RR vs GT Live Score in Marathi : आयपीएलचा 24 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमध्ये खेळला गेला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. संजू सॅमसनच्या संघाने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने तीन विकेट्स राखून विजय मिळवला.
अखेरच्या 2 बॉलवर 4 धावांची गरज असताना आवेश खानच्या बॉलवर राहुल तेवतियाने फटका मारला अन् 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेत असताना राहुल बाद झाला. बटलरने शानदार फिल्डिंग केली. त्यानंतर आता एका बॉलवर 2 धावांची गरज होती. त्यावेळी स्टाईकवर असलेल्या राशिद खानने खणखणीत फोर मारला अन् गुजरातने सामना खिशात घातला.
गुजरातला अखेरच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज आहे. राहुल तेवतिया आणि राशिद खान मैदानात आहेत.
युझी चहलने गुजरातचा कॅप्टन शुभमन गिल याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं अन् गुजरातला अडचणीत टाकलं आहे. शुभमन गिल 44 बॉलमध्ये 72 धावा करून बाद झाला.
गुजरातला चौथा धक्का बसला आहे. आक्रमक खेळीसाठी पाठवलेला विजय शंकर चहलच्या फिरकीत अडकला अन् 10 बॉलमध्ये 16 धावा करत बाद झाला. युझी चहलने त्याची विकेट काढली.
वेड बाद झाल्यावर मैदानात आलेल्या अभिनव मनोहरला केवळ 1 धाव करता आली. कुलदीप सेनने त्याच्या त्रिफळा उडवला.
पावसामुळे थांबलेला सामना पुन्हा सुरू झाल्यावर पहिल्याच बॉलवर कुलदीप सेनने मॅथ्यू वेडला तंबूत धाडलं. त्याने केवळ 4 धावा केल्या.
पाऊस थांबला, गुजरातच्या डावाला पुन्हा सुरूवात, टार्गेट होतं तेच...
गुजरातने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट्सच्या बदल्यात 77 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता गुजरातला सामना जिंकायचा असेल तर 10 ओव्हरमध्ये 120 धावा कराव्या लागणार आहे.
सामना अखेरच्या मोडमध्ये आला असताना आता पावसाने मोठा घोळ घातला आहे. पावसामुळे सामना थांबवावा लागला आहे.
कुलदीप सेनने गुजरातला पहिला धक्का दिला. कुलदीपने पहिल्याच षटकात साई सुदर्शनला एलबीडब्ल्यू आऊट केलं. सुदर्शन 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. साईने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मॅथ्यू वेड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
राजस्थान रॉयल्सची इनिंग
पावसामुळे सामना सुरू होण्यासाठी उशिर झाला. मात्र, राजस्थानने जलद सुरूवात केली. सलामीवीर जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक सुरूवात करून दिली. मात्र, उमेश यादवच्या एका बॉलवर मोठा शॉट मारण्याच्या नादात जयस्वाल बाद झाला. त्यानंतर लगेच बटलरने देखील विकेट गमावली. त्यामुळे मैदानात आलेल्या रियान पराग आणि संजू सॅमसनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. दोघांनी हळूवार सुरूवात केली अन् नजर जमवली. राशिदच्या तीन ओव्हर संपल्यानंतर दोघांनी आक्रमक हल्लाबोल सुरू केला. रियान आणि संजू या दोघांनी अर्धशतक ठोकलं. गुजरातकडून राशिदने 4 ओव्हरमध्ये केवळ 18 धावा दिल्या अन् 1 विकेट घेतली. तर रियान परागने 48 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 38 बॉलमध्ये 68 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला 196 धावांचा डोंगर उभारता आला आहे. गुजरातला विजयासाठी 197 धावांची गरज आहे.
रियान परागनंतर कॅप्टन संजू सॅमसन याने देखील अर्धशतक ठोकलं आहे. संजूने 31 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. संजूच्या या कामगिरीमुळे राजस्थानने 160 चा टप्पा पार केलाय.
राजस्थानचा रियान पराग यंदा वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसतोय. रियान परागने खणखणीत अर्धशतक ठोकलंय. त्याने 34 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे आता गुजरातचा संघ टेन्शनमध्ये आलाय.
जॉस बटलर याची विकेट घेण्यासाठी शुभमन गिलने स्मार्ट खेळी केली. राशिद खान याला 6 व्या ओव्हरासाठी बोलवं अन् राशिदने बटलरला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं.
राजस्थानला पहिला धक्का बसला आहे. स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल 24 धावा करत बाद झाला. उमेश यादवच्या बॉलवर फोर मारण्याच्या नादात विकेट गेली. मॅथ्यू वेडने भन्नाट कॅच घेतला.
जयस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर यांनी राजस्थानच्या आक्रमक डावाला सुरूवात केली आहे. पहिल्या तीन ओव्हरमध्ये राजस्थानने 22 धावा केल्या आहेत.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (C), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (C), साई सुधारसन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.
जयपूरमध्ये पाऊस थांबला असून जमिनीवरून कव्हर काढण्यात आले आहेत. पहिला चेंडू 7:40 वाजता टाकला जाईल.
पावसामुळे राजस्थानविरूद्ध गुजरात मधील होणाऱ्या सामन्याचा टॉसला उशीर झाला आहे.
दोन्ही संघांची आकडेवारी पाहता गुजरातच्या संघाचे पारडे जड दिसत आहे. गुजरातने राजस्थानविरुद्ध चार विजय मिळवले आहेत. त्याचवेळी, राजस्थानचा गुजरातकडून एका सामन्यात पराभव झाला आहे. गुजरात आणि राजस्थान संघाचा आतापर्यंत पाच वेळा आमनासामना झाला. तर आयपीएलच्या मागील सामन्यात गुजरात आणि राजस्थान संघांमध्ये दोनवेळा लढत झाली होती. ज्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे.
राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्जर, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, बीआर शरथ (यष्टीरक्षक), विजय शंकर, दर्शन नळकांडे, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि नूर अहमद.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.