंबूत

कर्णधार रोहित शर्मा 48 चेंडूंमध्ये 53 धावा करुन तंबूत परतला. डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजी खेळताना चेंडूने उसळी न घेतल्याने रोहित गोंधळला आणि चेंडूने रोहितच्या पाय आणि पॅडमधून गॅप काढत स्टम्प्सचा वेध घेतला.

12 September 2023 16:01 PM

रोहित शर्माचं अर्धशतक

रोहित शर्माने सलग दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने 44 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावताना 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितने चौकार झळकावत अर्धशतक साजरं केलं.

12 September 2023 15:54 PM

भारताला पहिला धक्का शुभमन तंबूत परतला

भारताला पाहिला झटका. फिरकी गोलंदाजीवर शुभमन गील बाद. 25 चेंडूंमध्ये 19 धावा करुन शुभमन तंबूत परतला. डुनिथ वेललेजच्या फिरत्या चेंडूचा अंदाज शुभमनला आला नाही आणि चेंडूने त्याच्या बॅट आणि पॅडमधून थेट यष्ट्यांना धडकला. 

12 September 2023 15:37 PM

रोहितच्या 10 हजार धावा पूर्ण

भारताचा कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सामन्यातील सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने षटकार लगावला. या षटकारासहीत रोहित 17 धावांवरुन 23 धावांवर गेला आणि त्याने 10 हजारांचा टप्पा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या 22 धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे 10 हजार धावा पुर्ण करणारा तो सहावा खेळाडू ठरला आहे. सर्वात जलद गतीने 10 हजार धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत विराट पहिल्या स्थानी असून रोहितने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच रोहित आशिया चषकामध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडूही ठरला आहे. रोहितने 10 हजार धावांचा टप्पा षटकारासहीत पूर्ण करत शाहीद आफ्रिदीचा 25 षटकार मारण्याचा विक्रमही मोडीत काढला.

12 September 2023 15:09 PM

भारताची संयमी सुरुवात

भारताचा कर्णधार रोहित शर्माने चौकारासहीत भारताचं खातं उघडलं. 3 षटकांनंतर भारताचा धावफलक शून्य बाद 13 धावा. रोहित-शुमनची संयमी सुरुवात.

12 September 2023 15:03 PM

भारताने खातं उघडलं

भारताचे सालामीवर रोहित शर्मा आणि शुभमन गील हे फलंदाजीसाठी मैदानात उतरले असून रोहित शर्माने सामन्यातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत भारताच्या डावाला सुरुवात केली. पाहिल्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर बीन बाद 7 इतका आहे.

12 September 2023 14:37 PM

भारताने संघ बदलला

भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देणाऱ्या संघामध्ये बदल केला आहे. भारत आज 3 फिरकी गोलंदाज खेळवणार आहे.पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या शार्दुल ठाकूरला संघाबाहेर बसवण्यात येणार असून 3 फिरकी गोलंदाज हवेत म्हणून संघात अक्षर पटेलला खेळवलं जाणार आहे. खेळपट्टी पाहता एखादा अधिक फिरकीपटू संघात असावा म्हणून आम्ही अक्षर पटेलला खेळवत आहोत असं रोहित म्हणाले. मागील सामन्यामध्ये कुलदीप यादवने 5 गडी बाद केले. आज भारतीय संघाकडून कुलदीपबरोबरच रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलही गोलंदाजी करणार आहे.

12 September 2023 14:32 PM

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये टॉस जिंकला. रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

12 September 2023 14:23 PM

पाऊस नाही पडला तर पडणार 'विक्रमांचा पाऊस'! रोहित, विराटबरोबर कुलदीपही मोडणार अनोखा विक्रम

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आद आशिया चषक स्पर्धेतील 'सुपर-4' सामना खेळवला जाणार आहे. अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीत स्थान मिळवले असं मानलं जात आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या सामन्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीबरोबरच कुलदीप यादवही अनोख्या विक्रमांना गवसणी घालू शकतात. हे विक्रम कोणते आणि हवामानाची स्थिती काय पाहा येथे क्लिक करुन...

12 September 2023 14:00 PM

पावसाची शक्यता पण...

'वेदर डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार आज कोलंबोमध्ये सामन्याच्या कालावधीदरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. पाऊस पडण्याची शक्यता अगदी 15 टक्के इतकी आहे. सायंकाळी 7 वाजच्या सुमारास विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडू शकतो. त्यानंतर रात्री 10 वाजताही पाऊस पडू शकतो. मात्र पाऊल अल्प कालावधीसाठी असेल असंही सांगण्यात आलं आहे. पावसामुळे सामन्याला मोठा फटका बसण्याची शक्यता कमी आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

12 September 2023 13:52 PM

...तर भारत श्रीलंकेत 17 सप्टेंबरला होणार Asia Cup 2023 चा अंतिम सामना; पाकिस्तान स्पर्धेतून Out!
भारत सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी असून आज म्हणजेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर 15 तासांच्या आत पुन्हा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाच्या या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरच हा सामना होणार असून हा सामना जिंकल्यास भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचसंदर्भात जाणून घ्या येथे क्लिक करुन.

12 September 2023 13:50 PM

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर पुन्हा 15 तासांच्या आत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानामध्ये उतरणार आहे. मात्र कोलंबोमध्ये पाऊस सुरु असून या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.

Read More