Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Score in Marathi: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघांची लढत प्रत्येक वेळी फार रंगतदार होते, तर या वर्षी जेव्हा हे दोघं संघ आमनेसामने भिडले होते, तेव्हा राजस्थान रॉयल्सने सहा विकेट्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्या होमग्राउंडवर पराभूत केले होते. तर आजच्या सामन्यात बघण्यायोग्य गोष्ट असणार की, मुंबई इंडियन्स, राजस्थानला त्यांच्याच घरात हरवुन आपल्या मागील पराभवाची परतफेड पूर्ण करणार का? पॉइंट्स टेबलमध्ये जर नजर टाकली तर राजस्थान 12 पॉइंट्सोबत पहिल्या क्रमांकावर आहे, तर मुंबई ही 6 पॉइंट्ससोबत सातव्या क्रमांकावर आहे.