World Cup India vs England Live: वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघासमोर इंग्लंड संघाचं आव्हान आहे. भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात विजय मिळवला असून, इंग्लंड संघ मात्र 5 पैकी एकच सामना जिंकला आहे. गतवर्षीचा विजेता असणाऱ्या इंग्लंड संघाची या वर्ल्डकपमध्ये दाणादाण उडाली आहे. गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या तर इंग्लंड संघ नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाचा विजयरथ कायम ठेवण्याच्या आणि अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.
फिरकीपटूंनी इंग्लंडचा मिडल ऑर्डर मोडून काढली असून कुलदीप यादवने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद करत एकमात्र अडचण दूर केली.
शमीचा घातक मारा सुरूच असल्याचं समोर आलं आहे. मैदानात सेट होण्याचा प्रयत्न करत असलेल्या मोईन अलीला तंबूत पाठवलंय.
इंग्लंडला विकेट्सची गळती लागल्यानंतर बटलरने काहीसा ब्रेक देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला अपयश आलं, कुलदीप यादवने बटलरची विकेट काढली.
बुमराह आणि शमीने इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले आहेत. दोघांनी इंग्लंडची फलंदाजी मोडून काढली. शमीची हॅट्रीक हुकली... त्याने जॉनी बेअरस्टोला तंबूत पाठवलंय.
डेव्हिड मलाननंतर आता बुमराहने जो रुटला पहिल्याच बॉलवर तंबूत पाठवलं. रुट गोल्डन डक झाला.
डेव्हिड मलानच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसलाय. स्टार जसप्रीत बुमराहने त्याची बोल्ड करत विकेट काढली.
टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या सामन्यात टीम इंडियाची रनमशिन चालली नाही. त्यामुळे भारतीय संघाला केवळ 229 धावा करता आल्या आहेत. भारताकडून कॅप्टन रोहित शर्माने 101 बॉलमध्ये 87 धावांची झुंजार खेळी केली. तर सूर्यकुमार यादव याने 49 धावांची खेळी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याआधी चांगली सुरूवात मिळून देखील केएल राहुलला मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस बुमराहने टीम इंडियाला फिनिशिंग टच दिला अन् टीम इंडियाचा स्कोर 290 धावांवर पोहोचवला. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर क्रिस वोक्स आणि आदिल रशिद यांनी 2-2 गडी बाद केले.
सूर्यकुमार यादवने अखेरीस वादळी खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या वाढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी त्याचं अर्धशतक हुकलं.
रविंद्र जडेजा 8 धावा करून बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी देखील झटपट बाद झालाय. त्याने फक्त 1 रन केला.
टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्घ दमदार खेळीचं प्रदर्शन केलं. एकामागून एक विकेट्स जात असताना रोहित मैदानात चिटकून राहिला अन् धावसंख्या वाढवली. मात्र, त्याला शतक पूर्ण करता आलं नाही. तो 87 धावा करत बाद झाला. 101 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने त्याने धावा चोपल्या.
टीम इंडियाचा मिडल ऑर्डर खेळाडू केएल राहुल 39 धावा करत बाद झाला. 58 बॉलचा सामना करत त्याने 3 फोर मारले.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धमाकेदार अर्धशतक ठोकलं. त्याने 66 बॉलमध्ये ही कामगिरी केली.
आपली कामगिरी सिद्ध करण्याची संधी श्रेयस अय्यरने हुकवली. विराट लवकर बाद झाल्यानंतर अय्यरकडे शतक झळकवत टीम इंडियामधील जागा पक्की करण्याची संधी होती. मात्र, त्याला ते जमलं नाही. तो 16 बॉलमध्ये 4 धावा करत बाद झाला.
World Cup India vs England Live: विराट कोहली शून्यावर बाद, भारताची धावसंख्या 27 वर 2 बाद
World Cup India vs England Live: भारताला पहिला धक्का, शुभमन गिल 13 चेंडूत 9 धावांवर बाद
World Cup India vs England Live: इंग्लंडची प्लेइंग 11
डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वुड.
World Cup India vs England Live: अशी आहे भारताची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
Toss and Team Update
England win the toss and elect to bowl in Lucknow.
A look at #TeamIndia's Playing XI
Follow the match https://t.co/etXYwuCQKP#CWC23 | #MenInBlue | #INDvENG pic.twitter.com/oIo82skT3v
— BCCI (@BCCI) October 29, 2023
World Cup India vs England Live: इंग्लडचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाच सामन्यांनंतर पहिल्यांदाचा भारत प्रथम फलंदाजी करणार
World Cup India vs England Live: 5 रेकॉर्ड्स होण्याची शक्यता
1) रोहित शर्माने 47 धावा केल्यास आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा पूर्ण करेल. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, द्रविड़ आणि सौरव गांगुली यांनी ही कामगिरी केली आहे.
2) रोहित शर्माने या सामन्यात 10 षटकार मारले तर तो विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होईल. या बाबतीत ख्रिस गेल सध्या 49 षटकारांसह अव्वल स्थानावर आहे.
3) कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. 100 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवणारा तो सातवा खेळाडू असेल.
4) विराट कोहलीने 30धावा केल्या तर तो इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 हजार धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. सचिन तेंडुलकर सध्या 3990 धावांसह विराटच्या पुढे आहे.
5) या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकल्यास, तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरची बरोबरी करेल. विराट कोहलीच्या नावावर सध्या वनडेत 48 शतके आहेत.
World Cup India vs England Live: रोहित शर्माचा कर्णधार म्हणून 100 वा सामना
इंग्लंडविरोधातील सामन्यासह रोहित शर्माचा कर्णधार म्हणून हा 100 वा सामना असणार आहे. रोहित मैदानात उतरल्यास हा टप्पा गाठणारा सातवा भारतीय कर्णधार असेल. एमएस धोनी (332), मोहम्मद अझरुद्दीन (221), विराट कोहली (213), सौरव गांगुली (196), कपिल देव (108) आणि राहुल द्रविड (104) हे 100 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारे भारतीय कर्णधार आहेत.
रोहितने 2017 मध्ये पहिल्यांदा कर्णधार हाती घेतल्यापासून 9 कसोटी, 39 एकदिवसीय आणि 51 T20I मध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. एकूणच, पुरुष क्रिकेटमधील 49 क्रिकेटपटूंनी 100 किंवा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघांचे नेतृत्व केले आहे.
LIVE India Vs England: लखनऊत आज पाऊस?
IND vs ENG LIVE Updates: वर्ल्डकपमध्ये पावसाने आतापर्यंत कोणत्याही सामन्यात अडथळा आणलेला नाही. धरमशाला येथे धूरक्याने अडथळा आणल्याने भारत-न्यूझीलंड सामना थांबवावा लागला होता. लखनऊत आज पाऊस पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
World Cup: इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, 'या' खेळाडूला संधी
India Playing 11 vs England World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाची (Team India) विजयी घोडदौड सुरु आहे. सलग पाच सामने जिंकलेली टीम इंडिया आता सहाव्या विजयासाठी सज्ज झालीय. 29 ऑक्टोबरला भारताचा सामना इंग्लंडशी (India vs England) होणार आहे. लखनऊच्या भारतीरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.
World Cup India vs England Live: एकाना स्टेडियमच्या खेळपट्टीवर ऑफ-स्पिनर मोईन अली आणि लेग-स्पिनर आदिल रशीद या फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल. वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि ख्रिस वोक्स यांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.
World Cup India vs England Live: ’इंग्लंडच्या संघात सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या फलंदाजांची संख्या मोठी आहे. मात्र, यापैकी एकालाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. ’कर्णधार जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जो रुट, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक या नावांमुळे कागदावर इंग्लंडचा संघ मजबूत दिसतो. परंतु त्यांना परिस्थिती आणि खेळपट्टय़ांशी जुळवून घेता आलेले नाही. असे असले तरी भारताला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल.
World Cup India vs England Live: अष्टपैलू हार्दिक पंडय़ा या सामन्यालाही मुकणार असल्याने सूर्यकुमार यादवचे संघातील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. भारताच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यावर असेल.
World Cup India vs England Live: ’अश्विनला संधी द्यायची झाल्यास भारताला मोहम्मद शमी आणि सिराज यांच्यापैकी एकाला संघाबाहेर करावे लागू शकेल. शमीने गेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पाच गडी बाद केले होते.
World Cup India vs England Live: ’एकाना स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते. त्यामुळे भारतीय संघ रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासह रविचंद्रन अश्विनला खेळवण्याचा विचार करू शकेल.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.