Punjab Kings vs Mumbai Indians Live Score in Marathi : मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. आत्तापर्यंत दोन्ही संघांचे सहा सामने दोन विजय आणि चार पराभवांसह समान गुण आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे.
मुंबईने दिलेल्या 193 धावांचा पाठलाग करताना पंजाबचे फलंदाज ढेपाळले. पंजाबने 49 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे मुंबई मोठा विजय मिळवेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांनी आक्रमक खेळी करत पंजाबला सामन्यात कमबॅक करून दिलं. आशुतोष शर्माने 28 बॉलमध्ये 61 धावा केल्या. त्यात त्याने 7 फोर अन् 2 सिक्स लगावले. तर शशांकने 25 बॉलमध्ये 41 धावा कुटल्या होत्या. मात्र, अखेरीस सामना हातात असताना पंजाबच्या हातात विकेट्स उरल्या नाहीत. त्यामुळे पंजाबला सामना केवळ 9 धावांनी गमवावा लागला.
सामन्यात मोठा ट्विस्ट... आशुतोष शर्माची विकेट... आशुतोष शर्माने 28 बॉलमध्ये 61 धावा केल्या. त्यात त्याने 7 फोर अन् 2 सिक्स लगावले.
77 धावांवर 6 विकेट्स असताना आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांनी आक्रमक खेळी करत पंजाबला सामन्यात कमबॅक करून दिलंय. मात्र, बुमराहने शशांकची विकेट काढली पण दुसऱ्या बाजूने आशुतोषने मोर्चा सांभाळला आहे. त्यामुळे आता पंजाबच्या आशा कायम आहेत.
पंजाबची फलंदाजी ठेपाळली. हरप्रीत सिंग भाटिया 13 धावा करून बाद झाला. त्या इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात स्थान मिळालं होतं.
पंजाबचा चौथा गडी देखील बाद झालाय. लियाम लिव्हिंगस्टोन 1 धाव करून बाद झालाय. जेराल्ड कोएत्झीने त्याला तंबूत पाठवलं. त्यामुळे आता पंजाबची स्थिती 14 वर 4 गडी बाद अशी झालीये.
193 धावांचं आव्हान पार करताना पंजाब किंग्जला पहिला धक्का बसला आहे. पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंग पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच ओव्हरमध्ये सॅम करन आणि रिली रोसो यांना तंबूत धाडलं.
मुंबई इंडियन्सने सात विकेट गमवात 192 धावा केल्यात. मुंबईने पंजाबसमो विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलंय. मुंबईतर्फे सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 78 धावा केल्या. तर रोहित शर्माने 36 आणि तिलक वर्माने 34 धावा केल्या. पंजाबतर्फे हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर सॅम करनने 2 विकेट घेतल्या.
मुंबई इंडियन्सला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार हार्दिक पांड्या 10 धावा करुन बाद झाला. मुंबई इंडियन्सने आता 4 विकेट गमावत 168 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला आहे. तुफान फटकेबाजी करणारा सूर्यकुमार यादव 78 धावांवर बाद झाला. सॅम करनने त्याची विकेट घेतली. मुंबईने आता तीन विकेटच्या मोबदल्यात 150 धावांचा टप्पा पार केलाय.
मुंबई इंडियन्सने पंधराव्या षटकानंतर 130 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सूर्यकुमार यादवने 67 धावा केल्यात. तर तिलक वर्मा 17 धावांवर खेळत आहे. मुंबई इंडियन्सने दोन विकेट गमावल्यात.
मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर रोहित शर्मा 36 धावांवर बाद झाला. सॅम करनच्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्रारने रोहित शर्माचा सुंदर झेल टिपला. सुर्यकुमार यादव आणि रोहित शर्माने दमदार फटकेबाजी करत मुंबईला धावांचा टप्पा गाठून दिला होता.
मुंबई इंडियन्सने 50 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ईशान किशन बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवने रोहित शर्माच्या मदतीने फटकेबाजी केली. सहाव्या षटकातच मुंबईला पन्नास धावांचा टप्पा गाठून दिला. यात रोहितने 25 तर सूर्यकुमारच्या 22 धावांचा वाटा होता.
MI vs PBKS LIve Update
आयपीएलच्या तेहतीसाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमने सामने आहेत. पंजाबने टॉस जिंकन पहिली गोलंदाजी घेतली. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि ईशान किशनने डावाची सुरुवात केली. रोहित आणि ईशानने पहिल्या दोन षटकातच आक्रमक फलंदाजी करत 18 धावा केल्या. पण तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ईशान 8 धावा करुन बाद झाला. रबाडाने त्याची विकेट घेतली.
पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शिखर धवनही या सामन्यात उपलब्ध नसेल. त्याचबरोबर आजच्या सामन्यात जॉनी बेअरस्टो देखील खेळताना दिसणार नाही. त्यांच्या जागी रिले रुसोला संधी मिळाली आहे.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (क), जितेश शर्मा (WK), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (WK), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
हेड टू हेड रेकॉर्ड
महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या मोसमात आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये दोनदा संघांनी लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला, तर एकदा सनरायझर्स हैदराबादने धावसंख्येचा बचाव करून सामना जिंकला. एसआरएचने केवळ 2 धावांनी हा विजय नोंदवला. या जमिनीवर दव चा फारसा परिणाम होत नाही. मात्र, मागील सामन्यातील विक्रम लक्षात घेता येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घ्यायचा आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.