Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2023 RCB vs GT: शुभमन गिलने केली 'मुंबई इंडियन्स'ची चांदी; MI प्लेऑफमध्ये... किंग कोहलीचं शतक व्यर्थ!

IPL 2023 RCB vs GT LIVE: आजचा सामना बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर, रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) यांच्यात खेळला गेला.

IPL 2023 RCB vs GT: शुभमन गिलने केली 'मुंबई इंडियन्स'ची चांदी; MI प्लेऑफमध्ये... किंग कोहलीचं शतक व्यर्थ!
LIVE Blog

IPL 2023 RCB vs GT LIVE: आयपीएल 2023 मधील प्लेऑफसाठी अखेर मुंबई इंडियन्सने क्वालिफाय केलं आहे. आज खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) यांच्यातील सामन्यात प्लेऑफ (IPL 2023 Playoffs) गाठणारा चौथा संघ कोणता? यावर शिक्कामोर्तब होणार झालं.

22 May 2023
22 May 2023 00:20 AM

मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये...

शुभमन गिल अखेरच्या बॉलवर सिक्स खेचत गुजरात टायटन्सला विजय मिळला आहे. या सामन्यातील विजयासह मुंबईने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने देखील शतक खेचलं. मात्र, शुभमनचं शतक भारी ठरल्याचं दिसून आलं आहे.

22 May 2023 00:04 AM

सामना रोमांचक स्थितीत... अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातला 8 धावांची गरज

22 May 2023 00:00 AM

गुजरात टायटन्सला 12 चेंडूत 19 धावा हव्या आहेत.

GT 180/4 (18.1)

22 May 2023 23:42 PM

गुजरात टायटन्सला विजयासाठी 27 चेंडूत 48 धावा हव्या आहेत.

GT 150/3 (15.3)  CRR: 9.68  REQ: 10.67

22 May 2023 23:18 PM

गुजरात टायटन्सला विजयासाठी 55 चेंडूत 97 धावा हव्या आहेत. 

GT 102/1 (11) 

CRR: 9.27  REQ: 10.67

22 May 2023 22:44 PM

गुजरातला पहिला धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजने काढली वृद्धीमान साहाची विकेट काढत पहिला धक्का दिलाय.

22 May 2023 22:14 PM

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा केल्या आहेत. तर आता गुजरातसमोर 198 धावांचं टार्गेट असणार आहे. विराट कोहलीने या सामन्यात झुंजार खेळी करत शतक झळकावलं. 

RCB 197/5 (20)

22 May 2023 22:05 PM

Virat kohli Century: विराट कोहलीने झुंजावती शतक ठोकलं आहे. एकीकडे विकेट्स पडत असताना आरसीबीसाठी तो एकटा नडताना दिसतोय. फक्त 60 बॉलमध्ये विराट कोहलीने शतक साजरं केलंय.

22 May 2023 21:55 PM

शेवटच्या तीन ओव्हर बाकी असून किंग कोहली अजूनही 77 धावा करत क्रिझवर आहे.

RCB 155/5 (17)

22 May 2023 21:43 PM

महत्त्वाच्या सामन्यात दिनेश कार्तिक पुन्हा फेल झालाय. विराट एकाकी झुंज देत असताना डीके गोल्डन डकवर बाद झाला.

22 May 2023 21:21 PM

सुरूवात चांगली झाल्यानंतर आरसीबीला तीन धक्के बसले आहेत. 11 ओव्हरपर्यंत आरसीबीने 104 धावा केल्यात. 

RCB 104/3 (11)  CRR: 9.45

 

 

22 May 2023 21:08 PM

राशिद खानने दिला बंगळुरू दुसरा झटका आहे, मॅक्सवेल फक्त 11 धावा करत स्वस्तात परतला आहे.

 

22 May 2023 21:03 PM

आरसीबीला पहिला धक्का बसला असून फॅफ डुप्लेसिस 19 बॉलमध्ये 28 धावा करत बाद झालाय. मॅक्सवेल आता विराटची साथ देण्यासाठी आला आहे.

22 May 2023 20:56 PM

विराट आणि डुप्लेसिसकडून चांगली सुरूवात झाली आहे. पहिल्या 6 ओव्हरमध्ये आयसीबीने 62 धावा केल्या आहे. 
RCB 62/0 (6) 

22 May 2023 20:26 PM

सामन्याला सुरूवात... विराट आणि डुप्लेसिस मैदानावर

22 May 2023 20:02 PM
22 May 2023 20:00 PM

पाहा दोन्ही संघाची Playing XI

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन)

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (WC), हार्दिक पांड्या (C), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन)

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (WC), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशक

22 May 2023 19:50 PM

IPL 2023 RCB vs GT Toss Update:

गुजरातने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

22 May 2023 19:40 PM

Toss Update

टॉस 19:45 म्हणजेच पावणेआठ वाजता आणि सामना 20:00 म्हणजे आठ वाजता सुरू होईल.

22 May 2023 19:28 PM

पाऊस असाच सुरू राहिला तर अखेरीस पाच पाच ओव्हरचा खेळ होण्याची शक्यता आहे. ओव्हर्स कट ऑफची वेळ 10:56 PM नंतर सुरू होईल.

22 May 2023 19:16 PM

IPL 2023 RCB vs GT Live : मैदानावरील कव्हर्स काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता सामना लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

22 May 2023 19:12 PM

Toss delayed 

प्लेऑफसाठी महत्त्वाच्या सामन्यात ओल्या आउटफिल्डमुळे टॉसला उशीर झालाय. 

Read More