Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे, तर पंजाब किंग्सच्या संघाचा फॉर्म हा थोडा डगमगलेला आहे. पंजाबचा संघ अजूनही आपली गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर ही 10 पॉइंट्स सोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाबचा संघ 4 पॉइंट्स सोबत नवव्या स्थानावर आहे. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआर आज पण आपला बेधडक खेळ खेळणार की, पंजाब किंग्स आज बाजी मारणार?