Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ENG vs SL: उगीच टीम सेमीफायनलला गेली नाही...फिल्डिंग असावी तर अशी, लिविंग्स्टनचा नादच खुळा!

T20 World Cup,ENG vs SL: वोक्सच्या चेंडूवर मारलेला फटका डीप स्वेअर लेगला थांबलेल्या लिविंग्स्टने (Livingstone) पकडला. दहा फूट लांब सरपटत जाऊन कॅच पकडला. व्हिडीओ एकदा पहाच...

ENG vs SL: उगीच टीम सेमीफायनलला गेली नाही...फिल्डिंग असावी तर अशी, लिविंग्स्टनचा नादच खुळा!

ENG vs SL, Livingstone :  सध्या सुरू असलेल्या T20 World Cup मध्ये अखेरचे सामने खेळले जात आहेत. जिंकलो तर सेमीफायनल अन् हरलो तर घरी, असं समीकरण (T20 World Cup Points Table) आता दोन्ही गटात दिसतंय. त्यामुळे आता एक एक सामना महत्त्वाचा ठरताना दिसतोय. पहिल्या गटात आता न्यूझीलंडने सेमीफायनलचं तिकीट (SemiFinals) निश्चित केलंय. तर दुसरीकडे इंग्लंडने देखील ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे आता पहिल्या गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड दोन्ही संघ सेमीफायनल खेळतील. तर दुसऱ्या गटात भारत आणि साऊथ अफ्रिका सेमीफानयलला जाण्याची शक्यता आहे.

इंग्लंड आणि श्रीलंका (ENG vs SL) यांच्यात 39 वा सामना खेळला गेला. सिडनीच्या मैदानावर इंग्लडने श्रीलंकेचा पराभव केली आणि यजमान ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आणलं आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 141 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये इग्लंडने हे आव्हान पूर्ण केलं. मात्र, या सामन्यात सर्वात खास राहिला (Livingstone Amazing catch) लिविंग्स्टचा भन्नाट कॅच...

आणखी वाचा- Virat Kohli Birthday: "आज तू जो काही आहेस...", युवराजकडून लाडक्या चिकूसाठी 'तो' खास VIDEO शेअर!

झालं असं की... श्रीलंकेची फलंदाजी सुरू होती. निसांका (Pathum Nissanka) आणि कुसल मेंडिसने (Kusal Mendis) आक्रमक सुरूवात करून दिली. पहिल्या 4 ओव्हरमध्ये श्रीलंकेने 39 धावा केल्या होत्या. श्रीलंकेची फलंदाजी पाहून इंग्लंडच्या टीमला घाम फुटला. त्यावेळी वोक्सने इंग्लंडच्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, कुसल मेंडीसने निसांकाला मोलाची साथ दिली. त्याचवेळी वोक्सच्या चेंडूवर मारलेला फटका डीप स्वेअर लेगला थांबलेल्या लिविंग्स्टने (Livingstone) पकडला. दहा फूट लांब सरपटत जाऊन कॅच पकडला. त्याच्या या फिल्डिंगचं जगभरातून कौतूक होताना दिसत आहे. उगीच टीम सेमीफायनलला गेली नाही, फिल्डिंग असावी तर अशी, असा कमेंट वाचायला मिळत आहेत.

Read More