Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Score in Marathi : सनरायझर्स हैदराबादचा संघ यावर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2024 मध्ये बाकी संघांसाठी SRH ची टीम ही डोकेदुखी बनली आहे. तर दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गाडी अजूनपर्यंत रूळावर आलेली नाही. अशातच बघण्यायोग्य गोष्ट असणार की या मॅचमध्ये ही हैदराबाद आपल्या फलंदाजीचे वर्चस्व दाखवणार किंवा बंगळुरू या सामन्यात आपलं दमदार कमबॅक करणार? आयपीएल 2024 च्या पॉइंट्स टेबलमध्ये हैदराबादचा संघ हा 10 पॉइंट्स सोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि बंगळुरूचा संघ फक्त 2 पॉइंट्ससोबत शेवटच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे.