Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

SRH vs LSG Live score : हैदराबादचा आयपीएल इतिहासातील दमदार विजय, लखनऊवर 10 विकेट्सने मात

IPL 2024, SRH vs LSG Live score : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनऊ आणि हैदराबादला आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

SRH vs LSG Live score : हैदराबादचा आयपीएल इतिहासातील दमदार विजय, लखनऊवर 10 विकेट्सने मात
LIVE Blog

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Score in Marathi : यंदाच्या आयपीएलचा 57 व्या सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मागील सामने गमावल्यानंतर दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचं आहे. तर प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे.

 

08 May 2024
08 May 2024 22:27 PM

आयपीएल इतिहासात प्रथम हैदराबादने लखनऊचा पराभव केला आहे. त्याचबरोबर हैदराबादच्या आयपीएल इतिहासातील हा दुसरा मोठा विजय आहे. या विजयामुळे आता हैदराबादचा संघ पाईंट्स टेबलच्या तिसऱ्या स्थानी झेप घेतलीये.

08 May 2024 22:23 PM

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत चार गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 9.4 षटकांत 10 गडी राखून लक्ष्य गाठलं. हैदराबादचे सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजांची धु धु धुलाई केली. अभिषेक शर्माने 28 बॉलमध्ये 75 धावा केल्या. त्यात 8 फोर अन् 6 सिक्स मारले. तर ट्रेविस हेडने 30 बॉलमध्ये 8 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने 89 धावांची खेळी केली.

08 May 2024 21:34 PM

लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत चार गडी गमावून 165 धावा केल्या. एकवेळ लखनऊने १२व्या षटकात ६६ धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर आयुष बडोनी आणि निकोलस पुरन यांनी 52 चेंडूत 99 धावांची नाबाद भागीदारी केली. बडोनीने 30 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या.

08 May 2024 20:33 PM

बर्थडे बॉय पॅट कमिन्सच्या एका भन्नाट थ्रो मुळे हैदराबादला मोठा गडी बाद करता आला. ऑलराऊंडर कृणाल पांड्या 24 धावा करत बाद झाला.

08 May 2024 20:24 PM

लखनऊचा तिसरा धक्का बसला आहे. कॅप्टन केएल राहुल 33 बॉलमध्ये 29 धावा करून तंबूत परतला. लखनऊने 10 ओव्हरमध्ये केवळ 57 धावा केल्या आहेत.

08 May 2024 19:55 PM

आयपीएलच्या 57 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने आहेत. लखनऊला दुसरा मोठा धक्का बसला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्कस स्टॉयनिस अवघ्या तीन धावा करुन बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. भूवनेश्वरने अवघ्या 5 धावात दोन विकेट घेतल्यात. 

08 May 2024 19:45 PM

आयपीएलच्या 57 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने आहेत. लखनऊने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण डावाच्या तिसऱ्याच षटकात लखनऊला पहिला धक्का बसला. सलामीला आलेला क्वांटन दी कॉक अवघ्या 2 धावांवर बाद झाला. भूवनेश्वर कुमारने त्याची विकेट घेतली.

08 May 2024 19:09 PM

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (C), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौथम, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक

08 May 2024 19:02 PM

टॉस अपडेट 

आयपीएलचा 57 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

08 May 2024 19:01 PM

पीच रिपोर्ट 

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. हैदराबादच्या या स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण 75 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 34 सामने जिंकले आहेत, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 41 सामने जिंकले आहेत.

Read More