Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

Australia vs South Africa Live: ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, स्मिथ 30 धावांवर बाद

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर दुसरा अंतिम फेरीचा संघही आज निश्चित होणार आहे.

Australia vs South Africa Live: ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, स्मिथ 30 धावांवर बाद
LIVE Blog

Australia vs South Africa Live: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर दुसरा अंतिम फेरीचा संघही आज निश्चित होणार आहे.

16 November 2023
16 November 2023 20:31 PM

विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियालाा पाचवा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 201 धावांची नाबाद खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल केवळ 1 धाव करुन बाद झाला. शम्सीने त्याला क्लिन बोल्ड केलं

16 November 2023 20:19 PM

Australia vs South Africa

विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला आहे. लाबूशेन 18 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 133 धावांवर चौथा विकेट गमावलाय.

16 November 2023 19:49 PM

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला असून सलामीवीर ट्रेविस हेड 62 धावा करून बाद झाला आहे. त्यामुळे आता साऊथ अफ्रिका कमबॅक करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

16 November 2023 19:16 PM

Australia vs South Africa

ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन देणारा डेव्हिड वॉर्नर 29 धावांवर बाद झाला. मारक्रमने वॉर्नरला क्लिन बोल्ड केलं. 

16 November 2023 19:11 PM

Australia vs South Africa

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला जातोय. दक्षिण आफ्रिकेने पहिली फलंदाजी करत 212 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलंय. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केलीय. ट्रॅविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीच्या जोडीने पहिल्या पाच षटकात पन्नास धावांचा टप्पा केलाय. 

16 November 2023 18:23 PM

प्रथम फलंदाजी करणाऱ्या साऊथ अफ्रिकेचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी घाम फोडला. सुरूवातीला चार महत्त्वाचे विकेट्स घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यात आघाडी मिळवली होती. मात्र, डेव्हिड मिलर वादळात पाय रोवून उभा राहिला अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार शतक केलं. एकीकडे विकेट्स जात असताना मिलर कांगारूंसाठी किलर ठरला. त्याने 116 बॉलमध्ये 101 धावांची खेळी केली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचं आव्हान असणार आहे.

16 November 2023 18:04 PM

डेव्हिड मिलरने महत्त्वाच्या सेमीफायनल सामन्यात झुंजार शतक ठोकलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो एकटा नडला अन् साऊथ अफ्रिकेला 200 पार पोहोचवलंय. मात्र, पुढच्याच बॉलवर तो बाद झाला. 116 बॉलमध्ये त्याने 101 धावा केल्या.

16 November 2023 17:57 PM

 साऊथ अफ्रिकेला आठवा धक्का बसला असून केशव महाराज 4 धावा करून बाद झाला. आता डेव्हिड मिलरच्या शतकावर सर्वांचं लक्ष आहे.

16 November 2023 17:27 PM

साऊथ अफ्रिकेने 40 ओव्हरमध्ये 156 धावा केल्या असून डेव्हिड मिलरच्या बॅटिंगमधून फायरिंग सुरू झालीये.

16 November 2023 16:59 PM

साऊथ अफ्रिकेला सहावा धक्का बसला आहे. क्लासेन आणि मिलरच्या भागेदारीनंतर आता मार्को जानसेन देखील बाद झालाय. त्यामुळे डेव्हिड मिलर एकटा मैदानात पाय रोवून उभा आहे.

16 November 2023 16:26 PM

पहिल्या 4 विकेट्स लवकर गेल्यानंतर आता डेव्हिड मिलर अन् हेनरिक क्लासेन यांनी साऊथ अफ्रिकेचा डाव सावरला आहे. 23 ओव्हरनंतर साऊथ अफ्रिका 4 गड्यांच्या बदल्यात 71 धावांवर पोहोचली आहे.

16 November 2023 15:04 PM

टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, अँडन मार्करम आणि रासी वान डेर डुसेन झटपट बाद झाले आहेत. त्यामुळे आता साऊथ अफ्रिकेची दुसऱ्या सेमीफायनलमध्ये परिस्थिीती अधिकच वाईट झाल्याचं पहायला मिळतंय.

16 November 2023 13:58 PM

South Africa vs Australia Semifinal Live Score Updates: ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग-11

ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

16 November 2023 13:48 PM

South Africa vs Australia Semifinal Live Score Updates: डी कॉकने आतापर्यंत 4 शतके झळकावली आहेत

दक्षिण आफ्रिकेचा स्टार ओपनर फलंदाज क्विंटन डी कॉक या स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने आपल्या बॅटने 4 शतकं झळकावली आहेत. ही त्याची शेवटची टूर्नामेंट आहे, ज्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. 

16 November 2023 13:41 PM

South Africa vs Australia Semifinal Live Score Updates: सामन्यात पावसाची शक्यता

ईडन गार्डनवर होणाऱ्या या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. हा सामना कोलकातामध्ये आहे. पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही तर त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच हा सामना 17 नोव्हेंबरला होणार आहे.

16 November 2023 13:22 PM

South Africa vs Australia Semifinal Live Score Updates: दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषक संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॉन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी वान डेर डुसेन, लिजाद विलियम्स.

16 November 2023 12:36 PM

South Africa vs Australia Semifinal Live Score Updates: दोन्ही टीम्सचा हेड टू हेड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 109 वनडे सामने खेळले गेलेत. यामध्ये आफ्रिकेने 55 वेळा विजय मिळवला आहे तर ऑस्ट्रेलियाने 50 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 45.87 आणि दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 50.45 आहे.

Read More