Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2024 RCB vs PBKS Live Update : कोहलीच्या दमदार खेळीमुळे आरसीबीचा विजय, पंजाब किंग्ज प्लेऑफमधून बाहेर

IPL 2024 RCB vs PBKS : आयपीएलच्या 58 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने आहेत. प्ले ऑफच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

IPL 2024 RCB vs PBKS Live Update : कोहलीच्या दमदार खेळीमुळे आरसीबीचा विजय, पंजाब किंग्ज प्लेऑफमधून बाहेर
LIVE Blog

IPL 2024 RCB vs PBKS : आयपीएल 2024 मध्ये आता प्रत्येक सामना प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. 57 सामन्यानंतरही प्ले ऑफमध्ये अद्याप एकही संघ पोहोचलेला नाही. आता आरसीबी आणि पंजाब किंग्स आमने सामने आहेत. पॉईंटटेबलमध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सातव्या तर पंजाब किंग्स आठव्या स्थानावर आहेत. प्ले ऑफमध्ये पोहोचायचं असेल तर दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

09 May 2024
09 May 2024 23:44 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update :

पंजाब किंग्ससाठी रायली रोसोने 27 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. तर आरसीबीसाठी मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या तर स्वप्निल सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि करन शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

09 May 2024 23:42 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update :
 

कोहलीच्या आरसीबीने आयपीएल हंगामातील 5 वा विजय मिळवला आहे. बंगळुरूने पंजाब किंग्जचा 60 धावांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे पंजाब किंग्ज प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. आरसीबीने सलग 4 था विजय मिळवला असल्याने अजूनही आरसीबी प्लेऑफच्या रेसमध्ये कायम आहे.

09 May 2024 23:34 PM

पंजाबची मिडल ऑर्डर ढेपाळल्याचं पहायला मिळालं. ना शशांक चालला ना आशुतोष... आशुतोष शर्मा केवळ 8 धावा करून बाद झाला. कॅप्टन सॅम करनला देखील खास कामगिरी करता आली नाही. 

09 May 2024 22:54 PM

पंजाबला तिसरा धक्का बसला असून रायली रोसोची वादळी खेळी शांत झाली आहे. रायली रोसोने 27 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.

09 May 2024 22:36 PM

पंजाबला दुसरा धक्का बसला आहे. जॉनी बेअरस्टो 27 धावा करून बाद झाला. त्याने 16 बॉलमध्ये 4 फोर आणि एक सिक्स खेचला. लॉकी फर्ग्युसनने त्याची विकेट घेतली.

09 May 2024 22:07 PM

242 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या पंजाबला पहिल्याच षटकात धक्का बसलाय. सलामीला आलेला प्रभसिमरन सहा धावा करुन बाद झाला. स्वप्नील सिंगने त्याला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला

09 May 2024 21:51 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 242 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बंगळुरुतर्फे विराट कोहलीने सर्वाधिक 92 धावा केल्या. तर रजत पाटीदारने 55 आणि कॅमेरुन ग्रीनने 46 धावा केल्या. पंजाबतर्फे हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर युवा गोलंदाज कावेरप्पाने 2 विकेट घेतल्या.

09 May 2024 21:34 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला चौथा धक्का बसला आहे. विराट कोहली बाद झाला. विराटचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. विराटने 47 चेंडूत 92 धावा केल्या. यात त्याने 6 षटकार आणि 7 चौकारांची बरसात केली.

09 May 2024 21:05 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update
धर्मशालेत सुरु असलेला पंजाब वि. बंगळुरुचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता. त्यानंतर काही वेळाने पावसाने विश्रांती घेतली आणि पुन्हा खेळ सुरु करण्यात आला. मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावलं. यंदाच्या हंगामातील हे त्याचं पाचवं अर्धशतक ठरलंय.

09 May 2024 20:33 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update
धर्मशालेत सुरु असलेला पंजाब वि. बंगळुरुचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला आहे. धर्मशालेत चक्क गारांचा पाऊस पडतोय. मैदानावर मोठ्या मोठ्या गारा पडल्याचं दिसतंय. त्याधी बंगळरुने 10 षटकात 3 विकेट गवमात 119 धावा केल्या आहेत. विराट कोहली 43 नाबाद आहे. तर रजत पाटीदार 55 धावा करुन बाद झाला. 

09 May 2024 20:18 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे पहिले दोन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मेदानावर असलेल्या विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारची साथ मिळाली. दोघांनी फटकेबाजी करत संघाला दहाव्या षटकातच 110 धावांचा टप्पा गाठून दिला.

09 May 2024 19:54 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्या पाच षटकातच दोन धक्के बसले आहेत. बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसीस 9 धावा करुन बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला विल जॅक्स अवघ्या 12 धावांवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. बंगळुरुवे 43 धावात दोन विकेट गमावतल्यात.

09 May 2024 19:44 PM

IPL 2024 RCB vs PBKS Live Update
आयपीएलच्या 58 व्या सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिला धक्का बसला आहे. बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसीस 9 धावा करुन बाद झाला. कावेरप्पाने त्याची विकेट घेतली. बंगळुरुने 3 षटकात 1 विकेट गमावत 20 धाला केल्यात

Read More