Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

India vs Pakistan : पाऊस काही थांबेना...एशिया कपचा भारत-पाकिस्तान सामना रद्द

IND vs PAK Live Score : पावसामुळे भारत पाकिस्तान सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सामना पूर्ण 50 ओव्हरचा होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

India vs Pakistan : पाऊस काही थांबेना...एशिया कपचा भारत-पाकिस्तान सामना रद्द
LIVE Blog

Ind vs PAK, Asia Cup 2023 Live Cricket Score and Updates: पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. शनिवारी कँडी येथील पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना पार पडले. एकीकडे फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझम (Babar Azam) तर दुसरीकडे टीम इंडियाची शान विराट कोहली (Virat Kohli). त्यामुळे आता या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

02 September 2023
02 September 2023 21:54 PM

पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना झाला रद्द

02 September 2023 21:12 PM

जर पावसामुळे ओव्हर कापण्यात आले तर पाकिस्तानला 45 षटकांत 254, 40 षटकांत 239, 30 षटकांत 203 आणि 20 षटकांत 155 धावांचे लक्ष्य मिळेल.

02 September 2023 20:50 PM

कँडी येथील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. चांगली बाब म्हणजे पाऊस थांबला असून जमीन कोरडे करण्याचे काम सुरू आहे. 9 वाजता पंच मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करतील. 

02 September 2023 19:47 PM

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून ईशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली तर टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या 87 धावा करत संकटमोचक ठरला. दुसरीकडे पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 4 विकेट घेतल्या. तर नसीम शाह आणि हॅरिस रौफने 3-3 विकेट घेतल्या. 

02 September 2023 19:17 PM

उपकर्णधार हार्दिक पांड्याने आज दमदार फलंदाजी केली. एकाबाजूने ईशान खेळत असताना पांड्याने मजबूत बॅकअप दिलं. मात्र, शाहीन शाह आफ्रिदीने पुन्हा एकदा अँगलच्या जोरावर हार्दिकला बाद केलं. त्यानंतर जड्डू देखील लगेच बाद झाला. हार्दिकने 87 धावा केल्या.

02 September 2023 18:51 PM

छोटा पॅकेट बडा धमाका! ईशान किशनने राखली टीम इंडियाची लाज.... पाकिस्तानविरुद्ध इशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली. हॅरिस रौफने इशानची विकेट घेतली.

02 September 2023 18:31 PM

टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने संयमी खेळी करत इशान किशनला मोलाची साथ दिली आहे. हार्दिकने देखील 62 ब़ॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.

02 September 2023 18:12 PM

IND 149/4 (30)

02 September 2023 18:07 PM

पाकिस्तानविरूद्ध इशान किशनची बॅट तळपली, ठोकली हाफ सेंच्युरी

02 September 2023 17:13 PM

Haris Rauf Bowled Shubman Gill : शाहीन आफ्रिदीच्या स्पीडपुढे शुभमन गिलचा टीकाव लागला नाही. गिलने 32 बॉलमध्ये फक्त 10 धावा केल्या. नसीम शाहच्या घातक गोलंदाजीसमोर शुभमनचा निकाल लागला नाही. त्यानंतर आता शाहीनने गिलचा विषय संपवला. त्यामुळे आता टीम इंडिया संकटात सापडल्याचं समोर आलंय.

02 September 2023 16:50 PM

IND vs PAK Rain Update : सामन्यात पावसाचं पुन्हा आमगन झालं आहे. आत्तापर्यंत टीम इंडियाने 11.2 ओव्हरमध्ये 51 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तीन फलंदाजांनी तंबू गाठला आहे. तर इशान किशन आणि शुभमन गिल मैदानात तळ ठोकून आहेत.

02 September 2023 16:31 PM

रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आता टीम इंडियाला तिसरा मोठा झटका बसला आहे. दुखापतीनंतर कमबॅक करणारा श्रेयस अय्यर 14 धावा करत बाद झाला.

02 September 2023 16:10 PM

Virat kohli wicket : शाहीद अफ्रिदीने भारताला दोन झटके दिले आहेत. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आता विराट कोहलीची विकेट देखील गेली आहे. विराट कोहली फक्त 4 धावा करत बाद झाला. 

02 September 2023 15:59 PM

Rohit Sharma bowled : टीम इंडियाला पहिला धक्का आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या बॉलवर रोहित क्लीन बोल्ड झाला. परफेक्ट इनस्विंग बॉलवर रोहितच्या दांड्या उडाल्या. 

02 September 2023 15:56 PM

पावसामुळे थांबलेला सामना आता पुन्हा सुरू झाला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलसह पाकिस्तानचे खेळाडू पुन्हा मैदानात...

02 September 2023 15:41 PM

IND vs PAK Rain Update : पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून भारताने पहिल्या 4.2 ओव्हरमध्ये 15 धावा केल्या आहेत. त्यामध्ये रोहित शर्माने 11 धावांचं योगदान दिलंय. तर 4 धावा एक्ट्राच्या स्वरूपात आल्या आहेत.

02 September 2023 14:33 PM

IND vs PAK Toss  Update : भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी नियमित वेळेत टॉस झाला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकला असून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

02 September 2023 14:16 PM

शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भारत पाकिस्तान सामना कोण जिंकणार याबद्दल भाष्य करताना नाणेफेकीचा उल्लेख केला आहे. जो संघ पहिल्यांदा फलंदाजी करेल तो सामना सहज जिंकेल असं शोएबचं म्हणणं आहे. 

"बाबर आझम आणि त्याचा संघ फारच प्रगल्भ आहे. त्यांनी यापूर्वीही भारताविरुद्ध दबावाखाली चांगला खेळ केला आहे. आज ते दबावामध्ये नसतील. जर पाकिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला तर मी हे सांगू शकतो की ते सामना सहज जिंकतील. जर भारताने टॉस जिंकला तर पाकिस्तानचं टेन्शन वाढेल. भारताने प्रथम फलंदाजी केली तर भारत सामना जिंकेल. कारण लाइट्स असतील तर चेंडू बॅटवर योग्य पद्धतीने येत नाही," असं शोएब म्हणाला.

02 September 2023 13:50 PM

पल्लेकेलमध्ये पावसाची शक्यता; मात्र टॉस वेळेत

भारत-पाकिस्तान सामना होत असलेल्या कॅण्डी शहरातील पेल्लेकेल येथे पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारी 5 ते रात्री 11 दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असली तरी सामना सुरु होण्यापूर्वी येथील वातावरण निरभ्र आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा टॉस वेळेत होणार आहे.

02 September 2023 11:06 AM

India vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...
India vs Pakistan Asia Cup 2023:  भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. येथे क्लिक करुन पाहा खास फोटो

02 September 2023 11:04 AM

Asia Cup: मोठी बातमी! विराट पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? सरावादरम्यान...
भारत आणि पाकिस्तानचा संघ आज श्रीलंकेतील कॅण्डी येथील मैदानामध्ये एकमेकांविरोधात खेळणार असला तरी या सामन्याआधी सरावादरम्यान घडलेल्या एका घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

02 September 2023 11:01 AM

Ind vs Pak: ...तर पाकिस्तान थेट आशिया चषकाच्या 'सुपर फोर'मध्ये! भारतासाठी वाईट बातमी

आज श्रीलंकेतही पाऊस पडणार का? कॅण्डीच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडणार की सामना खऱ्या पावसाने धुतला जाणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

02 September 2023 00:43 AM

पावसाचं सावट

Accu Weather च्या अहवालानुसार, शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अनेकांचा हिरमोड झालाय.

02 September 2023 00:41 AM

IND v PAK Playing XI : पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर असल्याचं पहायला मिळतंय.

बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.

02 September 2023 00:39 AM
02 September 2023 00:38 AM

IND vs PAK Live Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्यापूर्वी टीम इंडियाचा विराट कोहली पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आणि शादाब खानसोबत गप्पा मारताना दिसला, त्याचा Video व्हायरल होतोय.

Read More