IPL 2023 SRH vs RCB: विराटच्या झंझावती शतकाने प्लेऑफचा मार्ग सोपा; हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव!
Updated: May 18, 2023, 11:13 PM IST
IPL 2023 SRH vs RCB LIVE: आयपीएल 2023 च्या प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा असा सामना बंगळूरू आणि हैदराबाद यांच्यात खेळवला गेला. हा सामना जिंकून आरसीबीने आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
LIVE Blog
IPL 2023 SRH vs RCB LIVE: आयपीएल 2023 च्या प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा असा सामना बंगळूरू आणि हैदराबाद (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळवला गेला. हा सामना जिंकून आरसीबीने आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
18 May 2023
18 May 2023 23:08 PM
IPL 2023 SRH vs RCB : आयपीएलच्या महत्त्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात स्टार विराट कोहली (Virat Kohli) याने झंझावती शतक ठोकलं. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने (RCB) हा विजय नोंदवला आहे. हैदराबादकडून क्लासेनने (Heinrich Klaasen) आक्रमक खेळी करत शतक झळकावलं होतं. त्यानंतर आता 4 वर्षानंतर विराट कोहलीने आयपीएल (Virat Kohli Century) शतक ठोकलंय.
18 May 2023 22:54 PM
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 10 चेंडूत 10 धावा हव्या आहेत
RCB 166/0 (17.2)
18 May 2023 22:53 PM
हैदराबादने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली याने 62 बॉलमध्ये शतक झळकावलं आहे. या शतकासह त्याने त्याने आरसीबीचा विजय सोपा केलाय. शतक झाल्यानंतर सिक्स खेचण्याच्या नादात विराट बाद झाला.
RCB 166/0 (17.2)
18 May 2023 22:39 PM
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 26 चेंडूत 34 धावांची गरज आहे.
RCB 154/0 (15.5)
18 May 2023 22:21 PM
हैदराबादने दिलेल्या 187 धावांचं आव्हान पार करताना विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डुप्लेसिसने अर्धशतकीय खेळी केलीये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 48 चेंडूत 79 धावांची गरज आहे
RCB 108/0 (12)
18 May 2023 21:10 PM
आरसीबीला विजयासाठी 187 धावांची गरज आहे. क्लासेनचं धमाकेदार शतक ठोकलं. त्याच्या जोरावर हैदराबादने 186 धावा कुटल्या.
18 May 2023 21:02 PM
शतक करताच मोठी फटकेबाजी करताना क्लानेस बाद झाला. त्याने 51 बॉलमध्ये 104 धावा केल्या.
SRH 182/4 (19)
18 May 2023 21:00 PM
आरसीबीच्या गोलंदाजांना लोळवत हेनरिक क्लासेनने शतक ठोकलं आहे. सिक्स मारत त्याने शतक साजरं केलं. 49 बॉलमध्ये त्याने ही कामगिरी केलीये.
18 May 2023 20:47 PM
हेनरिक क्लासेनने 3 सिक्स 6 फोर खेचत 40 बॉलमध्ये 79 धावा केल्या आहेत.
SRH 141/3 (16)
18 May 2023 20:33 PM
हैदराबादला तिसरा धक्का बसला असून कॅप्टन मार्करम 18 धावा करत शाहबाज अहमदचा शिकार झाला.
SRH 105/3 (13.1)
18 May 2023 20:21 PM
SRH 94/2 (11)
Heinrich Klaasen - 50
Aiden Markram - 16
18 May 2023 20:21 PM
10 ओव्हरनंतर हैदरबादने 2 गडी गमावत 81 धावा केल्या आहेत. क्लासेन हा आरसीबीच्या विजयात अडथळा ठरताना दिसतोय.
18 May 2023 19:57 PM
मायकेल ब्रेसवेल याने हैदरबादला सुरूवातीचे दोन धक्के, अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी झटपट बाद झाले.
SRH - 33/2 ( 5 ओव्हर)
18 May 2023 19:18 PM
IPL 2023 SRH vs RCB LIVE Live Score: बंगळुरूने प्रथम टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.