Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

PBKS vs CSK highlights, IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सचा पंजाब किंग्सवर दणदणीत विजय, पंजाबचा 28 धावांनी पराभव

PBKS vs CSK Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात आज धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोघं संघात सामना होणार आहे.

PBKS vs CSK highlights, IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सचा पंजाब किंग्सवर दणदणीत विजय, पंजाबचा  28 धावांनी पराभव
LIVE Blog

Punjab Kings vs Chennai Super Kings Match  Live Score in Marathi: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरूवात केली होती. पण यानंतर सीएसकेचा फॉर्म हरवलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबचा हा सिजन पण चढ-उताराचा राहिला आहे. आज दोघं संघ आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी लढणार आहेत, तर आज साऱ्या क्रिकेट फॅन्सचे लक्ष आजच्या लढतीवर असणार आहे. आज बघण्यायोग्य असणार की, कोणता संघ बाजी मारणार 

05 May 2024
05 May 2024 19:23 PM

चेन्नई सुपर किंग्सने, पंजाब किंग्सवर 28 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नईच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे चेन्नईने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व दाखवले आणि महत्वाचे 2 पॉइंट्सही आपल्या खिशात टाकून प्लेऑफसाठी एक पाऊल पूढे टाकले.

05 May 2024 18:27 PM

13 व्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या आहेत. सॅम करन आणि आशुतोष शर्मा या दोघांना जडेजाने तंबूत परत पाठवलं आहे. हर्षल पटेल आता फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

05 May 2024 18:14 PM

10 व्या ओव्हरमध्ये सिमरजित सिंग याने, जितेश शर्माला पहिल्याच बॉलवर आउट केलं आहे. आता फलंदाजीसाठी मैदानावर आशुतोष शर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे.

05 May 2024 18:08 PM

9 व्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजा याने प्रभसिमरन सिंग याला 30 धावांवर आउट केलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर पंजाबचा कॅप्टन सॅम करन हा फलंदाजीसाठी आला आहे.

05 May 2024 18:03 PM

5 ओव्हरनंतर पंजाब किंग्सचा स्कोर 31-2 असा आहे. शशांक सिंग हा 13 धावांवर खेळत असून, प्रभसिमरन सिंग हा 9 धावांवर खेळतोय. या दोघं फलंदाजांनी पंजाबच्या फलदाजीला सांभाळलं आहे.

05 May 2024 17:59 PM

चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजीत चांगली सुरूवात केली आहे. तुषार देशपांडे याने दुसऱ्याच ओव्हरमध्ये बेयरस्टो आणि रूसो या दोघांना तंबूत परत पाठवलं आहे.

05 May 2024 17:51 PM

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नई सुपर किंग्सने, पंजाब किंग्स समोर 168 धावांचे आव्हान दिलं आहे. चेन्नईकडून रविंद्र जडेजा याने 43, ऋतुराज गायकवाड याने 32, तर डॅरेल मिचेल याने 30 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत पंजाबकडून राहूल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहेत, तर अर्शदिपने 2 आणि सॅम करन याने 1 विकेट घेतली आहे.

05 May 2024 16:57 PM

16  व्या ओव्हरमध्ये राहूल चहरने, सीएसकेच्या मिचेल सॅटनरला 11 धावांवर आउट केलं आहे. सहाव्या विकेटनंतर शार्दुल ठाकूर हा फलंदाजीसाठी आला आहे.

05 May 2024 16:51 PM

15 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सचा स्कोर 117-5 असा आहे. रविंद्र जडेजा हा 18 धावांवर खेळतोय, तर मिचेल सॅटनर हा 9 धावांवर त्याचे साथ देत आहे.

05 May 2024 16:39 PM

13 व्या ओव्हरमध्ये सॅम करनने, मोईन अली याला 17 धावावंर तंबूत परत पाठवलं आहे. पाचव्या विकेटनंतर सीएसकेकडून या सिजनची पहिली मॅच खेळत आहे, आणि फलंदाजीसाठी आलाय.

05 May 2024 16:24 PM

10 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सचा स्कोर 79-4 असा आहे. मोईन अली हा 5 धावांवर, तर रविंद्र जडेजा हा धाव करून नाबाद आहे. चेन्नईला या स्थितीतून चांगल्या भागीदारीची गरज आहे.

05 May 2024 16:21 PM

9 व्या ओव्हरमध्ये हर्षल पटेल याने चांगली फलंदाजी करत असलेल्या डॅरेल मिचेलला 30 धावांवर तंबूत परत पाठवलं आहे. चौथ्या विकेटनंतर रविंद्र जडेजा हा फलंदाजीसाठी आला आहे.

05 May 2024 16:11 PM

राहूल चहरने 8 व्या ओव्हरमध्ये सीएसकेला एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के दिले आहेत. ऋतुराज गायकवाड हा 32 धावांवर आउट झाला, तर शिवम दुबे हा पहिल्याच बॉलवर शून्यावर आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर मोईन अली हा फलंदाजीसाठी आला आहे.

05 May 2024 16:05 PM

6 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सचा स्कोर 60-1 असा आहे. डॅरेल मिचल हा 25 धावांवर, तर ऋतुराज गायकवाड हा पण 25 धावांवर खेळत आहे.

05 May 2024 15:41 PM

अर्शदीप सिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये चेन्नईचा सलामीचा फलंदाज अजिंक्या रहाणे हा 9 धावा करून बाद झाला आहे. पहिल्या विकेटनंतर डॅरेल मिचेल हा फलंदाजीसाठी आलाय.

05 May 2024 15:14 PM

PBKS vs CSK toss update - पंजाब किंग्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

PBKS प्लेइंग 11 -
जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन (C), जितेश शर्मा (W), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

CSK प्लेइंग 11 - 
अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (C), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे

05 May 2024 15:09 PM

PBKS vs CSK head to head :

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि पंजाब हे दोघं संघ एकूण 29 वेळेस आमनेसामने आले आहेत, यातून चेन्नईने 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाबने सीएसकेला चांगले आव्हान देत 14 सामने जिंकलेले आहेत. आज पंजाब किंग्स सीएसकेच्या विजयांची बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर आज कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं आवश्यक होणार आहे. 

 

Read More