Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live score : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीची आरसीबी आणि केएल राहुलची लखनऊ टीम आमने सामने येणार आहे. आयसीबीला मागील 3 सामन्यात फक्त 1 विजय मिळवता आलाय, तर लखनऊला 2 सामन्यात 1 पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे आता आजची लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे.
लखनऊच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजाच्या दांड्या गूल करत 28 धावांनी आरसीबीला पराभूत केलं आहे. मयंक यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगळूरूचे सारे फलंदाच फेल झाले
18 व्या ओव्हरमध्ये महिपाल लोमरोरच्या विकेट आरसीबीच्या जिंकायच्या आशापण संपल्या आहेत.
मॅचच्या 17 व्या ओव्हरमध्ये नवीन उल हकने आरसीबीच्या दिनेश कार्तिकला तंबूत परत पाठवलं आहे. तरी आरसीबी फॅन्सच्या आशा महिपाल लोमरोरवर टिकून आहेत.
15 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबी 104-6 या स्थितीत आहे. कार्तिक आणि लोमरोर हे दोघं सध्या आरसीबीकडून फलंदाजीचे नेतृत्व करत आहेत
मयंक यादवन परत एकदा विकेट घेत आरसीबीच्या जिंकण्याच्या आशांना धारशाही केलं आहे. रजत पाटीदारला मयंकने 29 धावांवर तंबूत पाठवले आहे.
13 व्या ओव्हरीत मार्कस स्टॉयनिसने अनुज रावतला 11 धावांवर बाद करत, लखनऊला मजबूत स्थितीत नेवून ठेवलं आहे.
10 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबी 63-4 अशा स्थितीत आहे. मैदानावर पाटीदार आणि रावत खेळत असून त्यांच्यावर आता बंगळूरूच्या फलंदाजीची जबाबदारी आहे.
8 व्या ओव्हरमध्ये लखनऊच्या गोलंदाज मयंक यादवने बंगळूरूचा धाकड ऑलराऊंडर कॅमेरन ग्रीन याला क्लिन बोल्ड केलं आहे. या विकेटमूळे आरसीबीची थोडी वाईट स्थिती झाली आहे.
6 व्या ओव्हरमध्ये आरसीबीला दोन मोठे धक्के बसले आहेत. फाफ डू प्लेसी आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघं महत्वाचे फलंदाज मयंक यादवच्या एकाच ओव्हरमध्ये परतले आहेत. 6 व्या ओव्हरनंतर बंगळूरूचा स्कोर 48-3 असा आहे.
5 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा फिरकी गोलंदाज सिद्धार्थ याला आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली याची विकेट मिळाली आहे. कोहली हा 22 धावा बनवून तंबूत परतला
20 ओव्हरच्या समाप्तीनंतर लखनऊ सुपर जाएंटसची फलंदाजी एका चांगल्या सुरूवातीनंतर डगमगली, क्विंटन डि कॉकच्या 81 आणि निकोलस पूरनच्या ताबडतोब 40 धावांची इनिंग खेळत लखनऊला 181 धावांपर्यंत पोहोचवलं आहे. बंगळूरूकडून गोलंदाजीत ग्लेन मॅक्सवेलने सर्वात जास्त 2, तर टॉप्ले, दयाल आणि सिराज प्रत्येकी एक-एक विकेट घेतली आहे.
दूसऱ्या इनिंगमध्ये खासकरून आरसीबीच्या धाकड फलंदाजीवर नजर असणार आहे, तर दुसरीकडे लखनऊची गोलंदाजीही चांगल्या फॉर्ममध्ये आहे, बघण्यायोग्य गोष्ट असणार की, लखनऊ आरसीबीच्या फलंदाजीला रोखू शकते की, आरसीबीची धाकड फलंदाजी लखनऊच्या गोलंदाजांना धाराशाही करणार?
18 व्या ओव्हरीत यश दयालने लखनऊच्या आयूष बदोनीला तंबूत परत पाठवलं आहे. याआधीच्या ओव्हरमध्ये डिकॉक हा 81 धावा बनवून बाद झाला आहे.
15 व्या ओव्हरनंतर लखनऊची स्थिती 131-3 अशी आहे. डिकॉकने एकाबाजूने फटकेबाजू सुरू ठेवली आहे, तर तिसऱ्या विकेटनंतर नूकताच निकोलस पूरन फलंदीजीसाठी मैदानात आला आहे.
आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने परत एकदा लखनऊला धक्का दिला आहे, आपल्या फिरकीत फसवत मॅक्सवेलने मार्कस स्टॉयनिसला 24 धावांवर तंबूत परत पाठवलं आहे.
लखनऊचा धाकड ओपनर क्विंटन डिकॉकने 37 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं, लखनऊला चांगली सुरूवात देऊन डिकॉक याने चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केलंय.
10 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर 84-2 आहे असा. डिकॉकने नाबाद 46 धावा करत एका बाजूने लखनऊची बाजू सांभाळून ठेवली आहे, तर मार्कस स्टॉनिस हा नुकताच मैदानावर फलंदाजीसाठी आला आहे.
9 व्या ओव्हरीत आरसीबीचा स्टार बॉलर मोहमद सिराजने देवदत्त पडिकलला मात्र 6 धावांवर चालतं केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर लखनऊची इनिंग सांभाळायला मैदानात मार्कस स्टॉयनिस आला आहे.
ग्लेन मॅक्सवेलच्या 6 व्या ओव्हरीत बंगळूरूला के एल राहूलच्या स्वरूपात एक मोठी विकेट मिळालेली आहे. मयंक डागरने एक सोपी कॅच पकडत राहूलला 20 रणां वर बाद केलं आहे.
5 ओव्हरनंतर राहूल-डिकॉकच्या जोडीने बंगळूरूला भक्कम सुरूवात दिली आहे. डि कॉक 31 वर खेळत असून राहूलनेसुद्धा 14 धावांचे योगदान या भागीदारीत दिले आहे. पाच ओव्हरनंतर लखनउचा स्कोर 46-2 असा आहे.
आरसीबीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
आरसीबी प्लेईंग 11 -
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), कॅमरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, राजत पटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), रीस टॉपले, मायंक दागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
एलएसजी प्लेईंग 11 -
क्विंटन डी कॉक (विकेटरक्षक), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पाडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पुरन, आयुष बदोनी, कृणाल पांडया, रवि बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव
आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसमोर तगड्या लखनऊ सुपर जाएंट्सचे आव्हान असणार आहे. हेड-टू-हेड मध्ये आरसीबी आणि एलएसजी यांच्यात एकूण 4 सामने खेळले गेले आहेत, त्यातून बंगळूरूने 3 तर लखनऊने केवळ 1 मॅच जिंकली आहे, तर आज बघण्ययोग्य स्थिती असणार की बंगळूरूच्या चिन्नास्वामी मैदानावर कोण बाजी मारणार?
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.