Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Score in Marathi: लखनऊचे होमग्राउंड असलेल्या अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत, त्यातून लखनऊने 2 सामने आपल्या खिशात टाकले आहेत, तर एका सामन्यात पराभवाला सामोरे गेले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स ही 8 गुणांसोबत तिसऱ्या स्थानावर आहे, तर लखनऊ ही 6 गुणांसोबत पाचव्या स्थानावर आहे. तर आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे?