Kolkata Knhighr Riders vs Royal Challengers Bengaluru highlights in Marathi:आयपीएल 2024 मध्ये केकेआरचा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर आरसीबी अजून आपली लय सापडवण्यात असमर्थ ठरली आहे. केकआर ही पॉइंट्स टेबलमध्ये 8 पॉइंट्स सोबत तिसऱ्या स्थानावर आहे, तर आरसीबी फक्त 2 पॉइंट्स सोबत 10 व्या स्थानावर आहे. तर आज आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत रहायचं असेल तर आजचा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.
आयपीएलच्या 36 व्या सामन्यात केकेआरने, बंगळुरूला केवळ 1 धावाने पराभूत केलं आहे. मिचेल स्टार्कच्या शेवटच्या ओव्हरमध्ये, कर्ण शर्माने लगावलेले तीन षटकार बंगळुरूला विजयी रेखे पर्यंत पोहोचवु शकले नाही. पॉइंट्स टेबलमध्ये, या विजयाने केकेआर ही 10 पॉइंटस सोबत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर बंगळुरूचे प्लेऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची शक्यता आता फार कमी आहे.
15 ओव्हरनंतर आरसीबाचा स्कोर 174-6 असा आहे. आरसीबीच्या संघाच्या आणि फॅन्सच्या आशा आता दिनेश कार्तिकवर आहे. कार्तिक हा 5 धावांवर, तर प्रभूदेसाई हा 19 धावांवर खेळत आहे.
सुनिल नरेन यानेसुद्धा आपल्या 13 व्या ओव्हरमध्ये आरसीबाच्या दोन फलदाजांना तंबूत परत पाठवलं आहे. ग्रीन हा 6 धावांवर, तर लोमरोर हा 4 धावांवर बाद झाला आहे.
आंद्रे रसलच्या 12 व्या ओव्हरमध्ये बंगळुरूचे विल जॅक्स आणि पाटीदार ह्या दोन महत्वाच्या विकेट्स गेल्या आहेत. जॅक्स हा 55, तर पाटीदार हा 52 धावा बनवुन बाद झाला आहे.
11 व्या ओव्हरमध्ये रजत पाटीदारने 21 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. पण रसलच्या 12 व्या ओव्हरमध्ये लगेचच धडाकेबाज फलंदाजी करत असलेला फलंदाज विल जॅक्स हा आउट झाला आहे.
9 व्या ओव्हरमध्ये बंगळुरूचा धाकड ऑलराउंडर विल जॅक्स याने 29 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जॅक्सने आपल्या अर्धशतकीय इनिंगमध्ये 4 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबीचा स्कोर 122-2 असा आहे.
5 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर आहे 52-2. बंगळुरूकडून विल जॅक्स हा 18 धावांवर, तर रजत पाटीदार हा 3 धावांवर खेळत आहे. या स्थितीतून आरसीबाला 90 बॉलमध्ये 171 धावांची गरज आहे.
वरूण चक्रवर्तीने आपल्या इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बंगळुरूचा कॅप्टन फाफ डू प्लेसीला वेंकटेश अय्यरच्या एका उत्कृष्ट कॅचमुळे 7 धावावांर आउट केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर रजत पाटीदार हा फलंदाजीसाठी आला आहे.
हर्षित राणाने तिसऱ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीला 18 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेट नंतर विल जॅक्स हा फलंदाजीसाठी आला आहे.
20 ओव्हरमध्ये कोलकाताने आरसीबीसमोर 223 धावांचे आव्हान दिले आहे. केकेआरकडून कॅप्टन श्रेयस अय्यरने 50 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आहे, तर बाकी फलंदाजीत फिलीप सॉल्टने 48, रिंकू सिंग 26 आणि रसल याने 27 धावांचे योगदान देत संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले आहे. आरसीबीकडून गोलंदाजीत फारसे चांगले प्रदर्शन राहिले नाही कॅमेरन ग्रीन आणि यश दयाल यांनी प्रत्यकी 2, तर मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतलेली आहे.
आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, बंगळुरूचे फलंदाज 223 धावांचे आव्हान पार करणार कि नाही, कि केकेआर, बंगळुरूला आपल्या होमग्राउंडवर पराभूत करणार?
18 व्या ओव्हरमध्ये क्रिस ग्रीनच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर हा 50 धावांवर फाफ डू प्लेसीच्या उत्कृष्ट कॅचमुळे आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर रमनदीप सिंग हा फलंदाजीसाठी आला आहे.
17 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने 35 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. अय्यरने या इनिंगमध्ये एकूण 7 चौकार आणि 1 षटकार मारले आहेत
15 ओव्हरनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोर असा आहे. श्रेयस अय्यरने 37 धावांवर बॅटिंर करत टीमच्या फलंदाजीची एक बाजू सांभाळून ठेवली आहे. तर रसल हा 3 धावांवर आहे.
14 व्या ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्यूसनने रिंकू सिंगला 24 धावांवर केकेआरच्या तंबूत परत पाठवलं आहे. पाचव्या विकेटनंतर कोलकाताच्या आणखी एक धाकड खेळाडू आंद्रे रसल हा फलंदाजीसाठी आला आहे.
10 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोर 107-4 असा आहे. रिंकू सिंग आणि श्रेयस अय्यर हे दोघांवर आता केकेआरच्या फलंदाजीची धुरा अवंलबुन आहे. श्रेयस 18 धावांवर, तर रिंकू हा 7 धावांवर खेळत आहे.
9 व्या ओव्हरमध्ये क्रिस ग्रीनने वेंकटेश अय्यरला 16 धावांवर तंबूत परत पाठवलं आहे. चौथ्या विकेटनंतर रिंकू सिंग हा फलंदाजीसाठी आला आहे. केकेआरला या स्थितीतून एका चांगल्या भागीदारीची गरज आहे.
यश दयालने 6 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेत, केकेआरच्या फलंदाजीची कंबर मोडली आहे. रघुवंशी हा तिन धावा करून आउट झाला आहे. रघुवंशीच्या विकेटनंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर हा फलंदाजीसाठी आला आहे.
6 व्या ओव्हरमध्ये यश दयालने केकेआरचा धाकड फलंदाज सुनिल नरेनला 10 धावांवर बाद केलं. दुसऱ्या विकेटनंतर वेंंकटेश अय्यर हा फलंदाजीसाठी आला आहे.
पाच ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 63-1 असा आहे. नरेन आणि रघुवंशी फलंदाजीकरत आहेत. नरेन हा 10 धावांवर, तर रघुवंशी 3 धावांवर खेळत आहे.
5 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने केकेआरचा फलंदाज फिलिप सॉल्ट याला 48 धावांवर बाद केलं आहे. सॉल्टने या इनिंगमध्ये 7 चौकार आणि 3 षटकार लगावले आहे. पहिल्या विकेटनंतर अंगक्रिश रघुवंशी फलंदाजीसाठी आला आहे.
KKR vs RCB Toss update : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
आरसीबी प्लेइंग 11 :
फाफ डू प्लेसिस (C), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (W), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज
केकेआर प्लेइंग 11 :
फिलिप सॉल्ट (W), सुनील नारायण, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (C), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.