IPL 2023 SRH vs LSG LIVE: आयपीएल 2023 च्या अंतिम लढती अधिक रोमांचक होत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आतूर असल्याचं दिसतंय. अशातच आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लनखऊ सूपर जायन्ट्स (Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants) यांच्यात खेळवला जाणार आहे. आजचा सामना लनखऊसाठी करो या मरो असा असणार आहे. तर दुसरी हैदराबाद आजच्या सामनात विजय नोंदवून प्लेऑफचं (IPL 2023 Playoffs) गणित बिघडवणार की काय? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय.