Punjab Kings vs Gujarat Titans highlights in Marathi:आयपीएल 2024 मध्ये पंजाब आणि गुजरात या दोघं संघांचे प्रदर्शन फारसे चांगले राहिलेले नाही. दोघं संघ पॉइंट्स टेबलमध्ये क्रमशः आठव्या आणि नवव्या स्थानावर आहे. गुजरातचे 8 पॉइंट्स आहेत तर, पंजाबचे आतापर्यंत 6 पॉइंट्स आहे. तर आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारून प्लेऑफच्या रेसमध्ये कायम असणार यावर साऱ्यांची नजर असणार आहे.
गुजरात टायटन्सने, पंजाब किंग्सला त्यांच्याच होमग्राउंडवर 3 विकेट्सने पराभूत केलंय आणि 2 महत्वपूर्ण पॉइंट्स जिंकले आहेत. या विजयाने गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आली आहे.
हर्षल पटेलने 16 व्या ओव्हरमध्ये उमरजईला 13 च्या स्कोरवर आउट केलं आहे. पाचव्या विकेटनंतर शाहरूख खान हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला आहे. गुदरातला येथून 24 बॉलमध्ये 38 रन जिंकण्यासाठी लागत आहेत.
पंजाबचा कॅप्टन सॅम करन याने 15 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा सेट फलंदाज साई सुदर्शन याला 31 धावांवर आउट केलं आहे. चौथ्या विकेटनंतर राहूल तेवतिया हा फलंदाजीसाठी आला आहे. 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरातचा स्कोर 101-4 असा आहे.
12 व्या ओव्हरमध्ये लिविंगस्टोन याने गुजरातला अजून एक झटका दिला आहे. डेविड मिलरला फक्त 4 धावांवर क्लिन बोल्ड करत लिविंगस्टोन याने आपली दुसरी विकेट घेतली आहे. तिसऱ्या विकेटनंतर उमरजई हा फलंदाजीसाठी आला आहे.
10 व्या ओव्हरमध्ये लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर गुजरातचा महत्वाटचा फलंदाज शुभमन गिल हा 35 धावांवर बाद झाला आहे, तर डेविड मिलर फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. 10 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 68-2 असा आहे.
5 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरात टायटन्सचा 36-1 स्कोर असा आहे. शुभमन गिल हा 18 धावांवर, तर साई सुदर्शन हा 5 वर फलंदाजी करत आहे. पंजाब किंग्सला येथून मॅचमध्ये परत येण्यासाठी विकेट्सची गरज आहे.
अर्शदिप सिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये गुजरातचा ओपनर वृद्धिमान साहा हा 13 धावांवर आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर साई सुदर्शन हा फलंदाजीसाठी आला आहे.
20 ओव्हरनंतर पंजाब किंग्सने गुजरातसमोर 143 धावांचे लक्ष दिले आहे. पंजाबने आज फलंदाजीत निराशाजनक प्रदर्शन केले आहे. फलंदाजीत प्रभसिमरन सिंगने 35 तर हरप्रीत ब्रारने 29 धावा केल्या आहेत. तर गुजरातकडून गोलंदाजीत साई सुदर्शन याने कमालीची गोलंदाजी करत 4 विकेट झटकले आहेत, त्याच्या साथीला नूर अहमदने 2, मोहित शर्मा याने 2 आणि राशिद खान याने 1 विकेट घेतली आहे.
आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, गुजरातचे फलंदाज या पंजाबने दिलेल्या लक्षाला किती ओव्हरमध्ये पूर्ण करतात, की पंजाबची गोलंदाजी पलटवार करत गुजरातच्या फलंदाजीला 143 धावांआधीच रोखणार?
साई सुदर्शन पंजाबच्या होमग्राउंडवर साऱ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवत आहे. 16 व्या ओव्हरमध्ये परत एकदा साई सुदर्शन याने पंजाबचा स्टार फलंदाज शशांक सिंग याला 8 धावांवर आउट केलं आहे.
15 ओव्हरनंतर पंजाब किंग्स वाईट परिस्थितीत आहे. पंजाबचा शशांक सिंग हा अजूनही मैदानावर खेळत आहे. तर 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर पंजाब किंग्सचा स्कोर 97-6 असा आहे.
साई किशोर आज कमालची गोलंदाजी करत आहे. 14 व्या ओव्हरमध्ये पंजाबचा इन फॉर्म बॅट्समन आशुतोष शर्मा हा बाद झाला आहे. , सहाव्या विकेटनंतर हरप्रीत सिंग ब्रार हा फलंदाजीसाठी आला आहे.
12 व्या ओव्हरमध्ये साई सुदर्शनने जितेश शर्माला 13 धावांवर बाद केलं आहे. पाचव्या विकेटनंतर आशुतोष शर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे. परत एकदा आशुतोष आणि शशांक सिंगवर पंजाबच्या फलंदाजीची जबाबदारी आली आहे.
10 ओव्हरनंतर पंजाब किंग्सचा स्कोर 74-3 असा आहे, तर नूर अहमदच्या 11 व्या ओव्हरमध्ये लिविंगस्टोन हा 6 धावांवर बाद झाला आहे. चौथ्या विकेटनंतर शशांक सिंग हा फलंदाजीसाठी आला आहे.
8 व्या ओव्हरमध्ये राशिद खानने पंजाबचा कॅप्टन सॅम करनला 20 धावांवर बाद केलं आहे. पंजाबला आता एका चांगल्या भागीदारीचा गरज आहे. तिसऱ्या विकेटनंतर लिविंगस्टोन हा फलंदाजीसाठी आला आहे.
नूर अहमदने 7 व्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सला दुसरा धक्का दिला आहे. राइली रूसो हा 9 धावा करून एलबीडब्लू आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर जितेस शर्मा हा बाद झाला आहे.
मोहित शर्माने 6 व्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करत असलेल्या प्रभसिमरन सिंगला 35 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर राइली रूसो हा फलंदाजीसाठी आला आहे.
5 ओव्हरनंतर पंजाब किंग्सला सॅम करन आणि प्रभसिमरन सिंगने चांगली सुरूवात दिली आहे. करन हा 14 धावांवर, तर प्रभसिमरन सिंग हा 29 धावांवर खेळत आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पंजाबचा स्कोर 45-0 असा आहे.
18 व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने केकेआरला परत मॅचमध्ये आणलं आहे. आरसीबीचा फलंदाज प्रभूदेसाईची विकेट घेत त्याला 24 धावांंवर परत पाठवलं आहे.
PBKS vs GT Toss Update : पंजाब किंग्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
PBKS प्लेइंग 11 :
सॅम करन (C), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (W), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
GT प्लेइंग 11 :
वृद्धिमान साहा (W), शुभमन गिल (C), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.