Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

SRH vs MI Live Score, IPL 2024 : मुंबई लढली पण हारली, पांड्याच्या कॅप्टन्सीत पलटणचा सलग दुसरा पराभव

SRH vs MI Live score IPL 2024 : राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलची 8 वी लढत होणार आहे. त्यामुळे आता हार्दिक पांड्यासमोर पॅट कमिन्सचं आव्हान असेल.

SRH vs MI Live Score, IPL 2024 : मुंबई लढली पण हारली, पांड्याच्या कॅप्टन्सीत पलटणचा सलग दुसरा पराभव
LIVE Blog

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live Score in Marathi : पहिली मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs MI) यांच्यात राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium Hyderabad) जोरदार लढत होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असल्याने आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आकड्यांची गणित जुळवलं तर मुंबईचा संघ नेहमी भारी राहिला आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये नेहमी होम टीमने बाजी मारल्याने आता हार्दिक पांड्यासमोर (Hardik Pandya) नवं आव्हान उभं राहिलं आहे. 

27 March 2024
27 March 2024 23:32 PM

14 ओव्हरमध्ये मुंबईने 180 चा आकडा पार केला होता. त्यानंतर मुंबईच्या आशा जिवंत झाल्या होत्या. अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 54 धावांची गरज होती. टीम डेव्हिडने मुंबईला पुन्हा कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला फिनिशिंग करता आली नाही अन् मुंबईने सामना गमावला.

27 March 2024 22:42 PM

हैदराबादने दिलेल्या आव्हानासमोर मुंबईने चिवट झुंज दिली आहे. पलटणला विजयासाठी 44 बॉलमध्ये 110 धावांची गरज आहे. कॅप्टन हार्दिक पांड्या मैदानात 17 धावांवर खेळतोय.

27 March 2024 22:35 PM

मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला आहे. नमन धीर 14 बॉलमध्ये 30 धावा करून बाद झाला.

27 March 2024 22:15 PM

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठं आव्हान समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सनेही चोख उत्तर दिलंय. अवघ्या 7.3 षटकात मुंबईने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला आहे. 

27 March 2024 21:59 PM

मुंबई इंडियन्सला सलग दुसरा धक्का बसला आहे. आक्रमक फलंदाजी करणारा रोहित शर्मा 26 धावा करन बाद झाला. रोहितने 12 चेंडूत  26 धावा केल्या. यात त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने त्याचा झेल टिपला.

27 March 2024 21:51 PM

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठं आव्हान समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सनेही आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि ईशान किशनने तुफान फटकेबाजी करत अवघ्या तीन षटकात 50 धावा केल्या. पण ईशान किशन 34 धावा करुन बाद झाला. सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर 277 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 

27 March 2024 21:39 PM

आयपीएलचं सर्वात मोठं आव्हान पार करण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात आलाय. मुंबईला आता विजयासाठी 20 ओव्हरमध्ये तब्बल 278 धावा करायच्या आहेत. रोहित शर्मा आणि इशान किशन मैदानात फलंदाजीसाठी आले आहेत.

27 March 2024 21:22 PM

सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या इतिहास रेकॉर्ड रचला आहे. हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोर उभा केला. सनरायझर्सने 20 ओव्हरमध्ये 277 धावा केल्या. त्यामुळे आता मुंबईला विजयासाठी 278 धावा कराव्या लागणार आहे. हैदराबादकडून सलामीवीर ट्रेविस हेडने 24 बॉलमध्ये 62 धावा, अभिषेक शर्माने 23 बॉलमध्ये 62 तर हेनरिक क्लासेनने 34 बॉलमध्ये 80 धावा केल्या. 

मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका, जेराल्ड कोएत्झी यांना चांगलाच चोप मिळाला. युवा खेळाडू क्वेना मफाकाला सर्वाधिक 66 धावा ठोकल्या. तर कॅप्टन हार्दिक पांड्याने देखील 4 ओव्हरमध्ये 46 धावा दिल्या. तर बुमराहला देखील 4 ओव्हरमध्ये 36 धावा चोपल्या.

27 March 2024 20:33 PM

हैदराबादच्या मैदानात अखेर अभिषेक शर्माचं वादळ शांत झालंय. तो 23 बॉलमध्ये 63 धावा करून बाद झाला. त्यानंतर आता हेनरिक क्लासेन मैदानात आलाय.

27 March 2024 20:30 PM

अभिषेक शर्माने 24 मिनिटात ट्रेविस हेडचा रेकॉर्ड मोडला. अभिषेक शर्माने 16 बॉलमध्ये अर्धशतक ठोकत हैदराबादच्या इतिहासातील सर्वात जलद फिफ्टी ठोकली. 

27 March 2024 20:16 PM

ट्रेविस हेडचं वादळ अखेर शांत झालं. त्याने 24 बॉलमध्ये 62 धावा केल्या. त्यात 9 फोर अन् 3 सिक्सचा समावेश आहे.

27 March 2024 20:14 PM

सनरायझर्स हैदराबादने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात वादळी सुरूवात केली. ट्रेविस हेडने आक्रमक खेळी करत अर्धशतक पूर्ण केल्यावर अभिषेक शर्माने तलवारीसारखी बॅट चालवली. त्यामुळे हैदराबादने 7 ओव्हरमध्येच 100 धावा पूर्ण केल्या.

27 March 2024 20:07 PM

ट्रॅव्हिस हेडने सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकलं आहे. त्याने 18 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. तर याआधी हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नरने 20 बॉलमध्ये जलद शतक ठोकलं होतं.

27 March 2024 19:55 PM

मुंबईने दिलेलं फलंदाजीचं आमंत्रण स्विकार करून हैदराबादने दमदार सुरूवात केली आहे. ट्रेविस हेडने आक्रमक फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने मयंक अग्रवालची विकेट पडली. अग्रवालने 13 बॉलमध्ये 11 धावा केल्या. हार्दिक पांड्याने पाचव्या ओव्हरमध्ये त्याला तंबूत धाडलं.

27 March 2024 19:15 PM

सनरायझर्स हैदराबाद संघ - ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

मुंबई इंडियन्स संघ - इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.

27 March 2024 19:14 PM

Toss Update : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More