Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2025 Mega Auction LIVE: IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली; मुंबई इंडियन्सने 30 लाखात ताफ्यात सामील करून घेतले

IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात. 

IPL 2025 Mega Auction LIVE: IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली;  मुंबई इंडियन्सने 30 लाखात ताफ्यात सामील करून घेतले
LIVE Blog

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात. 

25 November 2024
25 November 2024 21:57 PM

IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरला राहिला Unsold, एकाही संघाने दाखवला नाही रस 

अर्जुन तेंडुलकर- Unsold
प्रिन्स चौधरी- Unsold
प्रशांत सोळंकी- Unsold
मोईन अली (इंग्लंड) – कोलकाता नाइट रायडर्स – 2 कोटी 
उमरान मलिक- कोलकाता नाईट रायडर्स- 75 लाख 
सचिन बेबी- सनरायझर्स हैदराबाद- 30 लाख रुपये

25 November 2024 21:26 PM

IPL Auction 2025 Live: पंजाबने मुशीर खानला घेतलं विकत 

शमर जोसेफ- लखनौ सुपर जायंट्स- 75 लाख (RTM)
शिवम मावी- अनसोल्ड
नवदीप सैनी- अनसोल्ड
सलमान निझर- अनसोल्ड
अनिकेत वर्मा – सनरायझर्स हैदराबाद – 30 लाख 
राज बावा- मुंबई इंडियन्स- 30 लाख 
इमानजोत सिंग चहल – अनसोल्ड
मुशीर खान- पंजाब किंग्स- 30 लाख
कुलवंत खेजरोलिया- अनसोल्ड
सूर्यांश शेडगे- पंजाब किंग्स- 30 लाख 
दिवेश शर्मा- अनसोल्ड
नमन तिवारी- अनसोल्ड
प्रिन्स यादव- लखनौ सुपर जायंट्स- 30 लाख

25 November 2024 20:57 PM

IPL Auction 2025 Live: मलिंगाला सनरायझर्सने 1.2 कोटीत घेतलं विकत 

अविनाश सिंग - Unsold
संजय यादव- Unsold
इशान मलिंगा (श्रीलंका) – सनरायझर्स हैदराबाद – 1.2 कोटी रुपये
उमंग कुमार- Unsold
दिग्विजय देशमुख- Unsold
यश दाबस- Unsold

25 November 2024 20:54 PM

IPL Auction 2025 Live: हे खेळाडू विकले गेले नाहीत

विजय कुमार
रोस्टन चेस (वेस्ट इंडीज) – 
नॅथन स्मिथ (न्यूझीलंड) 
काइल जेमिसन (न्यूझीलंड)
ख्रिस जॉर्डन (न्यूझीलंड)
रिपल पटेल

25 November 2024 20:34 PM

IPL Auction 2025 Live:: वैभव सूर्यवंशी लिलावात सर्वात तरुण खेळाडू विकला गेला

आयपीएल लिलावात सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. वैभव 13 वर्षांचा असून तो भारताच्या अंडर-19 संघात खेळला आहे. राजस्थानने वैभवला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, पण शेवटी राजस्थानने बाजी मारली. वैभवला आता माजी भारतीय प्रशिक्षक आणि महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्याकडून क्रिकेट शिकण्याची संधी मिळणार आहे.

25 November 2024 20:15 PM

IPL Auction 2025 Live:: सरफराज खान राहिला अनसोल्ड

ब्रायन कर्स (1 कोटी SRH)
आरोन हार्डी (1.25 कोटी पंजाब)
सरफराज खान (अनसोल़्ड)

25 November 2024 20:13 PM

IPL Auction 2025 Live:: 23 वर्षांचा खेळाडू करोडपती झाला

दिल्ली प्रीमियर लीगचा शतकवीर प्रियांश आर्यसाठी पंजाब आणि आरसीबी यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. अवघ्या 23 वर्षांच्या खेळाडूसाठी कोट्यवधी रुपये मोजायला दोन्ही संघ तयार होते. अखेर पंजाबने त्याला 3 कोटी 80 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.

25 November 2024 19:44 PM

IPL Auction 2025 Live:: नव्या सेटमध्ये हे खेळाडू राहिले अनसोल्ड

ऋषी धवन 
हंगरगेकर
ऋषी धवन 
पथुम निसांका
स्टीव्ह स्मिथ 
सिकंदर रझा

25 November 2024 19:21 PM

IPL Auction 2025 Live:: MI मध्ये सँटनरवर सहभागी 

मुंबईने ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मिचेल सँटनरवर जुगार खेळला आहे. सँटनर हा सीएसके संघाचा भाग होता, परंतु मुंबईने त्याला 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

25 November 2024 19:04 PM

IPL Auction 2025 Live: SRH ने उनाडकटला खरेदी केलं

भारतीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला सनरायझर्स हैदराबादने त्याच्या मूळ किंमत 1 कोटींमध्ये विकत घेतलं. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवला कोणीही विकत घेतले नाही.

25 November 2024 18:47 PM

IPL Auction 2025 Live: इशांत शर्मा खेळणार गुजरातकडून 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: भारताचा महान वेगवान गोलंदाज इशांत शर्माला गुजरात टायटन्सने ७५ लाख रुपयांना विकत घेतले.

 

 

25 November 2024 18:42 PM

IPL Auction 2025 Live: गुजरात टायटन्सने साई किशोरवर आरटीएमचा वापर केला

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  गुजरात टायटन्स संघाने आर साई किशोरला 2 कोटी रुपयांमध्ये आरटीएम केले आहे. पंजाब किंग्जने त्याच्यासाठी 2 कोटींची बोली लावली होती. त्याची मूळ किंमत फक्त 75 लाख रुपये होती.

 

 

25 November 2024 18:38 PM

IPL Auction 2025 Live: विल जॅकला  MI घेतले तर उमरझाईला PBKS ने घेतले विकत 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  इंग्लंडचा स्फोटक फलंदाज विल जॅकला मुंबई इंडियन्सने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले. RCB ने जॅकसाठी RTM चा वापर केला नाही. अफगाणिस्तानचा अष्टपैलू अजमतुल्ला उमरझाईला पंजाब किंग्जने २.४० कोटी रुपयांना विकत घेतले.

25 November 2024 18:34 PM

IPL Auction 2025 Live: CSK ने दीपक हुडाला विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: लखनौ सुपर जायंट्सचा माजी खेळाडू आणि भारतीय संघाचा शतकवीर दीपक हुडा याला चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले. चेन्नईने दीपक हुडाला 1.70 कोटी रुपयांना खरेदी केले. लखनऊने त्यांच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही.

25 November 2024 18:29 PM

IPL Auction 2025 Live: टीम डेव्हिड 3 कोटींना विकला गेला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  ऑस्ट्रेलियन अष्टपैलू टीम डेव्हिडला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तो त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपयांसाठी उपलब्ध होता.

25 November 2024 18:27 PM

IPL Auction 2025 Live: मनीष पांडे 75 लाखांना विकला गेला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारताचा स्टार फलंदाज मनीष पांडेला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 75 लाख रुपयांना खरेदी केले आहे. मनीष पांडे या आधी आयपीएल २०२४ मध्ये केकेआरचा एक भाग होता.

25 November 2024 18:14 PM

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  नुकत्याच झालेल्या राउंडमध्ये हे खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत 

  • स्वास्तिक चिकारा-अनसोल्ड
  • अनुकूल रॉय-अनसोल्ड
  • हार्विक देसाई- अनसोल्ड
  •  मयंक डागर- अनसोल्ड
  • माधव कौशिक-अनसोल्ड
  • पुष्कराज मान- अनसोल्ड
  • अरावलिन अवनीश- अनसोल्ड
  • वंश बेदी- अनसोल्ड
  • साकिब हुसेन- अनसोल्ड
  • विद्वत कावरप्पा- अनसोल्ड
  • राजन कुमार- अनसोल्ड
  • प्रशांत सोळंकी- अनसोल्ड
  • जाटवेद सुब्रमण्यम- अनसोल्ड
25 November 2024 18:01 PM

IPL Auction 2025 Live: शेख रशीद झाला चेन्नईत सामील

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्ज संघाने शेख रशीदचा आपल्या संघात समावेश केला आहे. गेल्या सिजनमध्येही तो चेन्नई संघाचा भाग होता. चेन्नई सुपर किंग्जने त्याला 30 लाख रुपये दिले.

25 November 2024 17:53 PM

IPL Auction 2025 Live: हे खेळाडू राहिले अनसोल्ड

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पुष्कराज मान, माधव कौशिक आणि मयंक डागर यांना  कोणताही खरेदीदार मिळाला  नाही.

 

25 November 2024 17:52 PM

IPL Auction 2025 Live: शुभम दुबे

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: शुभम दुबेला राजस्थानने 80 लाखांना खरेदी केले. 

25 November 2024 17:51 PM

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: स्वस्तिक चित्रा विकला गेला नाही

25 November 2024 17:07 PM

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: कोणत्या संघाकडे आता किती पर्स शिल्लक आहेत?

RCB- 14.15 कोटी
CSK- 13.2 कोटी
GT - 11.9 कोटी
MI - 11.05 कोटी
PBKS - 10.9 कोटी
KKR - 8.55 कोटी
LSG - 6.85 कोटी
आरआर - 6.65 कोटी
SRH - 5.15 कोटी
DC - 3.80 कोटी

25 November 2024 17:01 PM

IPL Auction 2025 Live: शाई होप, आदिल रशीद आणि केशव महाराज राहिले अनसोल्ड

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: वेस्ट इंडिजचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज शाई होपला कोणीही विकत घेतले नाही. याशिवाय इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीदवर कोणीही बोली लावली नाही. दक्षिण आफ्रिकेचा महान फिरकी गोलंदाज केशव महाराजही विकला गेला नाही.

 

25 November 2024 16:58 PM

IPL Auction 2025 Live: अल्लाह गझनफरला मुंबई इंडियन्सने विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: अफगाणिस्तानच्या अल्लाह गझनफरला मुंबई इंडियन्सने 4.80 कोटी रुपयांना विकत घेतले. कोलकाताने 4.60 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, पण शेवटी मुंबईने बाजी मारली. 

 

 

25 November 2024 16:47 PM

IPL Auction 2025 Live: आकाश दीपला लखनौने तर फर्ग्युसनला विकत घेतले पंजाबने 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  आकाश दीपने लखनऊ सुपर जायंट्सने 8 कोटी रुपयांना खरेदी केले. ऑस्ट्रेलियाला गेलेल्या भारतीय कसोटी संघात आकाशचा समावेश आहे. अलीकडच्या काळात त्याने शानदार गोलंदाजी केली आहे. आकाश गेल्या वेळी आरसीबीचा सदस्य होता. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किमतीला 2 कोटी रुपयांना विकत घेतले.

 

 

25 November 2024 16:41 PM

 IPL Auction 2025 Live: भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरला घेतले मुंबई इंडियन्स

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहर या वर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईने त्याला 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले.  चेन्नई सुपर किंग्जनेही त्याच्यावर बोली लावली. परंतु मुंबई संघाने दीपक चहरला 9.25 कोटी रुपयांना विकत घेत चेन्नईचा पराभव केला.

 

25 November 2024 16:32 PM

IPL Auction 2025 Live: भुवनेश्वरला मिळाले 10.75 कोटी 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारताचा महान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात चुरशीची बोली लागली होती. दोघेही आक्रमकपणे बोली लावत होते. मुंबईने 10.25 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. लखनौने 10.50 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. आरसीबीने 10.75 कोटींची फक्त एकच बोली लावली आणि भुवनेश्वरला विकत घेतले. तो दुसऱ्या दिवसाचा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

 

 

25 November 2024 16:30 PM

IPL Auction 2025 Live: राजस्थानने नितीश राणाला विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  कोलकाता नाईट रायडर्सचा माजी फलंदाज नितीश राणा यांच्यासाठी अनेक संघांमध्ये चुरशीची लढत झाली. चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यासाठी पहिली बोली लावली. आरसीबीने त्याला स्पर्धा दिली.

25 November 2024 16:25 PM

IPL Auction 2025 Live: चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले तुषारला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  तुषार देशपांडेसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली आहे. अखेर राजस्थान रॉयल्सने तुषार देशपांडेला 6.5 कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमात तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता.

 

 

25 November 2024 16:22 PM

IPL Auction 2025 Live: आता 'या' खेळाडूंवर लागणार बोली 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  
 1. दीपक चाहर

2. जेराल्ड कोएत्जी

3. आकाश दीप

4. तुषार देशपांडे

5. लौकी फर्ग्यूसन

6. भुवनेश्वर कुमार

7. मुकेश कुमार

25 November 2024 16:17 PM

IPL Auction 2025 Live: 'या' खेळाडूंवर लागली आज पहिल्या सेटमध्ये बोली 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्यांदा कोणत्या खेळाडूंवर बोली लावली गेली ते बघा. 

  • जोस इंग्लिस
  • रायन रिकेल्टन 
  • नितीश राणा
  • कृणाल पंड्या 
  • डॅरिल मिशेल
  • मार्को यान्सन
  • सॅम कुरन 
  • वॉशिंग्टन सुंदर
  • शार्दुल ठाकूर 
  • फॉफ डु प्लेसिस
  • मयंक अग्रवाल
  • अजिंक्य रहाणे
  • रोव्हमन पॉवेल
  • पृथ्वी शॉ
25 November 2024 16:01 PM

IPL Auction 2025 Live:  कृणाल पांड्यासाठी 'रॉयल' टक्कर

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या यांच्यात चुरशीची लढत झाली. कृणालची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आरसीबीने त्याच्यासाठी सर्वप्रथम बोली लावली होती. यानंतर राजस्थानने आपले पॅडल उंचावले. त्याने 5.50 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. आरसीबीने राजस्थानला मागे टाकले आणि क्रुणालला 5.75 कोटी रुपयांना खरेदी केले. यावेळी मुंबई इंडियन्सने बोलीसुद्धा लावली नाही. 

 

 

25 November 2024 15:54 PM

मार्को यानसन पंजाब किंग्जचा भाग झाला

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पंजाब किंग्ज संघात दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सनचा समावेश करण्यात आला आहे. त्याला 7 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. यानसनन गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

 

25 November 2024 15:49 PM

सॅम करन परतला सीएसकेकडे 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला आहे. CSK ने त्याला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले. पंजाबने सॅम करनसाठी आरटीएम कार्ड वापरले नाही. 

25 November 2024 15:46 PM

गुजरातने वॉशिंग्टन सुंदरला विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: भारताचा फिरकी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सने विकत घेतले. गुजरात संघाने लखनौ सुपर जायंट्सला मागे टाकले आणि सुंदरला 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले.

25 November 2024 15:41 PM

अजिंक्य रहाणे, मयंक, शार्दुल ठाकुर आणि पृथ्वी शॉ न अनसोल्ड

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला कोणीही विकत घेतले नाही. मागच्या वेळी तो चेन्नई सुपर किंग्ज संघात होता. मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकुर आणि पृथ्वी शॉ या भारतीय खेळाडूंना कोणीही विकत घेतले नाही. गेल्या वेळी पृथ्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आणि मयंक सनरायझर्स हैदराबादच्या संघात होता. 

25 November 2024 15:34 PM

लिलाव होणार लवकरच सुरू 

आयपीएल मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस आहे. काही वेळात खेळाडूंवर बोली सुरू होईल. आजही अनेक स्टार खेळाडूंवर फ्रँचायझी नजर ठेवून आहेत. आरसीबीसारख्या संघाला अजूनही अनेक खेळाडूंची गरज आहे. अशा स्थितीत आजही लिलाव प्रक्रिया अत्यंत रोमांचक होणार आहे.

25 November 2024 15:19 PM

थोड्याच वेळात सुरु होणार मेगा लिलाव फ्रीमध्ये कुठे बघता येईल? 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: बीसीसीआय आयपीएल मेगा ऑक्शन 2025 च्या दुसऱ्या दिवसाचे काम सुरु झाले आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनचं लाईव्ह टेलिकास्ट हे दुपारी 3: 30 वाजल्यापासून टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल, तर जिओ सिनेमा अँप आणि वेबसाईटवर ऑक्शनचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येईल. 

25 November 2024 15:01 PM

थोड्याच वेळात सुरु होईल लिलावाचा दुसरा दिवस... 10 संघांना आज खरेदी करणार 132 खेळाडू 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  दुसऱ्या दिवशी फाफ डु प्लेसिस, ग्लेन फिलिप्स, सॅम कुरन, केन विल्यमसन, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लॉकी फर्ग्युसन, टीम डेव्हिड, विल जॅक, नवीन उल हक, स्टीव्ह स्मिथ, नितीश राणा आणि अजिंक्य रहाणे यांसारखे मोठे खेळाडू लिलावात उतरतील.

 

 

25 November 2024 14:27 PM

रिटेन न केल्याने लिलावात पृथ्वी शॉचे काय होणार?

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: 2018 मध्ये आपल्या आयपीएल कारकीर्दीला सुरुवात करणारा पृथ्वी शॉ पहिल्या सत्रापासून दिल्ली फ्रँचायझीसाठी खेळत आहे. पण यावेळी फ्रँचायझीने त्याला कायम ठेवलेले नाही. शॉचा अलीकडचा फॉर्म चांगला नाही आणि त्यामुळे कोणती फ्रेंचायझी त्याच्यावर बोली लावते हे पाहणे बाकी आहे.

25 November 2024 14:02 PM

मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसाची काय काय घडलं? बघा Video 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:   इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सिजनचा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे सुरू आहे. पहिल्या दिवशी (24 नोव्हेंबर) काय काय झालं याची खास झलक बघा. 

 

 

25 November 2024 13:28 PM

दीपक चहर पुन्हा पिवळी जर्सी घालणार?

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू दीपक चहरही आज लिलावात उतरणार असून चेन्नई या खेळाडूसाठी जुगार खेळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

25 November 2024 12:38 PM

कोणत्या संघाकडे किती पैसे उरले आहेत? 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: काही फ्रँचायझींनी पहिल्या दिवशी खुलेपणाने पैसे खर्च केले आहेत. तर, काही फ्रँचायझींनी जास्त बोली लावली नाही. आता याच फ्रँचायझी दुसऱ्या दिवशी कमाल  करू शकतात. चला कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत ते जाणून घ्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 30.65 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स -  26.10 कोटी रुपये
पंजाब किंग्स - 22.50 कोटी रुपये
गुजरात टायटन्स -  17.50 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स -  17.35 कोटी रुपये
चेन्नई सुपर किंग्स - 15.60 कोटी रुपये
लखनौ सुपर जायंट्स – 14.85 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स - 13.80 कोटी रुपये
कोलकाता नाइट रायडर्स - 10.05 कोटी
सनरायझर्स हैदराबाद – 5.15 कोटी रुपये

25 November 2024 12:04 PM

दुसऱ्या दिवशी 'या' मोठ्या खेळाडूंचे भवितव्य पणाला! 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  पहिल्या दिवशी ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला तर श्रेयस अय्यरलाही भरगोस पैसे मिळाले. यःशिवाय कोलकाताने व्यंकटेश अय्यरसाठी आपली तिजोरी उघडली. दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार अपेक्षित आहे. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमार, केन विल्यमसन, फाफ डू प्लेसिस, डॅरिल मिशेल, दीपक चहर, सॅम कुरन, मार्को जॅनसेन, कृणाल पांड्या या खेळाडूंवर लक्ष असेल.

 

 

25 November 2024 11:28 AM

मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी 'हे' खेळाडू ठरले सर्वात महागडे 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पहिल्या दिवशी पाच खेळाडूंवर सर्वात महागडी बोली लावण्यात आली. 

  • ऋषभ पंत - लखनौ - 27 कोटी - 2 कोटी (बेस किंमत) 
  • श्रेयस अय्यर - पंजाब - 26.75 कोटी - 2 कोटी (बेस किंमत) 
  • व्यंकटेश अय्यर- कोलकाता - 23.75 कोटी - 2 कोटी (बेस किंमत) 
  • अर्शदीप सिंग - पंजाब - 18 कोटी - 2 कोटी (बेस किंमत) 
  • युझवेंद्र चहल - पंजाब - 18 कोटी - 2 कोटी (बेस किंमत) 

 

25 November 2024 10:54 AM

लिलावाच्या पहिल्याच दिवशी आयपीएलच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  पहिल्याच दिवशी 3 खेळाडूंवर एवढा पैसा बरसला की आयपीएलच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत निघाले. हे तीन खेळाडू म्हणजे यष्टिरक्षक ऋषभ पंत, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर. पंतला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) २७ कोटींची बोली लावून खरेदी केले. अशा प्रकारे पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

 

25 November 2024 10:26 AM

दुसऱ्या दिवशी कोणते खेळाडू उतरणार मेगा लिलावाच्या रिंगणात? 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: दुसऱ्या दिवशी फाफ डु प्लेसिस, ग्लेन फिलिप्स, सॅम कुरन, केन विल्यमसन, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लॉकी फर्ग्युसन, टीम डेव्हिड, विल जॅक, नवीन उल हक, स्टीव्ह स्मिथ, नितीश यांसारखे मोठे खेळाडू. राणा आणि अजिंक्य रहाणे लिलावात उतरतील.

25 November 2024 09:56 AM

दुसऱ्या दिवशी 10 संघ 173 कोटी रुपयांना विकत घेणार 'इतके' खेळाडू 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सिजनचा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे सुरू आहे. पहिल्या दिवशी (24 नोव्हेंबर) सर्व 10 संघांनी एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करून 72 खेळाडूंना खरेदी केले. आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी (25 नोव्हेंबर) लिलाव होणार आहे. दुसऱ्या दिवशी 132 खेळाडूंची विक्री होणार आहे. या खरेदी करण्यासाठी, सर्व 10 संघांच्या पर्समध्ये एकूण 173.55 कोटी रुपये शिल्लक आहेत.

Read More