KKR vs SRH Live Score in Marathi : केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर एका हंगामानंतर आयपीएलमध्ये परतला असून गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआर सलामीचा सामना खेळेल. शनिवारी खेळल्या जात असलेल्या डबर हेडर सामन्यातील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ईडन गार्डनवर खेळवला जातोय. त्यामुळे आता या सामन्यात पॅट कमिन्स विरुद्ध मिशेल स्टार असा सामना देखील पहायला मिळणार आहे.