Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Score in Marathi : वर्षानुवर्षे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या चेन्नई आणि मुंबईच्या संघात आज काटे की टक्कर होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात यंदाच्या आयपीएल मोसमाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठीअत्यंत खराब झाली. परंतू मागील दोन सामन्यात पुनरागमन करणाऱ्या मुंबईसमोर आता तगड्या चेन्नईचं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे ऋतुराजच्या नेतृत्वात आणि थाला धोनीच्या आशीर्वादाने चेन्नईने देखील तीन सामना पारड्यात टाकले आहेत. त्यामुळे आता 'साहेब vs वस्ताद' असा समाना यंदाही पहायला मिळेल.
चेन्नई सुपर किंग्सने, मुंबई इंडियन्सचा किल्ला मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर आपला विजय नोंदविला आहे. चेन्नईने मुंबईला 20 धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 166 च्या स्ट्राइक रेटने धडाकेबाज फलंदाजी करत 105 धावांची नाबाद खेळी खेळली. रोहित शर्माच्या या खेळीमध्ये एकूण 11 चौकार आणि 5 षटकार सामील होते. रोहित शर्माने या इनिंगसोबतच टी20 मध्ये 500 षटकार मारण्याचा विक्रमसुद्धा आपल्या नावावर केला आहे.
तर गोलंदाजीत पाथिरानाने 4 विकेट घेत, पूर्ण मुंबईच्या फलंदाजीला धाराशाही केले. मुस्ताफिजूर आणि देशपांडे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. या विजयासोबत सीएसके पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
चेन्नईच्या पाथिरानाने शेपर्डची विकेट घेत, सामन्यात आपली पकड बनवली आहे. पाथिरानाने या सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत.
17 व्या ओव्हरमध्ये टीम डेविड हा 13 धावा करून बाद झाला आहे. पाचव्या विकेटनंतर रोमारिओ शेपर्ड हा फलंदाजीसाठी आला आहे.
तुषार देशपांडेच्या 16 व्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या हा केवळ 1 धाव बनवुन बाद झाला आहे. चौथ्या विकेटनंतर मैदानावर टीम डेविड आला आहे.
15 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोर 132-3 असा आहे. रोहित शर्मा 77 धावांवर, तर हार्दिक पांड्या हा आताच मैदानावर आला असून 1 वर खेळत आहे.
14 व्या ओव्हरमध्ये परत एकदा पथिरानाने चेन्नईला मॅचमध्ये आणलं आहे. सेट दिसत असलेल्या तिलक वर्मा हा 31 धावा बनवुन आउट झाला आहे.
11 व्या ओव्हरनंतर मुंबईचा स्कोर 108-2 असा आहे. रोहित हा 66 धावांवर, तर तिलक हा 19 धावांवर खेळत आहे. रोहित-तिलक यांच्यात 38 धावांची भागीदारी झाली आहे.
मुंबईच्या रोहित शर्माने केवळ 30 चेंडूत आपलं अर्धशतक 7 चौके आणि 2 षटकारांच्या मदतीनं पूर्ण केलं आहे. रोहित आणि तिलक यांना आता चांगली भागीदारी करण्याची गरज आहे.
पथिरानाने एकाच ओव्हरमध्ये मुंबईच्या फलंदाजीला दोन धक्के दिले आहेत. इशानच्या विकेटनंतर लगेच सुर्याकुमार हा शून्यावर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर तिलक वर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे.
चेन्नईचा वेगवान गोलंदाज पथिरानाने 8 व्या ओव्हरमध्ये इशान किशनला 23 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर सुर्याकुमार यादव हा फलंदाजीला आला आहे.
6 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 63-0 आहे. रोहित शर्मा हा 42 वर, तर इशान किशन हा 21 धावांवर खेळत आहे. रोहित-इशानची जोडी सीएसकेसाठी घातक ठरत आहे, यामुळे चेन्नईला येथून एक विकेटची गरज आहे.
20 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 207 धावांचे लक्ष दिले आहे. चेन्नईकडून कॅप्टन ऋतुराज गायकवाडने 69 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आहे. शिवम दुबेने पण 66 धावांची ताबडतोब इनिंग खेळली आहे आणि शेवटी महेंद्रसिंग धोनीने शेवट्च्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 20 धावांची तूफानी फलंदाजी केली. तर मुंबईकडून गोलंदाजीत हार्दिक पांड्याने 2, तर कोएट्झे आणि श्रेयस गोपालने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, मुंबईच्या किल्ला मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई बाजी मारणार की. मुंबई चेन्नईला आपल्या होमग्राउंडवर धाराशाही करणार?
हार्दिक पांड्याच्या 16 व्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने 7 चौके आणि 2 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. यानंतर पांड्याने याच ओव्हरमध्ये पलटवार करत सीएसकेच्या कर्णधार ऋतुराजला 69 च्या स्कोरवर बाद केलं आहे.
15 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्स मजबूत स्थितीत दिसत आहे. दुबे आणि गायकवाड यांची भागीदारी 89 धावांची झाली असून मुंबईसाठी चिंतेचा विषय बनत आहे. 15 ओव्हरनंतर चेन्नईची स्थिती 149-2 अशी आहे.
13 व्या ओव्हरमध्ये सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने 33 बॉलमध्ये 3 चौके आणि 4 षटकारांच्या मदतीने आपलं ताबडतोब अर्धशतक पूर्ण केलं आहे.
10 व्या ओव्हरनंतर चेन्नईच्या शिवम दुबेने ताबडतोब फलंदाजी करत सीएसकेच्या इनिंगला मोमेंटम दिले आहे. गायकवाड हा 36 वर, तर दुबे हा 15 धावांवर नाबाद आहे. 10 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 80-2 असा आहे.
श्रेयस गोपालने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये रचिन रविंद्रला 21 धावांवर बाद केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर 8 व्या ओव्हरमध्ये शिवम दुबे हा फलंदाजीसाठी आला आहे.
5 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 38-1 असा आहे. चेन्नईला जरी सांभाळुन सुरूवात केली असली तरी कॅप्टन गायकवाड आणि रचिनची जोडी मैदानावर खेळत आहे. गायकवाड 24 वर तर रचीन हा 7 धावांवर खेळत आहे.
मुंबईचा वेगवान गोलंदाज कोएट्झने सीएसकेचा ओपनर अजिंक्य रहाणेला 5 धावांवर बाद केलं आहे. पहिल्या विकेटनंतर चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा फलंदाजीसाठी आला आहे.
MI vs CSK टॉस अपडेट - मुंबईचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
MI प्लेइंग 11 -
रोहित शर्मा, इशान किशन(W), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या(C), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल
CSK प्लेइंग 11 -
रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (C), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (W), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान
मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ एकूण 38 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी 21 वेळा मुंबईने विजय मिळवला असून चेन्नईने 17 वेळा सामने जिंकले आहेत. त्यामुळे या आकडेवारीमध्ये मुंबईचं पारडं जड दिसतंय. मात्र, यंदाच्या हंगामात चेन्नईची कामगिरी पाहता मुंबईसमोर तगडं आव्हान असणार आहे.
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन - हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल.
चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिचेल, शिवम दुबे, रचिन रवींद्र, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, मथीशा पाथिराना, मुस्ताफिझूर रहमान.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.