IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हा सामना खेळवला जातोय. राजस्थान रॉयल्सने पहिला सामना जिंकत चांगली सुरुवात केलीय. तर दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
यूजवेंद्र चहलच्या फिरकीचा जादू दिल्ली कॅपिटल्सत्या फलंदाजांवर होताना दिसतोय, 16 व्या ओव्हरीच चहलने इशान पोरेलला कॅच आऊट केले आहे.
15 व्या ओव्हरच्या अखेरीस दिल्लीची स्ठिती पून्हा खराब झाली असून दिल्लीकडून आता ट्रिस्टन स्टब्स आणि इशान पोरेल मैदानावर उतरलेले आहेत, दिल्ली 15 व्या ओव्हरनंतर 120-4 या स्ठितीत आहे.
युजवेंद्र चहलने 15 व्या ओव्हरमध्ये रिषभ पंतला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवून 28 धावांवर परत पाठवले आहे, दिल्लीचा स्कोर 14 वी ओव्हर संपताना 109-4 होता
12 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला डेविड वॉर्नरच्या स्वरूपात मोठा धक्का लागलेला आहे. आवेश खानच्या गोलंदाजीवर संदीप शर्माने एक कमालीचा कॅच घेत वॉर्नर ला 49 वर परत पाठवले
10 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्स स्ठिती रिशभ पंत आणि डेविड वॉर्नरच्या भागीदारीमूळे दिल्लीची इनिंग सावरलेली आहे आणि दिल्लीचा स्कोर 88-2 इतका आहे.
पाच ओव्हरनंतर दिल्लीची स्ठिती थोडी गंभीर असून डेविड वॉर्नर आणि रिषभ पंतने दिल्लीच्या टीमला सांभाळलेले आहे आणि दिल्लीचा स्कोर 5 ओव्हरनंतर 47-2 इतका आहे.
चौथ्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला दोन धक्के लागले आहेत, ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मिचेल मार्श आणि रिकी भूई दिल्लीच्या तंबूत परतलेले आहेत. दिल्लीला या कठिण परिस्ठीतीतून सावरण्यासाठी रिषभ पंत मैदानावर उतरलेला आहे
IPL 2024 RR VS DC Live Update
राजस्थान रॉयल्सने पराग रियानच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्ससमोर 186 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रियानने नाबाबत 84 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. याला उत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सने सावध सुरुवात केली आहे. सलामीलाला आलेल्या डेव्हिडि वॉर्नर आणि मिचेल मार्श जोडीने 2 षटकांनंतर 15 धावा केल्या आहेत.
20 ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्स 185 धावा करण्यात यशस्वी झाले आहेत. दिल्लीसमोर आता 186 धावा बनवण्याचे कडे आव्हान असणार आहे. राजस्थान रॉयल्सची सुरूवात जरी हळू होती पण नंतर आर आश्विन आणि रियान परागच्या तडाखेदार खेळींनी राजस्ठानला चांगल्या स्ठितीत आणून ठेवले आहे. राजस्ठानकडून रियान पराग याने 84, आर आश्विन याने 29, तर ध्रुव जूरेल आणि शेमरॉन हेटमायरने प्रत्येकी 20 आणि 14 धावांची मौल्यवान इनिंग्स खेळून दिल्लीच्या गोलंदाजांना दबावाखाली ठेवलं.
तसेच दिल्लीकडून प्रत्येक गोलंदाजाने एक विकेट आपल्या नावावर केली आहे. दिल्लीकडून मूकेश कुमार हा महागडा बॉलर ठरलेला आहे, त्याला राजस्ठानच्या फलंदाजांनी निशाण्यावर घेत 12.2 सरासरीने 4 ओव्हर्समध्ये एकूण 49 रन्स काढले, तर सर्वात किफायतीशीर गोलंदाज अक्षर पटेल ठरलेला आहे.
18 व्या ओव्हरमध्ये नॉर्खियाने फक्त 7 धावा देत ध्रुव जूरेलची महत्वपूर्ण विकेट घेतली आणि या विकेटमुळे शेमरॉन हेटमायर मैदानात उतरलेला आहे.
रियान परागने 16 व्या ओव्हरमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलेले आहे. या तडाखेदार पाळीत परागने 4 चौकार आणि 4 षटकार लगावून दिल्लीच्या गोलंदाजांचा कस काढलेला आहे, 17 व्या ओव्हरमध्ये राजस्थानचा स्कोर आहे 138-4
रियान परागने 16 व्या ओव्हरमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलेले आहे. या तडाखेदार खेळीत परागने 4 चौकार आणि 4 षटकार लगावून दिल्लीच्या गोलंदाजांचा कस काढलेला आहे.
15 ओव्हरच्या समाप्तीनंतर राजस्थान सध्या चांगल्या स्थितीत दिसतेय. आर आश्विन तडाखेदार फलंदाजी करून 29 वर तंबूत परतला. रियान परागने आता मोर्चा आपल्या हाती घेतलेला आहे आणि दिल्लीच्या गोलंदाजांचा टोल वसूल करायची जबाबदारी घेतली आहे. राजस्थानचा स्कोर 125-3 असा आहे.
पाच षटकांच्या समाप्तीनंतर राजस्थान रॉयल्सला थोडी हळू सुरूवात मिळालेली आहे आणि राजस्ठानला संजू सॅमसनच्या स्वरूपाच खलील अहमदच्या गोलंदाजीवर दूसरा धक्का सूद्धा लागलेलाय, 5.3 ओव्हर्स पर्यंत राजस्थान रॉयल्सचा स्कोर 30-2 असा आहे.
मूकेश कुमारने दूसऱ्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालला फक्त पाच धावातच तंबूत परत पाठवले.
दिल्ली कॅपिटल्स संघ - डेविड वॉर्नर, मिचेल मार्श , रिकी भुई , ऋषभ पंत (विकेटकीपर-कॅप्टन) , ट्रिस्टन स्टब्स , अक्षर पटेल , सुमित कुमार , कुलदीप यादव , एनरिक नॉर्खिया , खलील अहमद , मुकेश कुमार
राजस्थान रॉयल्स संघ - यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर-कॅप्टन), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान
IPL 2024 RR VS DC Live Update
आयपीएलच्या नवव्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने संघात दोन बदल केले आहेत. शाय होप आणि ईशांत शर्माला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी एन्रीच नोर्किया आणि मुकेश कुमारला संधी देण्यात आली आहे. तर राजस्थान रॉयल्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.