Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2024 MI vs SRH Live Update : मुंबईचा शानदार विजय; हैदराबादवर सात विकेटने मात

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 55 वा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. पॉईंटटेबलमध्ये सनरायजर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहेत. तर मुंबई इंडियन्स दहाव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाठी हैदराबादच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. 

IPL 2024 MI vs SRH Live Update : मुंबईचा शानदार विजय; हैदराबादवर सात विकेटने मात
LIVE Blog

IPL 2024 इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आज हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स (Mumbai Indins) आणि पॅट कमिन्सची (Pat Cummins) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमने सामने आहेत.  या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही संघांमध्ये स्फोट फलंदाज आहेत. 

06 May 2024
06 May 2024 23:16 PM

मुंबईचा शानदार विजय झाला आहे. मुंबईने हैदराबादवर सात विकेटने मात करत सामना जिंकला आहे. 

06 May 2024 22:47 PM

174 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सला सुरुवातीला झटपट 3 धक्के बसले. पण त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी फटकेबाजी करत मुंबईला सवाशे धावांचा टप्पा पार करुन दिलाय. सूर्यकुमार यादवने शानदार हाफसेंच्युरी पूर्ण केली.

06 May 2024 22:04 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
मुंबई इंडियन्सला पाच षटकाच्या आतच तीन धक्के बसलेत. सलामीवीर ईशान किशन आणि रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नमन धीरसुद्ध मोठी खेळी न करता बाद झाला. भूवनेश्वरने त्याला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. नमनने भोपळाही फोडला नाही.

06 May 2024 21:58 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
विजयासाठी 174 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसलाय. सलामीला आलेला ईशान किशन 9 धावा करुन बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात रोहित शर्मा झेल बाद झाला. रोहितने केवळ 4 धावा केल्या. पॅट कमिन्सने त्याची विकेट घेतली. मुंबईने 31 धावांवर दोन विकेट गमावलेत.

06 May 2024 21:56 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
विजयासाठी 174 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसलाय. सलामीला आलेला ईशान किशन 9 धावा करुन बाद झाला. जान्सेनने त्याची विकेट घेतली. मुंबई इंडियन्सने 1 विकेट गमावत 3 षटकात 31 धावा केल्यात.

06 May 2024 21:26 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
पहिली फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 8 विकेट गमावत निर्धारित 20 षटकात 173 धावा केल्या असून मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 174 धावांच आव्हान ठेवलं आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने शेवटच्या षटकात 16 धावा करत समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. हेडने सर्वाधिक 48 तर तर पॅट कमिन्सने नाबाद 35 धावा केल्या. मुंबईतर्फे हार्दिक पांड्या आणि पियुष चावलाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर अंशुल कम्बोज आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

06 May 2024 21:01 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
पहिली फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने सात विकेट गमावले आहेत. 124 धावात सात फलंदाज पॅव्हेलिनमध्ये परतले. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या.

06 May 2024 20:46 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
आयपीएलच्या पंचावन्नव्या सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने शंभर धावांचा टप्पा पार केला आहे. हैदराबादने 13 षटकात पाच विकेट गमावत 105 धावा केल्यात.

06 May 2024 20:40 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
आयपीएलच्या पंचावन्नव्या सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. शंभर धावांच्या आतच हैदराबादचे पाच फलंदाज बाद झालेत. आक्रमक फलंदाज हेन्रिक क्लासेन या सामन्यात मोठी खेळी करु शकला नाही. तो अवघ्या 2 धावांवर बाद झाला. फिरकी गोलंदाज पियुष चावलाने त्याला क्लिन बोल्ड केलं.

 

06 May 2024 20:34 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन देणारा ट्रेव्हिस हेड 48 धावा करुन बाद झाला. त्यानंतर लगेचच नीतिश कुमार रेड्डी बाद झाला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नीतिशाल बाद केलं. त्याने वीस धावा केल्या.

06 May 2024 20:31 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन देणारा ट्रेव्हिस हेड 48 धावा करुन बाद झालाय. मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हेडला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखला. हैदराबादने 90 धावांवर तीन विकेट गमावलेत. 

 

06 May 2024 20:17 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
समरायजर्स हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मयंक अग्रवाल 5 धावा करुन बाद झाला. अंशुल कम्बोजने त्याला क्लिन बोल्ड केलं. आठव्या षटकात कम्बोजच्या गोलंदाजीवर ट्रेव्हिस हेडचा सोपा झेल सोडला.

06 May 2024 20:08 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update :
समरायजर्स हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराहने मुंबईला पहिलं यश मिळवूवन दिल. हैदराबादच्या डावाची सुरुवात करणारा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा 11 धावांवर बाद झाला. हैदराबादने एक विकेट गमावत 6 षटकात 60 धावांचा टप्पा पार केला आहे. 

06 May 2024 19:05 PM

IPL 2024 MI vs SRH Live Update 
आयपीएलच्या 55 व्या सामन्यात आज मुंबईं इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने आहेत. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायजर्स हैदराबाद फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. गेराल्ड कोएत्जीच्या जागी अंशुल कम्बोजला संधी देण्यात आली आहे. 

Read More