IPL 2023 KKR vs PBKS LIVE: आयपीएल 16 व्या (Indian Premier League 2023) मोसमातील 53 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. कोलकातामधील ईडन गार्डन मैदानावर (Eden Gardens) हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघासाठी हा अतितटीचा सामना असल्याने कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ 1 एप्रिल रोजी भिडले होते. तेव्हा कोलकाताचा डकवर्थ लुईस नियमानुसार 7 धावांनी विजय झाला होता. त्यामुळे आता पंजाब पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असेल.