Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2024 DC vs RR Live Score : वादग्रस्त लढतीत दिल्लीचा विजय; राजस्थानचा 20 धावांनी पराभव

Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Score : आयपीएलच्या 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने आहेत. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळवला जातोय. हा सामना जिंकत राजस्थान रॉयल्स प्ले ऑफमधलं आपलं स्थान पक्कं करेल. तर राजस्थानवर मात करत प्ले ऑफमधलं आव्हान कायम ठेवण्याचा दिल्ली कॅपिटल्सचा प्रयत्न असणार आहे. 

IPL 2024 DC vs RR Live Score : वादग्रस्त लढतीत दिल्लीचा विजय; राजस्थानचा 20 धावांनी पराभव
LIVE Blog

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलमध्ये आज 56 वा सामना रंगतोय. ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स आणि संजू सॅमनसची राजस्थान रॉयल्स आमने सामने आहेत. प्ले ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. राजस्थान रॉयल्स पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. एका विजयाने राजस्थानचं प्ले ऑफमधलं स्थान निश्चित होणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स पॉईंटटेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. 

07 May 2024
07 May 2024 23:37 PM

 वादग्रस्त लढतीत दिल्लीचा विजय झाला आहे. दिल्लीने राजस्थानचा 20 धावांनी पराभव केला आहे.  

07 May 2024 22:01 PM

IPL 2024 DC vs RR Live Score 
विजयसाठी 222 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे. सलामीला आलेला जोस बटलर 19 धावांवर बाद झाला. तर त्याआधी यशस्वी जयस्वाल अवघ्या 4 धावांवर बाद झाला. संजू सॅमसनने फटकेबाजी करत स्कोरबोर्ड हलता ठेवला आहे.

07 May 2024 21:18 PM

IPL 2024 DC vs RR Live Score 
दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानसमोर विजयासाठी 222 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिली फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने 8 विकेट गमावत 221 धावा केल्या. दिल्लीच्या तळाच्या फलंदाजांनीही आक्रमक फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. दिल्लीतर्फे अभिषेक पोरेलने सर्वाधिक 65 तर जॅक फ्रेजरने 50 धावा केल्या. राजस्थानतर्फे रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

07 May 2024 20:39 PM

IPL 2024 DC vs RR Live Score 
दिल्ली कॅपिटल्सला पाचवा धक्का बसला आहे. तुफान फटकेबाजी करणारा अभिषेक पोरेल 65 धावांवर बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 15 धावा करुन बाद झाला. युजवेंद्र चहलने त्याची विकेट घेतली.

07 May 2024 20:35 PM

IPL 2024 DC vs RR Live Score 
दिल्ली कॅपिटल्सला चौथा धक्का बसला आहे. तुफान फटकेबाजी करणारा अभिषेक पोरेल 65 धावांवर बाद झाला. आर अश्विनने त्याची विकेट घेतली. अभिषेक पोरेलने अवघ्या 36 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. दिल्लीने 13 षटकांनंतर 146 धावा केल्यात.

 

07 May 2024 20:19 PM

IPL 2024 DC vs RR Live Score 
आक्रमक सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का बसला आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अक्षर पटेल 15 धावा करुन बाद झाला. आर अश्विनने त्याला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. अश्विनने दोन विकेट घेतल्या. तर दिल्लीने तीन विकेट गमावत 100 धावांचा टप्पा पार केलाय.

07 May 2024 20:05 PM

IPL 2024 DC vs RR Live Score 
आक्रमक सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला लागोपाठ दोन धक्के बसले. जॅक फ्रेजर आणि अभिषेक पोरेल या सलामीच्या जोडीने दिल्लीला दणदणीत सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी चार षटकात 60 धावांची भागिदारी केली. पण आर अश्विनने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फ्रेजरला बाद केलं. तर पुढच्याच षटकात तिसऱ्या क्रमांकावर आलेला शाय हो रनआऊट झाला. फ्रेजरने 50 धावा केल्या. तर होप एक धाव करुन बाद झाला

 

07 May 2024 19:45 PM

IPL 2024 DC vs RR Live Score 
आयपीएलमध्ये पहिली फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली आहे. जॅक फ्रेझर-मॅक्गर्क आणि पोरेल जोडीने फटकेबाजी करत पहिल्या तीन षटकातच 30 हून अधिका धावा केल्या आहेत. 

 

07 May 2024 19:06 PM

IPL 2024 DC vs RR Live Score 
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलमध्ये आज 56 वा सामना रंगतोय. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. दिल्लीचा आयपीएलमधला हा 250 वा सामना आहे. 

Read More