Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live Score in Marathi: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारी सीएसके या आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. पॉइंट्स टेबलमध्ये 7 सामन्यात चेन्नई 8 पॉइंट्ससोबत चौथ्या क्रमांकावर आहे, तर के एल राहूलच्या कॅप्टन्सीखाली खेळणारी लखनऊ सुपर जाएंट्स ही 7 सामन्यात 4 मॅच जिंकून 8 पॉइंट्ससोबत पाचव्या क्रमांकावर आहे. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, लखनऊ आज चेन्नईच्या होमग्राउंडवर विजय मिळवू शकते की नाही, कारण या सिजमनध्ये आतापर्यंत आपल्या होमग्राउंडवर चेन्नई सुपर किंग्सने एकही सामन्यात पराभव पत्कारलेला नाहीये, अशातच आज कोणता संघ वरचढ ठरणार हे यावर साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.